अवघ्या 5 मिनिटांत घरातच करता येणार ‘माती परिक्षण’!

Soil Testing Kit : शेतकऱ्यांना घरच्या घरी त्यांच्या शेतजमिनीतल्या मातीचं परिक्षण करता येण्यासाठी 'न्यूट्रीसेन्स' या किटची निर्मिती केली आहे. यामागचा उद्देश आणि हे किट वापरायचं कसं याबद्दल आपण जाणून घेऊयात.
[gspeech type=button]

शेतजमिनीचा पोत राखण्यासाठी खतांचा कितपत वापर करावा, आलटून -पालटून पिकं घेणं किती गरजेचं असतं यासगळ्या गोष्टींकडे सगळेच शेतकरी बारकाईने लक्ष देत नाहीत. शेतजमिनीतल्या मातीचं परिक्षण करुन त्यानुसार शेती करणं, खतं वापरणं यावरही लक्ष दिलं जात नाही. अनेकदा शेतकऱ्यांना याची गरज वाटतं नाही. पारंपारिक पद्धतीनेच पीकं घेणं आणि शेती करणं हे बहुतांश शेतकरी पसंत करतात.  काही ठिकाणी माती परिक्षण केंद्र हे शेतकऱ्यांपासून, गावापासून लांब अंतरावर असतं. असं काही माती परिक्षण करता हेही काही जणांना माहीत नसतं  त्यामुळे ते करत नसतात. अनेकदा या परिक्षणाचे निकाल येण्यासाठी दहा- पंधरा दिवस लागतात. तोवर पिकांना खतं देण्याची वेळ झालेली असते. म्हणून मग हे परिक्षण टाळलं जातं, अशी नानाविध कारणं आहेत. 

मात्र आता शेतकऱ्यांना घरच्या घरी त्यांच्या शेतजमिनीतल्या मातीचं परिक्षण करता येणार आहे. मातीचा पोत जाणून त्यानुसार कोणतं पीक घ्यावं, खतांचा किती वापर करावा, कोणती खतं वापरावीत अशा सगळ्याच गोष्टींचा योग्य तो निर्णय घेता येईल. 

यामुळे शेत खर्चातही कपात होऊन किफायतशीर शेती करता येईल. तर पाहुयात घरी मातीचं परिक्षण करण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि ती कशी करायची. 

‘न्यूट्रीसेन्स’ माती परिक्षणाचं किट

प्रोक्सिमल सॉइलसेन्स टेक्नोलॉजी या कंपनीने सगळ्यात छोटं असं माती परिक्षणाचं किट तयार केलं आहे. त्याचं नाव ‘न्यूट्रीसेन्स’ असं आहे. हे किट जगातलं सगळ्यात छोटं माती परिक्षण करण्याचं किट असल्याचा दावा केला जातो. या किटच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने मातीचं परिक्षण करता येतं. लॅबमध्ये मातीचं परिक्षण करायला गेल्यावर त्याचे निकाल हे तब्बल दोन आठवड्यानंतर मिळतात. पण या किटचे निकाल अवघ्या एका दिवसात आपल्याला मिळतात. 

महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि राजस्थान या राज्यातले काही शेतकरी या किटचा माती परिक्षणासाठी उपयोग करत आहेत. एक किट तीन वर्ष टिकतं. एका किटमधून वर्षाला तीन हजार चाचण्या करता येतात. 

हे ही वाचा : कीटकनाशके आणि कृषी रसायने

परिक्षणासाठी अगदी थोड्या मातीची गरज

‘न्यूट्रीसेन्स’ या किटच्या साहाय्याने मातीचं परिक्षण करण्यासाठी आपल्याला शेतातली थोडी माती घ्यायची आहे. पारंपारिक पद्धतीने म्हणजे प्रयोगशाळेमध्ये माती परिक्षणासाठी अर्धा किलो माती द्यावी लागते. पण या किटमध्ये परिक्षण करण्यासाठी अगदी कमी म्हणजे 1 ग्रॅम किंवा छोट्याशा बी एवढी माती घ्यायची आहे. ज्या शेतजमिनीतून ही माती घेणार आहोत त्या जमिनीत पालापाचोळा, दगड किंवा अन्य काही घटक नसले पाहिजेत. 

माती परिक्षणाचं द्रावण तयार करणं

त्यानंतर ही माती न्यूट्रीसेन्स किटच्या एका बाटलीमध्ये ठेवायची आहे. त्याच्यावर तीन मिलीमीटर रसायन ओतून ती बाटली  हलवून अर्ध्या तासासाठी तशीच ठेवायची आहे. अर्ध्या तासानंतर या बाटलीमध्ये वर एक थर येतो. तोच चाचणीसाठीचा नमुना द्रव असेल. 

सेन्सरवर द्रव टाकणे

या चाचणी द्रवाचा एक थेंब ड्रॉपलरच्या साहाय्याने किटमध्ये दिलेल्या सेन्सर स्ट्रिपवर टाकायचा. या सेन्सर स्ट्रिप ही वेगवेगळी पोषक तत्वे आणि मातीच्या गुणधर्मांनी संवेदनशील आहेत. त्यामुळे यावर एक थेंब पडताच स्ट्रीप विश्लेषण करायला सुरुवात करते. 

ही स्ट्रीप मातीच्या आरोग्यावर आणि त्यातील पिकांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या सहा घटकांचा अभ्यास करते. यामध्ये ज्यामध्ये pH, इलेक्ट्रिक कंडक्टिविटी, नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅशियम आणि अमोनिया नायट्रोजन यांचा समावेश आहे.

हे ही वाचा : खते: एक महत्त्वाची कृषी निविष्ठा 

निकाल कसे दिसतात?

या सहा घटकांचं विश्लेषण करुन निकाल देण्यासाठी 25 ते 30 सेकंद लागतात. म्हणजे एकदा का मातीतून चाचणी द्रव मिळवल्यावर अवघ्या पाच मिनिटात तुमचे चाचणी परिक्षण पूर्ण होते. यासाठी तुम्हाला खूप दिवस थांबण्याची, माती प्रयोगशाळेत पोहोचवण्याची व त्यामागे खूप सारा वेळ घालवण्याची गरज पडत नाही. या किटच्या मदतीने तुम्ही स्वत: घरात हे परिक्षण करु शकता. त्यात तुमचा पैसे आणि वेळही वाचतो. शिवाय अचूक निकालही तुम्हाला मिळतो. 

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये या परिक्षणाच्या अॅपवर माती आरोग्य कार्ड तयार होते. ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते. यामध्ये तुमच्या मातीच्या परिक्षणानुसार काय आवश्यक आहे, काय करु नये अशा सगळ्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात. 

माती आरोग्यकार्डनुसार अंमलबजावणी करणे

या परिक्षणानंतर माती आरोग्य कार्ड मिळाल्यावर त्याठिकाणी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. शेतजमीनिच्या प्रकारानुसार कोणतं आणि किती प्रमाणात खतं वापरावं हे सांगितलं जातं. त्यामुळे तेच खतं वापरुन फायदेशीर शेती करता येते. 

कारण माती परिक्षण न करता, आपल्या मातीला काय हवं आहे हे जाणून न घेता भरमसाठपणे विविध खतांचा भडीमार शेतात केला जातो. यामुळे शेतजमिनही खराब होते, त्यातील सुपीकता कमी होते, आणि उत्पादनही घटत जाते. त्यामुळे माती परिक्षण करुन त्यानुसार खतांचा वापर करणं आवश्यक आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ