व्हॉस्ट्रो खात्यांच्या सुविधेमुळे भारत – रशिया व्यापाराला चालना; काय असते व्हॉस्ट्रो खाते? 

Vostro Account : आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार हे निवडक देशांसोबत त्या-त्या देशांतील चलनामध्ये करता यावेत यासाठी वॉस्ट्रो खात्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या खात्याच्या माध्यमातून रशियासोबत आत्तापर्यंत 66 अब्ज डॉलरचा व्यापार केलेला आहे. 2030 पर्यंत हा व्यापार 100 अब्जापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं आहे.
[gspeech type=button]

भारत आणि रशिया या दोन्ही देशामधला व्यापार हा 66 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे. रशिया आणि भारत या दोन्ही देशांमधला व्यवहार हा व्हॉस्ट्रो खात्याच्या माध्यमातून त्या-त्या देशाच्या चलनामध्ये केला जातो. त्यामुळे व्यापारवृध्दीला चालना मिळाली आहे. 2030 पर्यंत हा व्यापार 100 अब्जापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं आहे. या दोन्ही देशांतील आर्थिक व्यवहारांना गती देणारे व्हॉस्ट्रो खाते नेमके काय असते.

काय असते व्हॉस्ट्रो खाते? 

वॉस्ट्रो हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ तुमचे खाते असा आहे. भारत आणि रशिया या दोन देशांमधला व्यवहार त्या-त्या देशाच्या चलनामध्ये म्हणजे रूपया आणि रुबलमध्ये करता यावा, यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही खाती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत येत असतात. 

व्हॉस्ट्रो खाते ही आंतरराष्ट्रीय बँकेतील खात्यासाठी करस्पॉडंट बँक खाते म्हणून काम करते. उदा. जेव्हा रशियन व्यापारी भारतीय व्यापाऱ्यांशी व्यवहार करु इच्छितो तेव्हा हे व्यवहार त्या-त्या देशातल्या बँकेतल्या व्हॉस्ट्रो खात्याच्या माध्यमातून केले जातात. 

त्यामुळे या व्यवहारांना एक प्रकारची आर्थिक सुरक्षा मिळते. यामुळे आंतरराष्ट्रीय चलनात व्यवहार करणे सोपे होते. थोडक्यात, व्हॉस्ट्रो खाते ही दोन वेगवेगळ्या देशामधला आर्थिक व्यवहार जलग गतीने करण्यासाठी निर्माण केलेला मार्ग आहे.

व्हॉस्ट्रो खात्याची सुविधा कोणत्या बँकेत मिळते?

सुरुवातीला 9 बँकामध्ये व्हॉस्ट्रो खाते सुरु करु, त्यातून परदेशी व्यवहार करण्याची सुविधा दिलेली. मात्र, जुलै 2023 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातल्या 20 बँकांना 92 व्हॉस्ट्रो खाते सुरु करण्याची परवानगी दिली. या खात्यांच्या माध्यमातून बांगलादेश, बेलारुस, इस्त्रायल अशा अन्य 22 देशांसोबत त्या-त्या देशाच्या चलनामध्ये व्यवहार केला जातो. 

या खात्या अंतर्गत नेमकं कसं काम होतं?

मुळात व्यवहार करणाऱ्या दोन देशामध्ये जेव्हा स्थानिक चलनामधुन व्यवहार केला जातो, तेव्हाच व्हॉस्ट्रो खात्याचा उपयोग होतो. जसं की, जेव्हा भारतीय व्यापाऱ्याला रशियन व्यापाऱ्याला रूपयामध्ये पैसे द्यायचे असतात, तेव्हा हा व्यवहार व्हॉस्ट्रो खात्याच्या माध्यमातून केला जातो. याचप्रमाणे, जेव्हा परदेशी व्यापाऱ्याला रुपयामध्ये भारतीय व्यापाऱ्याला पैसे द्यायचे असतात तेव्हा व्हॉस्ट्रो खात्यामधून पैसे काढून भारतीय व्यापाऱ्याला दिले जातात. थोडक्यात, आंतरराष्ट्रीय चलनाचे रुपांतर करण्यासाठी या खात्याचा उपयोग केला जातो. 

व्हॉस्ट्रो खात्याच्या माध्यमातून कोणत्या स्वरुपाचे व्यवहार करता येतात? 

आंतरराष्ट्रीय व्यापार  

या खात्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार शक्य होतात. व्होस्ट्रो खात्याच्या माध्यमातून आयातदार आणि निर्यातदारांमधील  पेमेंट सेटल करण्यासाठी, परकीय चलनाचं रुपांतर करण्यासाठी आणि प्रभावी व्यापार वित्त ऑपरेशन्सची हमी देण्यासाठी वापरता येते.  

पेमेंट रेमिटन्स 

व्होस्ट्रो खाती इतर लोकांना पैसे पाठवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. उत्तरदायी बँका ज्या राष्ट्रांमध्ये त्यांचे क्लायंट वारंवार पैसे पाठवतात किंवा प्राप्त करतात अशा देशांतील संवादक बँकांमध्ये व्होस्ट्रो खाती ठेवू शकतात, ज्यामुळे जलद आणि सुलभ क्रॉस-बॉर्डर रेमिटन्स व्यवहार करणे सोपे होते. 

परकीय चलन व्यवहार

व्होस्ट्रो खात्याच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या खातेदारांना परकीय चलनाच्या व्यवहारांसाठी परकीय चलनामध्ये पैसे ठेवण्याची परवानगी असते. चलन बदलने, परकीय चलनात व्यापार करण्यासाठी किंवा वारंवार परकीय चलनाचे व्यवहार करणाऱ्या बँकांसाठी या खात्याचा चांगला फायदा होतो.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Swiss Bank : स्विस बँकेत खातं असणं म्हणजे तुम्ही जगातल्या श्रीमंतांच्या क्लबमधले सदस्य असल्याचं द्योतक मानलं जातं. संपत्तीची सुरक्षितता, गुंतवणूक
Senior Citizen Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांना आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्यविमा काढता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास
Mobile charger:अनेकदा आपण या उपकरणाचे चार्जर्स हे प्लगमध्ये बटन सुरु ठेवून (स्वीच ऑन) तसेच ठेवतो. मात्र, चार्जर्स सतत प्लग इन

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ