शहरांची वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण केलं जातं. याला इंग्रजीमध्ये टियर 1, टियर 2 आणि टियर 3 असं म्हटलं जातं. टियर या अंग्रजी शब्दाचा अर्थ पातळी, स्तर असा आहे. हा स्तर त्या-त्या शहराची आर्थिक उलाढाल, विकास, पायाभूत सुविधांवरुन ठरत असतो. टियर 1 शहरं ही आकाराने मोठी विकसीत असतात. टियर 2 मधली शहरं ही विकासाच्या मार्गावर असतात. उद्योगांची संतुलित प्रमाण असतं. तर टियर 3 शहरं ही आकाराने छोटी आणि एखाद्या भौगोलिक क्षेत्राचं केंद्र असतं.
तर, जाणून घेऊयात या पातळ्या कशा ठरतात आणि त्यासाठी कोणते महत्त्वाचे निकष असतात.
टियर 1 शहरं –
टियर एकच्या वर्गवारीतले शहरं ही मेट्रोपॉलिटन शहरं म्हणून ओळखली जातात. ही शहरं आकाराने मोठी असतात. सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र म्हणून गणली जातात. अशा शहरांची लोकसंख्या ही जवळपास 4 दशलक्ष असते. या मोठ्या शहरांमध्ये आर्थिक उलाढाल, व्यापार, पायाभूत सुविधा आणि अनेक अशा मोठ्या घडामोडी घडत असतात. अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक ही होत असते. मोठ-मोठ्या कंपन्या उभ्या राहतात. अशी शहरं राजकारणाचंही केंद्र असते. आपल्या देशातील मुंबई, बँगळुरू आणि दिल्ली ही टीयर 1 शहराची काही उदाहरणे आहेत.
टीयर 2 शहरं –
टीयर दोन आणि टीयर 1 या वर्गवारीमध्ये फार जास्त फरक नसतो. टीयर 1 शहरांमध्ये जसा पायाभूत सुविधा औद्योगिक विकास होत असतो तसाच विकास या शहरांमध्येही ही होत असतो. त्यामुळे भविष्यातले टीयर 1 शहरे म्हणून याची गणती होते. या शहरांतही त्यामुळे लोकसंख्या वाढू लागते. टीयर 1 नंतर अधिकतर पसंती ही टीयर दोनच्या शहरांना मिळत असते. कारण ही शहरे विकासाच्या मार्गावर असतात. अशा शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जाते. अशी शहरे तालुके आणि जिल्ह्याचे केंद्र असतात. या शहरांची लोकसंख्या तरी 1 ते 4 दशलक्षच्या गटात असते. जयपूर, कोईम्बतूर, कोची ही शहरं टीयर 2 शहरांची उदाहरणे आहेत.
टीयर 3 शहरं –
टीयर 3 मधली शहरं ही छोटी केंद्र असलेली शहरं असतात. या शहरांची लोकसंख्या ही जवळपास 1 लाख ते 1 दशलक्ष असते. या शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास अन्य शहरांपेक्षा कमी झालेला असतो. नागपूर, इंदोर, पटना ही टीयर 3 च्या वर्गवारीतली शहरं आहेत.
शहराची वर्गवारी वा दर्जा कसा ठरवला जातो?
कोणतं शहरं हे टीयर 1 मध्ये आहे टीयर 2 मध्ये आहे की टीयर 3 मध्ये हे विविध निकषांवरुन ठरवलं जातं. हे निकष पुढीलप्रमाणे :
लोकसंख्या –
संबंधित शहराची लोकसंख्या हा निकष शहराचा स्तर ठरवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे. शहराची लोकसंख्या जितकी जास्त तितका त्या शहराचा स्तर मोठा असतो.
आर्थिक उलाढाल –
त्या शहरात किती वेगवेगळ्या प्रकारचे व्यवयाय, व्यापाऱ्याच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होते ते महत्वाचं असतं. त्या शहरात असलेले व्यापार, औद्योगिक वसाहती, रोजगार निर्मिती, उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा अशा सगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात.
पायाभूत सुविधा –
शहरांच्या विकासासाठी आणि शहराचा स्तर ठरविण्यासाठी त्या शहरातल्या पायाभूत सुविधांचं निर्माण होणं गरजेचं असते. प्रवासासाठी, संवादासाठी निर्माण केलेल्या या पायाभूत सुविधांचं जाळं, त्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता या सगळ्या गोष्टी शहराचा स्तर ठरविण्यासाठी गरजेच्या असतात.
विकास निर्देशांक –
मानवी विकास निर्देशांक (HDI) आणि दरडोई उत्पन्न (GDP) हे दोन घटक त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान आणि विकास प्रतिबिंबित करतात.
प्रशासकीय महत्व –
संबंधित शहराची त्या राज्याच्या, देशाच्या राजकारणात प्रशासकीय आणि निर्णायक भूमिका असते यावरुनही शहराचा स्तर ठरवला जातो.
शहराची अशी वर्गवारी का केली जाते?
शहराचं नियोजन आणि विकास
निकषांच्या आधारावर शहराचं वर्गीकरण केल्यावर प्रत्येक शहराची गरज आणि क्षमता समजून घेऊन त्यानुसरा विकासाचं नियोजन करता येते.
आर्थिक विकास
या माहितीवरून त्या शहरात गुंतवणूक करण्याचे फायदे, संधी किती आहेत हे समजते. तसेच त्या-त्या शहरातल्या विशेष भागाचा आर्थिक विकास साधता येतो.
सरकारी धोरणं –
या माहितीच्या आधारावर पायाभूत सुविधांचं निर्माण, संसाधनांची उपलब्धता आणि कल्याणकारी योजना यासारख्या सरकारी धोरणांची निर्मिती केली जाते