भारतीय पुरुषांसाठी कुर्ता पायजमा हे एक खास आणि पारंपरिक पोषाख आहे. आजही अनेकजण लग्न समारंभात किंवा इतर पारंपरिक कार्यक्रमांमध्ये कुर्ता पायजमा आवर्जून घालतात. कारण यात आहे आपल्या संस्कृतीची ओळख आणि सोबतच मिळतो एक खास आणि आकर्षक लुक!
पिढ्यानपिढ्यांपासून हे वस्त्र भारतीय पुरुषांच्या वेशभूषेचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. पण आताच्या फॅशनच्या जगातही कुर्ता पायजमाची क्रेझ कमी झालेली नाही. उलट, डिझायनर्सनी यात नवनवीन स्टाईल्स आणून त्याला आणखी खास बनवलं आहे.
आजकाल तुम्हाला कुर्ता पायजमामध्ये अनेक रंग, डिझाईन्स आणि फॅब्रिक्स मिळतील. साधा कॉटनचा कुर्ता पायजमा रोजच्या वापरासाठी उत्तम असतो. तर सिल्क किंवा इतर जरीच्या कामाचा कुर्ता पायजमा तुम्ही खास कार्यक्रमांसाठी निवडू शकता.
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुर्ता पायजामाचे 5 खास पर्याय, जे तुम्हाला पारंपरिक लूक तर देतीलच, पण स्टाईलच्या बाबतीतही तुम्ही मागे राहणार नाही!
उरी अँड मॅकेंझी
‘उरी अँड मॅकेंझी’चा सिल्क मिक्स कुर्ता पायजामा पुरुषांसाठी पारंपरिक आणि सुंदर निवड आहे. चांगल्या सिल्क मिक्स कपडापासून बनलेला आणि बारीक नक्षीकामामुळे कुर्ता आकर्षक दिसतो. तसेच कुर्ता आरामदायक असल्याने लग्न, सण किंवा औपचारिक कार्यक्रमांसाठी चांगला आहे.
वस्त्रामय
‘वस्त्रामय’चा नेहरू जॅकेट आणि कुर्ता सेट पारंपरिक पोशाखासाठी पुरुषांना छान आणि वेगळा लूक देतो. हा कॉटनचा सेट आरामदायक आहे. जॅकेटवर सुंदर पानांची डिझाइन आहे, जी जुनी आणि नवीन फॅशन एकत्र आणते. सण, घरगुती कार्यक्रमांसाठी हा क्लासी आणि स्टायलिश पर्याय आहे.
हेही वाचा:चांदीचे दागिने सगळ्यांनाच शोभतात का? जाणून घ्या योग्य स्टाइलिंग टिप्स!
मान्यवर वेलवेट कुर्ता सेट
मान्यवरचा वेलवेट कुर्ता सेट शाही दिसण्यासाठी एकदम बेस्ट आहे. तो चांगल्या मखमली कापडाचा आहे, त्यावर सुंदर प्रिंट्स आहेत आणि तो अंगाला व्यवस्थित बसतो. या सेटमधील जॅकेट खूप छान आणि शाही डिझाइनचं असल्यामुळे तुमचा लूक आणखी खास होतो. लग्न, रिसेप्शन किंवा मोठ्या पार्ट्यांसाठी हा कुर्ता सेट तुम्हाला खास बनवतो.
एक्झोटिक इंडिया
एक्झोटिक इंडिया’चा लिनेन कुर्ता पायजामा सेटच्या साध्या डिझाइनमुळे तो रोजच्या वापरासाठी किंवा धार्मिक कार्यांसाठी योग्य आहे. पूजा किंवा सणांसाठी हा एक चांगला आणि नेहमी आवडणारा पर्याय आहे.
हेही वाचा: पारंपरिक कपड्यांना नवीन ट्विस्ट!
ओओरा कॉटन सेट
मऊ आणि हवा खेळत्या राहणाऱ्या कॉटनपासून बनलेला हा सेट आराम देतो आणि पारंपरिक लूकही जपतो. या कुर्ता सेटची डिझाइन साधी पण छान आहे. जी रोजच्या वापरासाठी किंवा साध्या कार्यक्रमांसाठी उत्तम आहे. पायजामा पण आरामदायक फिटिंगचा आहे. घरातला कार्यक्रम असो किंवा कोणताही सांस्कृतिक उत्सव, हा सेट तुम्हाला आरामदायक आणि छान भारतीय लूक देईल.