ग्लूटाथिओन इंजेक्शन्स म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहेत का?

Glutathione Injections : स्कीन केअर क्लिनिकमध्ये त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकत्या टाळण्यासाठी इंजेक्शनद्वारे हे ग्लुटाथिओन शरीरातल्या रक्तपेशींमध्ये सोडलं जातं. या इंजेक्शनचे डोस अतिप्रमाणात घेतले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.
[gspeech type=button]

शुक्रवार दिनांक 27 जूनच्या रात्री सिनेकलाकार आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. वयाच्या 42 व्या वर्षी हार्ट अटॅक येण्यामागचं कारण सांगितलं जातं ते ती घेत असलेल्या सौंदर्य उपचार. वयाच्या 42 व्या वर्षी सुंदरता टिकून राहावी, चेहऱ्याची त्वचा तरुण, ताजीतवानी दिसावी यासाठी ती ग्लूटाथिओनचे उपचार घेत होती. या उपचारामुळे रक्तदाब कमी होऊन तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घेऊयात हे ग्लूटाथिओन इंजेक्शन्स नेमकं काय असते? 

ग्लूटाथिओन म्हणजे काय?

काही वर्षापूर्वी ग्लूटाथिओनचे उपचार खूप कमी जण घेत होते. मात्र अलीकडे सौंदर्य टिकवण्यासाठी शहरी भागामध्ये अनेकजण हे उपचार घेत असल्याचं आढळत आहे. या इंजेक्शनमुळे त्वचा गोरी, ताजीतवानी आणि आणि तरुण दिसते. 

आपल्या प्रत्येकांच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या ग्लुटाथिओन असते. आपल्या शरीरामध्ये हे तयार होणारं एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे. ते विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी, यकृताचं आरोग्य जपण्यासाठी मदत करते. आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. 

मात्र, अनेक स्कीन केअर क्लिनिकमध्ये त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकत्या टाळण्यासाठी इंजेक्शनद्वारे हे ग्लुटाथिओन शरीरातल्या रक्तपेशींमध्ये सोडलं जातं. 

माहीम-फोर्टिस असोसिएट इथल्या एसएल रहेजा हॉस्पिटलमधल्या सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शंकर सावंत यांनी सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार,”लोकांना हे इंजेक्शन घेतल्यावर लगेच चेहऱ्यावर चमक आणि गोरेपणा हवा असतो. त्यामुळे काहि रुग्ण एकाचवेळी तीन ते चार पट जास्त डोस घेतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.” 

ग्लुटाथिओनचं इंजेक्शन घेणं सुरक्षित आहे का?

अमृता हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. आशिष कुमार यांनी वैद्यकीय तपासणीशिवाय ग्लूटाथिओन  किंवा इतर आयव्ही ड्रिप न वापरण्याचा सल्ला दिला आहे.  ते म्हणतात की, “आयव्ही इन्फ्युजन, हे कार्डियाक स्क्रीनिंगशिवाय घेतलं तर इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकतं, हायपरटेन्शन होऊ शकते आणि मग काही केसेसमध्ये हार्ट अटॅकच्या घटना घडू शकतात. ग्लूटाथिओनमुळे असं होतंच असं नाही. ते अतिप्रमाणात घेणं, त्यात दिवसभर उपवास पाळणं आणि इतरही औषधांचं सेवन करणं यामुळेही  औषधाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

ग्लूटाथिओनचे डोस हे ठराविक प्रमाणातच घ्यावे लागतात.  शरीराच्या वजनाच्या तुलनेत प्रति किलो सुमारे 20 ते 40 मिलीग्राम डोसं घेणं सुरक्षित असतं. पण जर अतिप्रमाणात डोस घेतले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात किंवा रक्तदाब अचानक कमी होतो. 

ग्लूटाथिओनला वैद्यकीय मान्यताही नाही 

स्कीन केअर क्लिनिकमध्ये जरी त्वचा गोरी करण्यासाठी ग्लूटाथिओनचा वापर केला जात असला तरी त्याला वैद्यकीय मान्यता नाही. केवळ एक अँटिऑक्सिडंट म्हणूनच त्याचा वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जातो. 

ग्लूटाथिओनच्या इंजेक्शनमुळे त्वचा गोरी होती असा प्रचार केला जातो. त्यामुळे अनेकजण त्वचा सुंदर ठेवण्यासाठी ही इंजेक्शन्स घेतात. मुंबईत एका महिलेने हे उपचार घेतल्यानंतर तिला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे तिने लगेच त्या क्लिनिकवर निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेने माध्यमांना सांगितलं की, “या ग्लूटाथिओनच्या इंजेक्शनमुळे त्वचा सुंदर, गोरी नितळ होते असा प्रचार केला जातो. पण त्याच्या दुष्परिणाम किंवा काळजी कशी घ्यावी याबद्दल काहीच सांगितलं जात नाही. या ग्लूटाथिओनच्या इंजेक्शनचा अनेक महिलांना त्रास झाला आहे.” 

शरीरात नैसर्गिकरीत्या ग्लूटाथिओन निर्माण व्हावं यासाठी काय करायचं?

शरीरात ग्लूटाथिओन (Glutathione) तयार करण्यासाठी, दररोजच्या जेवणात पुरेसे प्रथिने, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियमयुक्त पदार्थ असणं आवश्यक आहे.  तसेच, पुरेसा व्यायाम आणि चांगली झोप सुद्धा गरजेची असते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Period Tracking Apps : तुम्ही सुद्धा पीरियड ट्रॅकिंग ॲप वापरत असाल तर सावध राहा. कारण या ॲपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याविषयीची
ECI de-listing RUPP's Parties : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या 345 राजकीय पक्षांना ‘नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या’ (RUPP) यादीतून काढून टाकण्याचा
Swiss Bank : स्विस बँकेत खातं असणं म्हणजे तुम्ही जगातल्या श्रीमंतांच्या क्लबमधले सदस्य असल्याचं द्योतक मानलं जातं. संपत्तीची सुरक्षितता, गुंतवणूक

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ