केसगळती होणं हे आपण नेहमी सौदर्यांशी जोडत असतो. त्यामुळेच आपण आपल्या तेलामध्ये, शॅम्पूमध्ये बदल करतो. किंवा लगेच सलोनमध्ये धाव घेऊन विविध ट्रीटमेंटेस घेतो. पण केस गळती ही खरं तर आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. आपल्या शरीरातील विविध घटक, हार्मोन्स, आपण खात असलेले अन्नपदार्थ, ताणतणाव, जीवनशैली अशा सगळ्या गोष्टींचा संबंध केसगळती आहे.
भारतात शहरी ताणतणाव, चुकीची माहिती आणि सोशल मीडियावरील वाढत्या आकर्षक सेल्फ इमेजच्या दबावामुळे केस गळणे ही आता सर्वच वयोगटातील लोकांची समस्या झाली आहे.
केसगळतीची कारणं
मुंबईतील स्किन सागा सेंटर फॉर डर्मेटोलॉजीचे संचालक आणि मुख्य त्वचारोगतज्ज्ञ असीम शर्मा यांच्या मते, भारतीय रुग्णांमध्ये केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अलोपेसिया. ही स्थिती मुख्यत्वे अनुवंशिकता आणि हार्मोन्समुळे होते जी पुरुष आणि महिला या दोघांमध्येही दिसून येते.
दुसरं कारण आहे, टेलोजेन एफ्लुव्हियम. म्हणजेच ताण, आजारपण किंवा व्हिटॅमिन डी, बी 12 आणि लोह यासारख्या पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळती होते. तीव्र टेलोजेन एफ्लुव्हियम काही महिन्यांत बरा होऊ शकतो. पण जर पूर्वीपासून एखाद्या रुग्णाला याचा त्रास असेल तर त्यांच्यावर वारंवार लक्ष देण्याची गरज असते.
तरुण रुग्णांमध्ये केस गळतीचा एक प्रकार जो विशेषतः जास्त त्रासदायक आहे तो म्हणजे अलोपेसिया एरियाटा. ही एक ऑटोइम्यून स्थिती असते. ज्यात अचानक, डोक्याच्या विशिष्ट भागातले केस न गळता संपूर्ण डोक्यावरचे केस झुपक्यात गळतात आणि अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, भुवया आणि पापण्यांसह शरीरावरील इतर भागातील केसही गळू शकतात. अशा रुग्णांना त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणं अत्यावश्यक असते.
पॅथॉलॉजिकल नुकसान
काही वेळेला अशी काही मेडिकल कारणं नसतानाही केस गळती होत असते. या दोन्ही प्रकारामध्ये फरक कसा ओळखायचा हे जाणून घेऊयात.
सरासरी, दररोज 50 ते 100 केस गळणे हे केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्राचा एक भाग असतो. केस गळण्याची क्रिया जर अचानक वाढू लागली. किंवा डोक्यावरील विशिष्ट भागातलेच केस गळू लागले, त्याबरोबरच डोक्याच्या त्वचेवर ठिपके, लालसरपणा, स्केलिंग किंवा भुवया किंवा दाढीसारख्या ठिकाणाचे केस गळू लागले तर त्यावर उपचार घेणं गरजेचं असतं.
यासाठी एक साधी चाचणी करायची. यामध्ये हलक्या हाताने काही केस ओढायचे. त्यात किती केस खेचले वा तुटले जातात ते तपासायचं. जर 10 किंवा 15 पेक्षा जास्त केस मुळासकट तुटले तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.
आज केस गळतीमध्ये एक महत्त्वाचा गुंतागुंतीचा घटक म्हणजे ओव्हर-द-काउंटर उपचारांमध्ये वाढ झाली आहे. ओव्हर-द-काउंटर म्हणजे कोणताही शास्त्रीय आधार नसलेली उत्पादने केस गळतीवरील उपाय, औषधे म्हणून सहज विकली जाणं. सोशल मीडियावर अशा उत्पादनांचा आणि त्यांच्या जाहिरातीचा सुळसुळाट पाहायला मिळतो. या अशा उत्पादनांमध्ये अनेकदा धोकादायक स्टिरॉइड्स असतात. ज्याचा गंभीर परिणाम हार्मोन्सवर होतो. यामुळे केस गळतीची समस्या आटोक्यात येण्याऐवजी आणखीन गंभीर होऊ शकते. या अशा उत्पादनातील घटकांची माहिती ही त्यांच्या लेबल्सवर दिलेली नसते.
केसगळतीवर मिनोऑक्सिडिल आणि फिनास्टराइड सारख्या उपचारांची गरज असते. अनेक दशकांपासून यावर अभ्यास होऊन शास्त्रियरित्या या उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. मात्र, अनेकदा या उपचाराकडे दुर्लक्ष केलं जातं. पुरेशा माहितीच्या अभावामुळे रुग्ण या उपचार पद्धती करण्याऐवजी बाजारात सिद्ध न झालेले औषधे घेण्यावर भर देतात.
हे ही वाचा : केसांच्या आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध ट्रीटमेंट्स – फायदे, पद्धती, खर्च आणि दुष्परिणाम
मानसिक परिणाम
केस गळतीमुळे होणारा मानसिक परिणाम हाही तितकाच महत्त्वाचा. पण विशेषत: या मुद्यावर पुरेशी चर्चा केली जात नाही. विशेषत: महिलांना केस गळतीमुळे चिंता, नैराश्य येतं. ते हळूहळू समाजापासून दूर राहू लागतात. स्त्रियांच्या सौदर्यांच्या व्याख्येमध्ये केसाचं विशेष महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे केसगळती होऊ लागल्यावर मनात न्यूनगंड निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो. अशी प्रकरणं अत्यंत काळजीपूर्वत हाताळणं गरजेचं असतं. केस गळतीवर उपचार घेत असतानाच, मानसिक आरोग्य दृढ ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचीही भेट घेणं गरजेचं असतं. कारण केस परत आणण्यासोबतच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं असतं.
भविष्यातील उपचार
ट्रायकोस्कोपी सारख्या तंत्रज्ञानामुळे नॉन-इनवेसिव्ह स्कॅल्प आणि फॉलिकलचा अभ्यास करुन आता उपचार करता येतात. ओरल मिनोऑक्सिडिल, इंजेक्शन आणि टॉपिकल अँटी-अँड्रोजेन सारख्या उपचारांसह जेएके इनहिबिटरसारख्या नवीन उपचार पद्धतीचाही उपयोग केला जातो.
मुख्यत: केस गळतीचं अचूक निदान करून प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार औषधोपचार करण्याची गरज असते. अनुवांशिक आणि बायोमार्कर-आधारित कस्टमायझेशनमुळे त्वचारोगतज्ज्ञांना योग्य ती काळजी घेत अन्य डोनर्सकडून केस घेणं शक्य होऊ शकते. मात्र, सध्या पात्र प्रदात्याची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्कॅल्पवरील डिस्बायोसिस किंवा मायक्रोबियल असंतुलनामुळे जळजळ होते आणि शेवटी केस पातळ होऊ लागतात. अशा स्थितीत ज्या महिलांचे स्कॅल्प संवेदनशील किंवा फ्लॅकिंग स्कॅल्प आहेत अशा महिलांना पोस्टबायोटिक-इन्फ्युज्ड शैम्पू, अँटी-इंफ्लेमेटरी वनस्पतिशास्त्र आणि वारंवार केस स्वच्छ करणं गरजेचं आहे.
टेक्सचर्ड किंवा कुरळे केसांच्या प्रकारांसाठी केसांची काळजी घेताना केसांमध्ये वा स्कॅल्पवर हायड्रेशन राहिल, हलक्या हाताने केसांमधील गुंता सोडवणं आणि केसांवर कोणत्याही मशीनचा वापर करू नये. कुरळे केस असलेल्या व्यक्तींमध्ये केस गळण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकदा घट्ट केशरचना, केस जास्त सरळ करणे आणि स्काल्प स्वच्छ करण्यासाठी जोरात घासणे यामुळे ही समस्या वाढते.
सोशल मीडियाचे परिणाम
बरेच जण केसगळतीवर जलद उपाय किंवा घरगुती उपचारांना प्रोत्साहन देतात. सोशल मीडियावरील काही उपचारातून केस गळती कमी करण्यास मदत केली असली तरी, कोणताही शास्त्रिय आधार नसलेल्या सल्ल्यांचा प्रसार वेगानं होणं हे चिंताजनक आहे. ट्रायकोलॉजी ही उपचार पद्धत सर्वांसाठी एकसारखी नाही. जे एका व्यक्तीसाठी काम करते ते दुसऱ्यासाठी काम करू शकत नाही. कदाचित त्यामुळे जास्त नुकसान होऊ शकते. रोझमेरी ऑइल किंवा कॅफिनसारखे नैसर्गिक घटक आहेत जे लवकर क्षमता दर्शवतात. पण त्याला शास्त्रिय आधार असणं गरजेचं आहे.
केस गळणे ही एक क्लिनिकल, भावनिक आणि सामाजिक समस्या आहे. हा केवळ सौदर्यांशी संबंधित मुद्दा नाही. केसांचे आरोग्य हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशीही संबंधित आहे. त्यामुळे शॉर्टकट नाही तर विज्ञानाने सिद्ध झालेल्या औषधोपचाराचा मार्ग अवलंबणे गरजेचं आहे.