अमेरिका आणि चीन मध्ये ‘एआय’ वॉर

Deepseek : चीनमधल्या डीपसीक या स्टार्टअप कंपनीने शब्दश: अमेरिकेतल्या सिलीकॉन व्हॅलीला हादरवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच चीनच्या उत्पादनावर 100 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर चीनचं एआय असिस्टंट ॲप डीपसीक अमेरिकेसाठी मोठा सेट बॅक ठरला आहे. 
[gspeech type=button]

चीनमधल्या डीपसीक या स्टार्टअप कंपनीने शब्दश: अमेरिकेतल्या सिलीकॉन व्हॅलीला हादरवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच चीनच्या उत्पादनावर 100 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर चीनचं एआय असिस्टंट ॲप अमेरिकेसाठी मोठा सेट बॅक ठरला आहे. 

ट्रम्प यांच्या 100 टक्के टेरिफ लादण्याच्या निर्णयाला अवघे काही दिवस होताच चीनच्या या डीपसीक कंपनीने एआय असिस्टंट लॉन्च केलं. या नव्या एआय असिस्टंट ॲपमुळे अमेरिकेतल्या प्रख्यात एनवीडिया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. एका दिवसामध्ये एनवीडिया कंपनीचं 20 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. 

एआय युगात चीन अमेरिकेच्या बरोबरीला !

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय तंत्रज्ञान विकसीत झालं. त्यामुळे जगभरात अमेरिकेची मक्तेदारी होती. या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी खूप नफा कमावला. या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या एआय सेमी कंडक्टर चीप्ससुद्धा अमेरिकेतल्या एनवीडिया कंपनीकडून तयार केल्या जायच्या. चीनच्या या नविन एआय असिस्टंटमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे एनविडीया कंपनीचं झाल्याचं पाहायला मिळतं.

या संपूर्ण एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी, त्यासाठी उपयुक्त असलेल्या पायाभूत सोईसुविधाचं निर्माण करण्यासाठी ट्रम्प सरकारने अलीकडेच 500 अब्ज डॉलरच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, चीनच्या या नविन एआय ॲपमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातली सिलीकॉन व्हॅली आणि अमेरिकेची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली, असं मत मांडलं जात आहे. 

याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, चीनच्या डीपसीक एआय असिस्टंट ॲपने अमेरिकेत चॅट जीपीटीला मागे टाकत ॲपल स्टोरवर सगळ्यात जास्त खपाच मोफत ॲप म्हणून विक्रम नोंदवला आहे.

डीपसीकने वापरल्या एनवीडिया कंपनीने रद्द केलेल्या चीप 

डीपसीक या चीनमधल्या स्टार्टअप कंपनीने कमी भांडवलामध्ये आणि कमी मनुष्यबळामध्ये हे तंत्रज्ञान विकसीत करुन त्याचा यशस्वी उपयोग करुन दाखवला आहे. या चायनीज कंपनीने 6 दशलक्ष डॉलरमध्ये एनवीडिया कंपनीचेच बंदी वा रद्द केलेल्या एच100 चीप वापरून एआय असिस्टंट तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. यामुळे या कंपनीने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सुरुवातीला डीपसीक कंपनीने एनवीडिया कंपनीचे एच 800 चीप्स वापरल्याची माहिती माध्यमांमध्ये पसरली होती. मात्र, डीपसीक कंपनीचे सीईओ अलेंक्झांडर वांग यांनी माहिती दिली की, या एआय असिस्टंट ॲपसाठी एनवीडिया कंपनीचेच एच 100 एआय चीप वापरल्याची माहिती सीएनबीसी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिली आहे. 

या मुलाखतीमध्ये सीईओ अलेक्झांडर वांग म्हणाले आहेत की, डीपीसीककडे एच 100 च्या 50 हजार चीप आहेत. या चीप कंपनीने रद्द केल्या आहेत. याचा वापर आम्ही एआय तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी करत आहोत ही माहिती आम्ही जाहीरपणे सांगू शकत नव्हतो. कारण ही माहिती उघड झाली असती तर अमेरिकेकडून या चीपचा पुरवठा केला गेला नसता. त्यावर निर्बंध आणले असते. यापुढेही आम्हाला या चीपची गरज भासल्यावर ती आम्हाला सोप्या पद्धतीने मिळणार नाही, असं ही वांग म्हणाले. 

चीनमध्ये तंत्रज्ञान विकासाची पार्श्वभूमी

अमेरिकेमध्ये सन 2022 साली ओपन एआय कंपनीने चॅट जीपीटी हे एआय तंत्रज्ञानावर आधारित ॲप विकसीत केलेलं. त्यावेळी चीनमधल्या आयटी कंपन्यांनी सुद्धा स्वत:च  एआय ॲप विकसीत करण्याचं ठरवलं. त्यानुसार चीनमधल्या बायडू या सर्च इंजिन कंपनीने स्वत:च एआय ॲप तयार केलं. मात्र, ते यशस्वी होऊ शकलं नाही. त्यामध्ये खूप उणिवा होत्या. तेव्हा एआय तंत्रज्ञानामध्ये चीन अमेरिकेशी तुलना करु शकत नसल्याचं स्पष्ट दिसून आलं. 

मात्र, चीनने हार मानली नाही. त्यांनी डीपसीकच्या माध्यमातून त्यांचं ध्येय पूर्ण करुन दाखवलं. ते ही अमेरिकन ओपन एआय कंपनीच्या तुलनेत खूप कमी खर्चात हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. एवढंच नव्हे तर, डीपसीक – वी 3 आणि डीपसीक – आर 1 हे ओपन एआय आणि मेटाच्या आताच्या अद्ययावत मॉडेलच्या बरोबरीचे असल्याचं मत सिलीकॉन व्हॅलीमधल्या आयटी तज्ज्ञांनी मांडलं आहे. 

डीपसीकची भांडवली गुंतवणूक आणि ॲपचा खर्च

ओपन एआय कंपनीने आतापर्यंत 6 हजार 600 दशलक्ष डॉलरचे भांडवल  यामध्ये गुंतवले आहे. हे तंत्रज्ञान सक्रिय ठेवण्यासाठी या कंपनीमध्ये एकूण 4 हजार 500 कर्मचारी काम करत आहेत. त्याउलट डीपसीक कंपनीने 6 दशलक्ष डॉलर मध्ये हा प्रकल्प पुर्ण केला आहे. यासाठी 200 कर्मचारी नेमले आहेत. एवढ्या कमी गुंतवणुकीत आणि मनुष्यबळावरही डीपसीकने ओपन एआयच्या बरोबरीच एआय असिस्टंट ॲप विकसीत केलं आहे. 

या कंपनीचं डीपसीक – आर 1 हे मॉडेल जानेवारी 2025 च्या चौथ्या आठवड्यात लॉन्च झालं. हे मॉडेल ओपन एआयच्या 1 मॉडेलच्या दरा पेक्षा 20 ते 50 टक्के स्वस्त आहे. याची माहिती डीपसीक कंपनीने त्यांच्या अधिकृत वीचॅट अकांउंटवर दिली आहे.

डीपसीक कंपनीचे मालक कोण?

डीपसीक हा चीनमधला हांगझाऊ शहरातला एक स्टार्टअप आहे. चीनमधल्या क्वांटिटेटिव्ह हेज फंड हाय-फ्लायर कंपनीचा सह-संस्थापक लिआंग वेनफेंग या कंपनीचा शेअर हॉल्डर आहे.

लिआंग यांनी मार्च 2023 मध्ये या नविन स्टार्ट अपची वीचॅटवरुन घोषणा केली होती. त्यावेळी ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते की, ‘पुन्हा सुरुवात करतो.’ ‘आर्टिफिशयल जनरल इंटेलिजन्स मध्ये नवीन उत्पादन निर्मिती करण्यासाठी नविन, स्वतंत्र संशोधकांचा गट निर्माण केला आहे.’ या घोषणेनंतर 2023 च्या वर्षाअखेर त्यांनी डीपसीकची स्थापना केली. 

दरम्यान, या कंपनीमध्ये लिआंग यांच्या हेज हाय-फ्लायर कंपनीने किती गुंतवणूकी केली आहे यासंदर्भात मात्र गुप्तता ठेवली आहे. 

बीजिंगच्या राजकीय वर्तुळातही आनंदाचं वातावरण

दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी डीपसीक-आर 1 मॉडेल लॉन्च झालं. या लॉन्चिंगनंतर चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी उद्योजकांसाठी विशेष परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादामध्ये लिआंग वेनफेंग यांना विशेष स्थान देण्यात आलेलं. 

डीपसीक या एआय असिस्टंटमुळे चीन अमेरिकेला धोरणात्मक आणि व्यावसायिक स्वरुपात प्रत्युत्तर देऊ शकला, त्यामुळे चीनच्या राजकीय वर्तुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

UPI: मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास तीन वेळा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे जी पे
Cotton or linen : कॉटन आणि लिनेन हे दोन वेगळ्या प्रकारचे कापड आहेत. लिनेन हे फ्लेक्स नावाच्या एका खास प्रकारच्या
Pope Election Process : रोमन कॅथॉलिक समुदायाचे पोप फ्रान्सिस यांचे भारतीय वेळेप्रमाणे सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी निधन झालं.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ