रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. या काळात हार्मोनल बदलांमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. या बदलांना सामोरे जाण्यासाठी योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
रजोनिवृत्तीच्या काळातील सामान्य समस्या
रजोनिवृत्तीच्या काळात अनेक महिलांना झोप न येणे, मूड स्विंग्स, थकवा, शरीरात उष्णतेचे लहरी (हॉट फ्लॅशेस), आणि त्वचेशी संबंधित समस्या यांचा सामना करावा लागतो. पण या काळात योग्य उपाययोजना आणि जीवनशैलीतील बदल करून हा टप्पा आपल्याला आरामदायक बनवता येऊ शकतो.
रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना उपयोगात येतील असे काही खास प्रोटीन, औषधं बाजारात उपलब्ध आहेत जी या काळातील बदलांना सामोरे जाण्यास मदत करू शकतात.
1.गायट्री रजोनिवृत्ती प्रोटीन
हे प्रोटीन 40 वर्षांवरील महिलांसाठी उपयुक्त आहे. पेरि-मेनोपॉझल आणि मेनोपॉझल महिलांसाठी तयार केलेले हे प्लांट-बेस्ड प्रोटीन आहे. यात कॅल्शियम, फोलेट, लोह, व्हिटॅमिन D, अँटीऑक्सिडन्ट्स आणि अॅडॅप्टोजन्स आहेत, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी मदत करतात. हे प्रोटीन स्मूदी, ओट बाऊल किंवा पाण्यात सहज मिसळून वापरता येते.
2.शतावरी कॅप्सूल
शतावरी ही आयुर्वेदातील औषधी वनस्पती आहे. शतावरी कॅप्सूल हार्मोन संतुलन राखून हॉट फ्लॅशेस कमी करतात, थकवा कमी करतात आणि झोप सुधारतात. मात्र कोणताही पूरक आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3.प्लिक्स वुमन‘स सुपर साइडर विनेगर गमीज
या गमीजमध्ये सफरचंद सायडर व्हिनेगर, फोलेट, आणि विटॅमिन बी12 आहे. यामुळे पचन सुधारते, ऊर्जा वाढते, आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
4.बॉडी बटर आणि डीप क्रीम्स
रजोनिवृत्तिच्या काळात त्वचेला कोरडेपणा जाणवतो. यासाठी कोरफड, शिया बटर आणि बदामाचे तेल मिश्रित असलेले क्रीम्स वापरल्याने त्वचा मऊ आणि कोमल राहते.
5.स्लीपी ऑऊल चमोमाईल टी
झोप न लागण्याच्या समस्येसाठी कॅफिन-मुक्त चमोमाईल चहा खूप फायदेशीर आहे. या चहामुळे तणाव कमी होऊन झोप सुधारण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर एक कप चहा घेतल्याने आराम मिळतो.
“रजोनिवृत्ती हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा टप्पा सहज स्वीकारा आणि योग्य काळजी घेऊन आनंदी राहा,” असे गायट्री मेडिकल डायरेक्टर डॉ. सुदेशना रे सांगतात.
रजोनिवृत्तीच्या काळातील अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतल्यास हा टप्पा सहज पार करता येतो.