अफगाणिस्तानात महिलांना ‘मुक्या’ करणारा तालिबानी फतवा

Taliban's fatwas in Afghanistan : अफगाणिस्तानात तालिबानी संघटनेने सत्ता काबिज केल्यापासून निरनिराळे फतवे काढले जात आहेत. या सगळ्या फतव्यांचं भयावय रूप आता बघायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये स्त्रियांना घराबाहेर मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी घातली गेली. महिलांच्या आवाजामुळेही पुरूषाच्या मनात व्याभिचाराचे विचार येऊ शकतात म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. घरातही महिलेला मोठ्यानं वाचन किंवा गाणं गाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.  आता तर मोठ्या आवाजात प्रार्थना न करण्याचाही तालिबानी फतवा जाहीर केला आहे.
[gspeech type=button]

अफगाणिस्तानामध्ये स्त्रिया या आता ‘मानवनिर्मित मुक्या’ बनत आहेत. हे देणं आहे तालिबानी सरकारचं. 

अफगाणिस्तानात तालिबानी संघटनेने सत्ता काबिज केल्यापासून निरनिराळे फतवे काढले जात आहेत. या सगळ्या फतव्यांचं भयावय रूप आता बघायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये स्त्रियांना घराबाहेर मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी घातली गेली. महिलांच्या आवाजामुळेही पुरूषाच्या मनात व्याभिचाराचे विचार येऊ शकतात म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. घरातही महिलेला मोठ्यानं वाचन किंवा गाणं गाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

आता तर मोठ्या आवाजात प्रार्थना न करण्याचाही तालिबानी फतवा जाहीर केला आहे. तालिबानच्या या नवनवीन फतव्यांवर जगभरातून टीका केली जात आहे. 

फतव्याची घोषणा

28 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानचे मंत्री खालिद हनाफी यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हा फतवा काढला आहे. या फतव्यानुसार एक प्रौढ स्त्री प्रार्थना करत असताना,  दुसऱ्या प्रौढ स्त्री ने ही प्रार्थना ऐकू नये. थोडक्यात मोठ्या आवाजात प्रार्थना सुद्धा करु नये असा हा फतवा आहे. या फतव्यामुळे अफगाणी स्त्रियांमध्ये निराशेचं वातावरण आहे. 

50 टक्के लोकसंख्या बनणार मुकी

जानेवारी 2024 च्या रिपोर्ट डाटाच्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानची एकूण लोकसंख्या ही 42.8 अब्ज लोकसंख्या आहे. यापैकी, स्त्रियांची लोकसंख्या ही 49.5 टक्के तर पुरुषांची लोकसंख्या ही 50.5 टक्के आहे. तालिबानच्या या नवीन फतव्यामुळे अफगाणिस्तानची अर्धी लोकसंख्या म्हणजे 50 टक्के लोकसंख्या ही दबक्या आवाजात बोलत बोलत मुकी बनणार आहे. 

स्वतंत्र राष्ट्रातही पारतंत्र्यात

तालिबानी सत्ता आल्यापासून महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांना आपलं संपूर्ण शरीर झाकून ठेवावं लागतं. महिलांना उघडपणे पुरुषांकडे बघण्याची अनुमती नाही.  घराबाहेर पडताना घरातला कोणीही पुरुष सोबत असणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना सुद्धा सोबत पुरुष असलाच पाहिजे. मुलींना उच्चशिक्षण घेण्यास बंदी आहे. तसंच घराबाहेर पडून नोकरी करण्यावरही बंदी घातली जाते. आता अलिकडच्या दोन फतव्यानुसार, महिलांना मोठ्या आवाजात बोलण्यावरही निर्बंध घातले आहेत. 

केवळ सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर स्वत:च्या घरातही अफगाणी स्त्रियांना आता पारतंत्र्यांत जगावं लागणार आहे. 

स्त्रियांचा आवाज ‘हराम’ आहे?

तालिबानांच्या विचारानुसार स्त्रियांचा आवाज हा हराम आहे. आम्ही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही, आता तर प्रार्थना सुद्धा करु शकत नाही. का तर आमचा आवाज हराम आहे. हे कुराणामध्ये लिहिलेलं आहे का? मग 1400 वर्षांमध्ये हे समोर का नाही आलं? आम्हाला आज हे इतक्या वर्षात का कळलं नाही?  हे असं सगळं अचानक तालिबान्यांना कसं कुराणामध्ये आढळून आलं? असे नानाविध प्रश्न महिला अधिकाऱ्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या मेहबुबा सिराज यांनी उपस्थित केले आहेत. 

स्त्रियांसकट पुरुष ही मानसिक आजाराचे रुग्ण

तालिबानी सत्ताधाऱ्यांच्या जुलूमी राजवटीमुळे अफगाणिस्तानमध्ये अनेक स्त्रिया आणि पुरुष हे मानसिक रुग्ण बनत आहेत. आत्महत्यचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. विविध फतवे, नियम, वाढती बेरोजगारी या सगळ्या गोष्टीमुळे येथील जनता नैराश्यच्या गर्तेत जगत आहे.  यामध्ये केवळ स्त्रियाचं नसून पुरुषाचं प्रमाणही खूप आहे. 

अफगाणी स्त्रियांचा आवाज हरवत चालला आहे

अफगाणिस्तानमध्ये आज तालिबानी सत्ताधारी कशाप्रकारे सत्ता चालवत आहे याची जगाला काहीच कल्पना नाही.  तिकडच्या महिलांच्या वास्तवतेचं चित्रण करता येत नाही. सामाजिक,  आर्थिक  स्थितीबद्दल कोणालाच काही माहिती नाही.  

संयुक्त राष्ट्र संघालाही त्याठिकाणी कोणत्याच प्रकारचं मदत कार्य करता येत नाही. तेथील जनतेचा आवाज हा जगापर्यंत पोहोचू दिला जात नाही. आता तर हा आवाजच बंद केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ