जागतिकदृष्ट्या महत्त्वाचं वाढवण बंदर कसं आहे?

सौजन्य : इंडिया इन्फ्रा हब
पालघरजवळच्या वाढवण येथे उभारलं जाणारे वाढवण बंदर हे जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी एक बंदर म्हणून ओळखलं जाणार आहे. तर देशातलं क्रमांक एकच बंदर असणार आहे. या बंदराच्या माध्यमातून आपल्याला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशांसोबत व्यापार करणं अधिक सोपं होणार आहे.
[gspeech type=button]

भारतातल्या सर्वात मोठ्या वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हे बंदर पालघरजवळच्या वाढवणमध्ये ‘ऑल वेदर ग्रीनफील्ड’ या संकल्पनेवर उभारलं जाणार आहे. जगातल्या प्रमुख 10 बंदरांपैकी हे एक बंदर असणार आहे. वाढवण बंदराची जागा ही अत्यंत खास आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर असेल. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतील. या बंदराचं बांधकाम दोन टप्प्यामध्ये ‘लँड लॉर्ड पोर्ट’च्या आधारावर केलं जाईल. त्यासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

कसे असेल वाढवण बंदर?

सध्या देशात असलेल्या बंदरांमध्ये या बंदराची क्षमता सर्वात जास्त होणार आहे. या बंदरामध्ये चार बहुउद्देशीय बर्थ असतील. त्याचबरोबर चार लिक्विड बल्क बर्थ, एक आरओ-आरओ बर्थ, स्मॉल क्राफ्ट, कोस्ट गार्ड बर्थ आणि रेल्वे टर्मिनलचा समावेश आहे. वाढवण बंदरामध्ये 10.4 किलोमीटर लाँग ब्रेक वॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, शोर प्रोटेक्शन, बंड, टग बर्थ, एप्रोच ट्रेस्टल्स एंड अनपेव्ड डेवल्पड लँड आणि रेल्वे आणि रोड लिंकेजचे निर्माण केले जाईल. त्याचबरोबर ऑफ डॉक रेल्वे यार्ड, रेल्वे एक्सचेंज यार्ड, पॉवर अँड वाटर आणि अंतर्गत रस्त्यांसह कोर अँड कॉमन इंफ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली जाईल.

नैसर्गिक बंदर असल्याने महत्त्व

आपल्या देशात इतकं मोठं कोणतही कंटेनर पोर्ट नाही. त्यामुळे मालाची ने-आण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. देशाची अर्थव्यवस्थेलाही यामुळे बळ मिळेल. वाढवण बंदरच्या बांधकामाला फेब्रुवारी 2020 मध्ये सागरमाला प्रोजेक्टमध्ये मंजुरी मिळालेली. 2014 पासूनच हे बंदर विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील होतं. त्यामुळे या बंदराला मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हटलं जातं. हे बंदर आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गापासून काही अंतरावरच असल्यामुळे या बंदराला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, हे बंदर विकसित झाल्यानंतर भारताला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशांसोबतची व्यापाराची गरज पूर्ण करता येईल.

जगातील पहिल्या दहा बंदरात समावेश

देशाच्या वाढती अर्थव्यवस्थेचा विचार करून ‘डीप ड्रॉफ्ट पोर्ट’ची निर्मिती केली जात आहे. सरकार याच उद्देशाने हे बंदर विकसित करत आहे. त्यामुळे देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता पूर्ण होईल. या बंदराचा विकास झाल्यानंतर देशातील पायाभूत सुविधा आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरणाला चालना मिळेल. या बंदरातून कोळसा, सिमेंट, रसायने आणि इंधनाची वाहतूक होईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. या बंदराची क्षमता 24.5 मिलियन टीईयू आहे. देशातील अन्य कोणत्याही बंदराला नैसर्गिक मर्यादेमुळे ही क्षमता गाठणे शक्य नाही.

चाबहार बंदराशी कनेक्शन

वाढवण बंदर तयार झाल्यानंतर देशाला त्याचा आणखी फायदा होईल. इराणमध्ये चाबहार बंदर विकसित होत आहे. इराणसोबत चाबहार करार झाल्यानंतर या मार्गाचा आणखी चांगला फायदा आपल्याला होईल. भारत अधिक क्षमतेनं आपल्या मालाची निर्यात करू शकेल. वाढवण बंदरातून चाबहार बंदराच्या मार्गाने युरोप, मध्य आशिया आणि अगदी रशियापर्यंत मालाची आयात-निर्यात करणं आपल्याला अधिक सोपं होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ