पीरियड ट्रॅकिंग ॲपची काळी बाजू : वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर

Period Tracking Apps : तुम्ही सुद्धा पीरियड ट्रॅकिंग ॲप वापरत असाल तर सावध राहा. कारण या ॲपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याविषयीची वैयक्तिक माहिती मार्केटपर्यंत पोहोचवली जात आहे. कशी हे जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख.
[gspeech type=button]

डिजिटल युगामध्ये आता सगळ्याच छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी ॲप्स उपलब्ध आहेत. किराणा सामान, औषधं, वस्तूंची खरेदी – विक्री, गुंतवणूक करायची आहे, आपण किती पावलं चाललो हे मोजण्याचं ॲप इथपासून ते महिलांसाठी पीरियड कधी येणार आहे, प्रजननचा अचूक दिवस कोणता हे सांगणारेही ॲप्स मोबाईलवर उपलब्ध आहेत. 

पीरियड ट्रॅकिंग ॲप्समध्ये युजर्सना त्यांना मासिक पाळी कधी येणार त्यानुसार सॅनिटरी पॅड जवळ ठेवण्याची आठवण तर करुन दिली जाते. पण याशिवाय एखाद्या महिलेला पाळी येण्याच्या दिवसात मूड स्विंग्ज होत असतील, काही खावसं वाटत असेल, पाळी येण्यापूर्वी वेदना होत असतील तर त्या कधीपासून सुरु होणार आहेत, दिवसानुसार पाळीचा फ्लो किती असेल अशा सगळ्या बारकाव्यांची आठवण या ॲपच्या माध्यमातून करुन दिली जाते. यानंतर लैगिंक सबंध कधीपासून ठेवू शकता आणि प्रजननाचा काळ कोणता असणार आहे याची माहिती दिली जाते. मासिक पाळी अनियमित असेल किंवा कामाच्या गडबडीत नेमकी तारीख लक्षात राहावी, या उद्देशाने अनेकजणी हे ॲप्स वापरत असतात. त्यासाठी आवश्यक ती माहिती या ॲप्सवर मुली आणि महिला अपलोड करतात. काही मुली-महिला तर कुटुंबातल्या इतर महिला सदस्यांचीही ही माहिती अपलोड करतात. यामुळं एकाच घरातील पाळीचा पॅटर्न अगदी सहज आपण या ॲप्सना पुरवतो.

पण हीच अतिशय खाजगी वैयक्तिक माहिती अन्य कंपन्यांना विकली जात असल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊयात हे नेमकं गौडबंगाल काय आहे?

असंख्य पिरीयड ॲप्स उपलब्ध

मासिक पाळीचं ट्रॅकिंग करणारे असंख्य ॲप्स ॲपल ॲप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. कोट्यवधी लोकं अशी वेगवेगळी ॲप्स वापरतात. यामध्ये दोन प्रकार असतात. एक बेसिक ॲप्स जे वापरण्यासाठी मोफत असतात. त्यामध्ये युजरला तिच्या पुढच्या मासिक पाळीची आठवण करुन  दिली जाते. त्यासाठी युजरकडून मासिक पाळीची तारीख, नियमित असते की अनियमित, पाळीच्या दिवसात वा त्याआधी त्रास होतो का, पाळीचा फ्लो किती असतो अशी पाळी संबधितच माहिती घेतली जाते. तर प्रीमियम पीरियड ट्रॅकिंग ॲप्समध्ये युजरचे मासिक पाळीशी आणि एकूणच आरोग्याशी संबंधित सखोल माहिती गोळा केली जाते. यामध्ये पाळीच्या आधी चेहऱ्यावर मुरुम येतात का, मूड स्विंग्ज होतात का, या दिवसात काय खावसं वाटतं यासह प्रजनन काळाविषयी माहिती दिली जाते. त्यानुसार एखादी महिला गर्भनिरोधक गोळी घेत असेल किंवा एखादी महिला नियमीत पाळी येण्यासाठी गोळी घेत असेल तर त्यांचीही नोटीफिकेशच्या माध्यमातून आठवण करुन दिली जाते. 

हे ही वाचा : ॲडेनोमायोसिस : एक वेदनादायी आजार!

माहितीच्या खजिन्याचा गैरवापर केला जाऊ शकतो

युजरकडून जितकी जास्त सखोल माहिती पुरवली जाते तितकं ते ॲप चांगलं होत जातं. त्यामुळे या ॲपकडून महिलेला ॲप वापरायला सुरुवात केल्यावर मासिक पाळीच्या काळात काय खायची इच्छा होते, योनी किंवा गर्भाशयाच्या मुखातून स्त्राव होतो का, वजन कमी – जास्त होतं का, स्तनाचा आकार, स्तनाग्रे दुखतात का, लैगिंक संबंध ठेवण्याची इच्छा होते की नाही होत, पाळीमध्ये रक्ताचा फ्लो कसा असतो, चिडचिड वा एकटेपणा वाटतो का, चेहऱ्यावर मुरुम येतात का, गर्भधारणा झाली आहे का किंवा त्यासंबंधित माहिती असे सगळे प्रश्न विचारले जातात. 

ही सगळी माहिती या ॲपसाठी आणि अन्य जाहिराती करणाऱ्या कंपन्यांसाठी खूप महत्त्वाची असते. ही माहिती जाहिरात कंपनीच्या हातात लागल्यावर त्यांना त्यांचा टार्गेट ऑडियन्स (ग्राहक) ओळखता येतो. आणि मग त्यानुसार त्या व्यक्तिला व्यक्तिश: त्यांच्या गरजेनुसार विविध उत्पादनाच्या जाहिराती पाठवल्या जातात. 

उदाहरणार्थ,  काही महिलांना, तरुणींना मासिक पाळीच्या वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी बाजारात गोळ्या उपलब्ध आहेत. या गोळ्यांच्या उत्पादक कंपन्या अशा पीरियड ट्रॅकिंग ॲपच्या साहय्याने वेहना होणाऱ्या महिलांची माहिती मिळवून त्यांच्या इंस्टाग्राम फीडमध्ये आपल्या उत्पादनाची थेट जाहिरात करायला सुरुवात करतात. सरसकट ग्राहकांसमोर जाहिरात करण्याऐवजी माहितीच्या आधारे नेमक्या ग्राहकवर्गापूरताच जाहिरात केल्यामुळे उत्पादनाची विक्री वाढते. 

जाहिरात हा एक विषय झाला. या ॲपवर महिलेच्या आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यामुळे ज्या देशांमध्ये, राज्यांमध्ये गर्भपात करणं गुन्हा आहे अशाठिकाणी या ॲपच्या साहाय्याने आरोपींची नेमकी माहिती मिळवता येऊ शकते, याच्या माध्यमातून गर्भपात रोखण्यासाठी या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. तर दुसरीकडे एखाद्या महिलेने गर्भपात केला असेल किंवा या खासगी माहितीच्या आधारे ॲप युजरला नानाविध प्रकारे त्रासही दिला जाऊ शकतो. 

त्यामुळे या पीरियड ट्रॅकिंग ॲप युजर्सच्या माहितीचं योग्य प्रकारे संरक्षण करतात का? या सोबतच युजर म्हणून आपण कितपत अशा ॲपवर अवलंबून राहायचं हे प्रश्न उपस्थित होतात. 

युजरच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण

गुगल प्ले स्टोअर ॲप डेव्हलपर्सकडून ॲप संबंधित इत्थंभूत माहिती घेत असतो. ॲप कशाबद्दल आहे, ते कसं काम करणार आहे, आणि युजर्सना त्यांची वैयक्तिक माहिती कशाप्रकारे मिळवली जाणार आहे आणि कशी शेअर केली जाणार आहे, अशा सगळ्या माहितीचा समावेश असतो. 

बायोविंकच्या क्लू सायकल आणि पीरियड ट्रॅकर ॲपने असं नमूद केलं आहे की ते ॲपच्या कार्यक्षमतेसाठी आणि युजरला अचूक माहिती पुरवण्यासाठी आरोग्य आणि फिटनेस विषयीची  माहिती गोळा करणार आहेत. ही माहिती ॲपवर दिलीच पाहिजे असं बंधनकारक नाही हेही त्यात नमूद केलं आहे. 

फ्लो हेल्थ इंक यांच्या गोपनीयता धोरणानुसार, युजर्सचा कोणताही डेटा थर्ड पार्टिसोबत शेअर केला गेला जाणार नाही. तरी, वापरकर्त्याचे अंदाजे स्थान, त्यांचं आरोग्य आणि फिटनेस माहिती यासारखी माहिती पची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशांसाठी आणि वापरकर्त्यांशी संवाद आणि पर्सनलायझेशनसाठी वापरण्यासाठी गोळा केली जाईल. तर वापरकर्त्यांचे अंदाजे स्थान (युजर लोकेशन) हे जाहिरातीसाठी वापरलं जाऊ शकते. 

सिंपल डिझाइन लिमिटेडच्या पीरियड कॅलेंडर पीरियड ट्रॅकरच्या गोपनीयता धोरणानुसार, पची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशांसाठी आरोग्य आणि फिटनेसची माहिती गोळा केली जाईल. मात्र ही माहिती देणं बंधनकारक नाही. तसेच ही माहिती अन्य कोणत्याही कंपनीसोबत शेअर केली जाणार नाही. 

तरी असे अनेक प आहेत जे त्यांच्या युजरची माहिती कशाप्रकारे संरक्षित केली जाणार आहे याची माहिती कुठेच देत नाहीत. 

उदाहरणार्थ, वाचंगाच्या क्लोव्हर-पीरियड आणि सायकल ट्रॅकर पने त्यांच्या धोरणामध्ये स्पष्ट दिलं आहे की, वापरकर्त्यांचे अंदाजे स्थान आणि त्यांचा ईमेल आयडी यासह डेटा ‘जाहिरात किंवा मार्केटिंग’ समाविष्ट असलेल्या उद्देशांसाठी शेअर करू शकते. एकदा या पला दिलेली माहिती युजर कशाप्रकारे नष्ट (डिलीट ) करु शकतो याचीही काही माहिती या पवर उपलब्ध नाही. 

आश्चयाची बाब म्हणजे काही पवर तर आपले पीरियड सायकल चंद्राच्या कलेशी किंवा आपल्या मैत्रिणीसोबत कशी जोडू शकतो, अशी शास्त्रीयदृष्ट्या चुकीची असलेली माहितीही दिली आहे. 

हे ही वाचा : मेन्स्ट्रुअल कप – वापरावा की नाही?

जाहिरातींचा भडीमार

क्लू, फ्लो, पीरियड कॅलेंडर, पीरियड ट्रॅकर आणि क्लोव्हर या पचे मोठ्या प्रमाणात युजर्स असले तरी प रिव्ह्यूमध्ये या पना 1 किंवा 2 स्टारचं मिळालेले आहेत. या रिव्ह्यूमध्ये युजर त्यांचे अनुभव लिहितात. ते सांगतात की, ज्या वापरकर्त्यांना फक्त बेसिक सुविधा वापरायच्या आहेत त्यांना सुरुवातीला काही त्रास होत नाही. पण मग नंतर प सुरु केल्यावर मोठ्या प्रमाणात जाहिराती येत राहतात. त्यानंतर प्रिमियम व्हर्जन वापरण्यासाठी सतत नॉटिफिकेशन यायला सुरुवात होते. तिसऱ्या टप्प्यात तर  प सबस्क्राईब करायला किंवा थर्ड पार्टीच्या जाहिराती दाखवायला सुरुवात केली जाते. म्हणजे पीरियडची माहिती अपडेट करण्यासाठी हे प सुरु करताच विविध जाहिरातींचा बाजार मांडला जातो. 

त्यामुळे काही वापरकर्ते या अनावश्यक जाहिरातींवर चिडचिड व्यक्त करतात. काही महिला वर्षानुवर्ष असे  प वापरत असतात. त्यावर त्यांची महिन्यानुसार माहिती अपडेट करत असतात. त्यामुळे जाहिरातींनी जरी पछाडलं तरी, ते प सोडून (डिलीट करुन) दुसरं कोणतं प  वापरायचा विचार त्या करत नाहीत. 

गोपनीयतेला महत्त्व नाही

गुगल प्ले डेव्हलपरला या पनी त्यांच्या गोपनीयतेच्या धोरणाविषयी स्पष्टता दिली म्हणजे ते तुमची माहिती सुरक्षित ठेवतीलच असं काही नाही.  2011 मध्ये युएस फेडरल ट्रेड कमिशनने दिलेल्या अहवालानुसार, फ्लो हेल्थ इंकने त्यांच्या युजरच्या गोपनीयतेच्या विरोधात जात आपल्या युजर्सची आरोग्य विषयक माहिती विश्लेषकांना पुरवली होती. 

फेडरल ट्रेड कमिशनच्या तक्रारीनुसार, कंपनीने फ्लो पीरियड अँड ओव्हुलेशन ट्रॅकर पमधील लाखो वापरकर्त्यांचा आरोग्य डेटा फेसबुकच्या नालिटिक्स डिव्हिजन, गुगलच्या नालिटिक्स डिव्हिजन, गुगलच्या फॅब्रिक सर्व्हिस, प्सफ्लायर आणि फ्लरी यासारख्या कंपन्यांना शेअर केला होता.

हेल्थ प्सवर किती विसंबून राहावं?

पीरियड ट्रॅक प्सचा मर्यादीत वापर करणं ठीक आहे. मात्र, त्यावर पूर्ण विसंबून राहून आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती देणं धोकादायक आहे. कोणत्याही स्वरुपाच्या पवर  अनेकदा लॉग इन करताना सगळ्याचं प्रश्नांची उत्तरं देणं अनिर्वाय नसतं. मात्र, आपण सवयीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आपली माहिती पवर शेअर करतो. याशिवाय हे प कोणत्या देशाचं आहे, कोणत्या डेव्हलपर्सनी ते तयार केलं आहे, त्यांचं गोपनीयता संदर्भातलं धोरण काय आहे, या सगळ्या गोष्टी तपासणं अत्यावश्यक आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Glutathione Injections : स्कीन केअर क्लिनिकमध्ये त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकत्या टाळण्यासाठी इंजेक्शनद्वारे हे ग्लुटाथिओन शरीरातल्या रक्तपेशींमध्ये सोडलं
ECI de-listing RUPP's Parties : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या 345 राजकीय पक्षांना ‘नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या’ (RUPP) यादीतून काढून टाकण्याचा
Swiss Bank : स्विस बँकेत खातं असणं म्हणजे तुम्ही जगातल्या श्रीमंतांच्या क्लबमधले सदस्य असल्याचं द्योतक मानलं जातं. संपत्तीची सुरक्षितता, गुंतवणूक

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ