किचनमधून झुरळं पळवून लावण्यासाठी ‘हे’ आहेत काही सोपे उपाय 

Cockroach:किचनमध्ये ही घाणेरडी झुरळं इकडे-तिकडे फिरताना पाहिली की अक्षरश: संताप येतो. आणि हे किळसवाणे जीव आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.
[gspeech type=button]

आपण स्वयंपाकघरात काम करत असताना किंवा इतर वेळेस ही कधी झुरळ दिसलं की किती किळस येते ना ? किचनमध्ये ही घाणेरडी झुरळं इकडे-तिकडे फिरताना पाहिली की अक्षरश: संताप येतो. आणि हे किळसवाणे जीव आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. ही झुरळं गरम आणि ओलसर वातावरणात खूप वेगाने वाढतात. म्हणूनच स्वयंपाकघर त्यांचं आवडतं ठिकाण बनतं आणि बाथरूम तर त्यांचं मुख्य लपण्याचं ठिकाण असतं.

हे नको असलेले पाहुणे दिसायला तर घाण वाटतातच, पण ही झुरळं आपल्या अन्नात आणि भांड्यांवर बसून बॅक्टेरिया आणि ॲलर्जी पसरवतात, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच, आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि झुरळांपासून मुक्त ठेवणं खूप गरजेचं आहे.

झुरळं लपतात कुठे?

झुरळं सहसा रात्रीच बाहेर पडतात. तुम्हाला जर दिवसा एखादं झुरळ फिरताना दिसलं, तर याचा अर्थ तुमच्या घरात त्यांचा खूप जास्त सुळसुळाट झाला आहे. झुरळं आपलं शरीर सपाट करून अगदी बारीक जागेतही लपतात. ते रबर मॅटखाली, पलंगाच्या चौकटीमागे आणि भिंतींच्या बारीक भेगांमध्येही लपून बसू शकतात.

या झुरळांना किचनमधून आणि घरातील इतर जागी जिथे कुठे झुरळ लपून बसतात तिथून बाहेर काढण्यासाठी आता तुम्हाला रासायनिक औषध किंवा महागड्या पेस्ट कंट्रोल करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करूनही आपल्या स्वयंपाकघराला झुरळांच्या त्रासापासून वाचवू शकता. चला तर मग, बघूया असे कोणते नैसर्गिक उपाय आहेत जे झुरळांना दूर ठेवतील आणि आपलं किचन स्वच्छ व सुरक्षित ठेवतील

झुरळांना पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय 

1.बेकिंग सोडा आणि साखर

झुरळांना गोड आणि पिठाचे पदार्थ खूप आवडतात. त्यांना घरातून पळवून लावायचं असेल, तर साखर आणि बेकिंग सोडा वापरून मिश्रण तयार करा. एका लहान वाटीत साखर आणि बेकिंग सोडा सारख्या प्रमाणात घ्या. आणि हे मिश्रण किचनच्या कोपऱ्यात किंवा घरात जिथे तुम्हाला झुरळं दिसतात, तिथे पसरा. साखरेच्या वासाने झुरळं या मिश्रणाकडे येतील आणि हे मिश्रण खाल्ल्यावर झुरळं मरतील आणि तुमचा झुरळांचा प्रश्नही मिटेल.

2. लसूण, कांदा आणि मिरीचा स्प्रे

झुरळांना लसूण आणि कांद्याचा वास अजिबात सहन होत नाही. किचनमधल्या कपाटांमध्ये लपलेल्या झुरळांना बाहेर काढण्यासाठी कांदा, लसूण आणि मिरी वापरून बनवलेला स्प्रे खूप कामाला येतो. लसूण आणि कांद्यामध्ये सल्फरचे घटक असतात आणि त्यांचा वास खूप तीव्र असतो, जो झुरळांना आवडत नाही. मिरीमध्ये ‘कॅप्सॅसिन’ नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे झुरळांना त्रास होतो. म्हणूनच या तीन गोष्टींचा वापर करून मिश्रण तयार करा आणि झुरळं आहेत त्या ठिकाणी ते स्प्रे करा त्याच्या वासाने किंवा संपर्कात आल्यास झुरळे लगेच पळून जातील.

3. बोरिक ॲसिड

बोरिक ॲसिड ह जेल किंवा पावडरच्या रूपात मिळतं आणि झुरळांचा नायनाट करण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे. बोरिक ॲसिडमध्ये एक खास प्रकारचा चार्ज असतो, ज्यामुळे ते झुरळाच्या शरीराला लगेच चिकटतं. जेव्हा झुरळ बोरिक ॲसिड असलेल्या जागेतून जातं, तेव्हा ती पावडर त्याच्या शरीरावर चिकटते. आणि ही पावडर त्यांच्या मज्जासंस्थेत जाऊन पोटातील विषासारखं काम करतं, त्यांच्या पचनसंस्थेला खराब करतं आणि शेवटी त्यांचा जीव घेतं.

4. तेजपत्ता

तेजपत्त्याचा वास झुरळांना अजिबात आवडत नाही. झुरळांना पळवून लावण्यासाठी तेजपत्ता थोडा बारीक करून घ्या आणि जिथे तुम्हाला झुरळं दिसतात, तिथे पसरा. यामुळे झुरळं नक्कीच दूर पळतील. याशिवाय, तुम्ही किचन कॅबिनेट आणि ड्रॉवरमध्येही अखंड तेजपत्ता ठेवू शकता, म्हणजे त्याचा वास बराच काळ टिकेल आणि झुरळं फिरकणार नाहीत.

 5. कडुलिंबाचं तेल 

कडुलिंबाच्या तेलामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतात. ते झुरळांच्या वाढीला अडथळा आणून त्यांना दूर ठेवतं. कडुलिंबाच्या तेलात ‘अझाडीराक्टिन’ नावाचं एक रसायन असतं, जे झुरळांच्या हार्मोनल संतुलनाला बिघडवतं, त्यामुळे त्यांना अंडी घालता येत नाहीत. तुम्ही हे कडुलिंबाचं तेल पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि हे मिश्रण सिंकखाली, घरातील उपकरणांच्या मागे आणि झुरळं लपतात अशा फटींमध्ये फवारा.

या काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमच्या किचनला झुरळांपासून सुरक्षित ठेवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Lifestyle: पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्ग आजार होऊ शकतात.गरोदर महिलांसाठी हा काळ थोडा काळजीचा असतो. कारण या दिवसांमध्ये आपल्या पोटातल्या बाळाला
Need More Sleep :खरं तर, आजकाल पुरुष आणि स्त्रिया दोघंही झोपेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. बऱ्याचदा त्यांना पुरेशी झोप मिळत
Lifestyle: केस म्हणजे आपल्या सौंदर्यात भर घालणारी एक खास गोष्ट.योग्य हेअरस्टाईल निवडणं म्हणजे आपला पूर्ण दिवसाचा 'टोन' सेट करण्यासारखं आहे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ