तुमचे डोळे ‘कोरडे’ का पडत आहेत?

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर इतका ताण आलाय की, आता अनेकांना 'डोळे कोरडे पडणे' किंवा 'ड्राय आय सिंड्रोम'चा त्रास सुरू झाला आहे. डोळ्याची निगा राखताना या कोरडेपणाकडे वेळीच लक्ष देऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे.
[gspeech type=button]

आजचा काळ ‘डिजिटल’ आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाईल असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो, किंवा मित्रांसोबत गप्पा मारणं; आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर इतका ताण आलाय की, आता अनेकांना ‘डोळे कोरडे पडणे’ किंवा ‘ड्राय आय सिंड्रोम’चा त्रास सुरू झालाय.

तुमच्या डोळ्यांना जळजळ होतेय? खाज सुटतेय? वाचताना किंवा गाडी चालवताना धुरकट दिसतंय? मग थांबा! तुम्ही तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घेत नाहीयेत.

आपला डोळा ओला का राहतो?

आपले डोळे नैसर्गिकरित्या नेहमी ओले (Lubricated) असले पाहिजेत, नाहीतर डोळ्यांना त्रास होतो. आणि हा ओलावा टिकवून ठेवण्याचं काम आपले अश्रू करतात.हे काम आपले अश्रू करतात. ही आपले ‘अश्रू’ म्हणजे फक्त साधं पाणी नाही. ते तीन महत्वाच्या थरांनी बनलेले असतात:

– तेलाचा थर (Oil Layer): हा डोळ्यावरचा कवच आहे. हा थर असल्यामुळेच डोळ्यातील पाणी लवकर हवेत बाष्पीभवन होऊन उडून जात नाही.

– पाण्याचा थर (Water Layer): हा मधला थर डोळ्यांना खरं ओलावा देतो आणि धूळ, कचरा साफ करतो.

– बुळबुळीत थर (Mucus Layer): हा सगळ्यात आतला थर असतो, जो पाणी डोळ्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थित पसरवून ठेवतो.

या तीन थरांपैकी एका जरी थरामध्ये बिघाड झाला, तरी डोळा कोरडा पडतो. आजकाल, स्क्रीनच्या जात वापरामुळे होणारा कोरडेपणा हा बहुतेकदा तेलाचा थर कमी झाल्यामुळे किंवा तेल तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये बिघाड झाल्यामुळे होतो.

डोळे कोरडे पडल्याची लक्षणे काय?

जर तुमचे डोळे कोरडे पडत असतील, तर तुम्हाला खालील त्रास जाणवू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका:

– सतत खाज सुटणे किंवा जळजळ होणे.
– डोळे वारंवार लाल दिसणे.
– डोळ्यात सतत कचरा किंवा बारीक कण गेल्यासारखे वाटणे.
– सकाळी उठल्यावर डोळे उघडायला त्रास होणे किंवा डोळे चिकटल्यासारखे वाटणे.
– प्रकाश सहन न होणे
– मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्यावर डोळे लवकर थकणे.
– स्क्रीनकडे बघताना किंवा वाचताना मध्येच धुसर दिसणे आणि पापणी मिचकावल्यावर परत स्पष्ट दिसणं.

‘ब्लिंकिंग’ विसरलो आणि त्रास वाढला

आपण नकळतपणे प्रत्येक मिनिटाला 12 ते 15 वेळा आपल्या डोळ्यांची उघडझाप करतो. ही एक ‘मास्टर सायकल’ आहे आणि याचे काही फायदे देखील आहेत. यामुळे अश्रूंचा पातळ थर डोळ्यांवर पसरतो. आपल्या पापण्यांमध्ये तेलाच्या ग्रंथी असतात, त्यांची उघडझाप केल्यावर यावर दाब येतो आणि तेल बाहेर पडून पाण्याची वाफ होण्यापासून संरक्षण करते.

पण, आपण जेव्हा स्क्रीन बघत असतो तेव्हा त्यात इतके गुंतून जातो की डोळे मिचकायला देखील आपण विसरतो. यामुळे आपला ब्लिंकिंग रेट 12-15 वरून थेट फक्त 4-5 वेळा प्रति मिनिट इतका कमी होतो.

याचा परिणाम काय होतो तर, यामुळे तेलाच्या ग्रंथींवर दाब येत नाही आणि पुरेसे तेल बाहेर पडत नाही. डोळ्यातील तेलाचा थर कमी होतो आणि डोळ्यातील पाणी लवकर उडून जाऊन डोळा कोरडा पडतो.

तुम्ही जर हे टाळलं नाही, तुमच्या डोळ्यातील तेलाच्या ग्रंथी कायमच्या बंद होऊ शकतात.

सोपे घरगुती उपाय आणि काही बदल

– स्क्रीनचा वापर कमी करा, मोबाईल, लॅपटॉपचा वापर गरजेपुरता मर्यादित ठेवा.

– 20-20-20 चा नियम पाळा म्हणजेच, दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी,20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे बघा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना लगेच आराम मिळतो.

– स्क्रीन बघत असताना, दर 3-4 मिनिटांनी हळूवारपणे आणि पूर्णपणे डोळे उघडून-बंद करा.

– एक स्वच्छ कापड कोमट पाण्यात भिजवून ते डोळ्यांवर 5 मिनिटे ठेवा. यामुळे ब्लॉक झालेल्या तेल ग्रंथी उघडतात आणि तेल सहज बाहेर पडते.

– तुमच्या डॉक्टरांना विचारून कृत्रिम अश्रू (Artificial Tears) आय ड्रॉप्स वापरा. हे डोळ्यांना बाहेरून ओलावा देतील.

– रोज 8 तास शांत झोप आणि रोजचा ताणतणाव कमी केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य
BIS ही इतर बँकांप्रमाणे नाही. सामान्य माणसांकरता या बँकेची सेवा नाही. आणि ही बँक कोणाला कर्जही देत नाही. देशाची मध्यवर्ती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ