अमेरिकेतील प्रेसिडेंशियल डिबेट

Source : NY1
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी प्रेसिडेंशियल डिबेट हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या डिबेटमध्ये उमेदवारांना आपले विचार, धोरणं आणि राष्ट्रबांधणी व विकासाच्या संकल्पना जनतेसमोर प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळते.
[gspeech type=button]

गेले काही दिवस प्रेसिडेंशियल डिबेट असं वारंवार ऐकायला मिळतं आहे. काय आहे हे प्रेसिडेंशियल डिबेट ?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी प्रेसिडेंशियल डिबेट हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या डिबेटमध्ये उमेदवारांना आपले विचार, धोरणं आणि राष्ट्रबांधणी व विकासाच्या संकल्पना जनतेसमोर प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळते.

“कमिशन ऑन प्रेसिडेंशियल डिबेट्स” ही अमेरिकन संस्था 1988 पासून या प्रेसिडेंशियल डिबेटचे आयोजन करत आहे. यामुळे मतदारांना उमेदवारांची तुलना करून योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीच्या जवळपास दीड वर्षांआधीच सुरू होते. या निवडणूक प्रक्रियेतील ‘प्रेसिडेंशियल डिबेट’ हा एक महत्त्वाचा भाग असतो. डिबेट्समध्ये उमेदवारांना विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये देशातील आर्थिक स्थिती, परराष्ट्रीय धोरण, सामाजिक मुद्दे, पर्यावरण आणि असे अनेक विषय असू शकतात.

डिबेट्समुळे मतदारांना उमेदवारांचं व्यक्तिमत्व, विचार आणि नेतृत्व क्षमतेची चांगली कल्पना येते. मतदारांना आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं? हे ठरवण्यास या डिबेट्सची मदत होते.

मतदानाच्या निकालावरही या डिबेट्सचा मोठा प्रभाव पडतो. एखाद्या उमेदवारासाठी एक चांगली डिबेट लोकप्रियतेत वाढ करू शकते. तसंच डिबेटमध्ये उमेदवार त्याचे मुद्दे व्यवस्थितपणे पटवून देऊ शकला नाही, तर त्यांच्या लोकप्रियतेत घट होऊ शकते.

न्यूज चॅनेल्स आणि राजकीय तज्ञ या डिबेट्सनंतर उमेदवारांच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करतात. कोणत्या उमेदवाराने अधिक प्रभावी युक्तिवाद केले आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे दिली यावरही चर्चा रंगतात.

डिबेट्सनंतर ओपिनियन पोल आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा आधार घेऊन जनतेच्या मताचा अंदाज घेतला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ