तिरूपती लाडूचे अर्थकारण

Source : India Eagle
तिरूपती (Tirupati Balaji Temple ) लाडू प्रसादात जनावराची चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश आढळला. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर मोठा वादंग निर्माण झाला आहे. भाविकांच्या श्रध्देचा विषय तर उफाळून आलाच आहे. पण प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.
[gspeech type=button]

तिरूपतीला बालाजीच्या दर्शनाला गेले नाहीत तरी तिथल्या प्रसादाच्या लाडवाचं आकर्षण बऱ्याच लोकांना आहे. या लोकप्रियतेमुळेच भारतातील कित्येक देवस्थानांमध्ये लाडू प्रसाद मिळायला लागला.

याच लाडू प्रसादात जनावराची चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश आढळला. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर मोठा वादंग निर्माण झाला आहे. भाविकांच्या श्रध्देचा विषय तर उफाळून आलाच आहे. पण प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.

या साऱ्या गोष्टीवर आता राजकारण आणि चर्चा सुरू आहे. पण तिरूपती देवस्थानला नक्कीच चिंता लागून राहिली असेल तर ती कोट्यावधी रूपयाची कमाई करून देणाऱ्या लाडूच्या प्रसादाची.

होय, तिरूपती मंदिर प्रशासनाला या प्रसादाच्या लाडूच्या माध्यमातून वर्षाला 400 ते 600 कोटी रूपयांची कमाई मिळते.
तर पाहुयात हे स्पेशल लाडू कुठे, कसे बनवतात आणि हे लाडूंचं अर्थकारण नेमकं कसं आहे?

तिरूपती प्रसादाची बांधणी

तिरूपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू हे मंदिर आवारातच बांधले जातात. हा विभाग मंदिर प्रशासनाच्याच अखत्यारित आहे. या लाडवांसाठी बेसन, साखर, शुद्ध देशी तूप आणि अन्य जिन्नसांचा वापर करत असल्याचं सांगितलं जातं.
रोज लाखो भाविक बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात. यासाठी दररोज साडेतीन लाख लाडू बनवले जातात. लाडूसाठी आवश्यक ती ठरलेली पाकक्रीया करून, तयार मालाला लाडूच्या साच्यामध्ये ठेवतात. या साच्यांमध्ये एका वेळी 5 हजार 100 लाडू बांधले जातात.

प्रसादाची किंमत

या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या लाडवांचे वजनांनुसार तीन भाग आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यावर छोट्या आकाराचा लाडू प्रसाद म्हणून दिला जातो. हा लाडू विनामूल्य असून, या लाडूचं वजन हे 40 ग्रॅम असतं.
त्यानंतर भाविकांना अतिरिक्त प्रसाद म्हणून लाडूंची खरेदी करता येते. त्यामध्ये दोन पर्याय आहेत. एक मध्यम आकाराचा म्हणजे 175 ग्रॅमचा लाडू असतो, त्याची किंमत 50 रूपये आहे. तर, दुसरा सगळ्यात मोठ्या आकाराचा 750 ग्रॅम वजनाचा, ज्याची किंमत 200 रूपये आहे.

लाडवाची शेल्फ लाईफ आणि पॅकेजिंग

हे लाडू ऑटोमेटिक मशिनच्या साहाय्याने प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक केले जातात. या पॅकेजिंगची किंमत 50 पैसे आहे. हा प्रसादाचा लाडू तयार केल्यापासून पुढच्या 15 दिवसांपर्यंत टिकतो. त्यामुळे अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर याची खरेदी करतात.

प्रसादाची विक्री

तिरूपती मंदिर परिसराशिवाय वेस्ट माडा रोड इथंही तिरूपती मंदिरातल्या प्रसादाची विक्री केली जाते. इथं टीटीडी म्हणून एक काऊंटर आहे, तिथून आपण मंदिरात न जाता थेट प्रसादाची खरेदी करू शकतो. इथं ही मध्यम व मोठ्या आकाराचा लाडू अनुक्रमे 50 आणि 200 रूपयाला विकला जातो.

प्रसादाचे अर्थकारण

देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून तिरूपती मंदिराची ओळख आहे. लाखो भाविक दररोज या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात प्रवेश शुल्क आकारले जाते. त्यातून मंदिर प्रशासनाला वर्षाला 338 कोटी रूपये मिळतात. तर सगळ्यात जास्त कमाई ही प्रसादातून होत असते. दिवसाला साडेतीन लाखाचे प्रसादाचे लाडू विकले जातात. यातून ट्रस्टला वर्षाला सुमारे 400 ते 600 कोटी रूपये मिळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ