मॉनसून मेकअप हॅक्स: पावसाळ्यातही तुमचा चेहरा दिसेल फ्रेश!

Lifestyle: पावसाळ्यातही तुमचा चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसू शकतो, फक्त तुम्हाला मॅट आणि मॉइश्चरायझर यांचा परफेक्ट वापर कसा करता येईल हे माहीत पाहिजे.
[gspeech type=button]

पावसाळा सुरू झाला की वातावरणातील दमट हवामानामुळे आणि पावसामुळे चेहऱ्यावर लगेच तेलकटपणा येतो, चिकचिक वाढते आणि जर मेकअप केला असेल तर तो पटकन खराब व्हायला लागतो. पण काळजी करू नका. या पावसाळ्यातही तुमचा चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसू शकतो, फक्त तुम्हाला मॅट आणि मॉइश्चरायझर यांचा परफेक्ट वापर कसा करता येईल हे माहीत पाहिजे. चला, तर मग पाहूया, या पावसाळ्यात तुमचा मेकअप आणि चेहरा कसा फ्रेश ठेवता येईल.

पावसाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी ‘स्किनकेअर’ महत्वाचं

मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा तयार असणे खूप गरजेचं आहे. कारण चांगल्या मेकअपसाठी स्वच्छ त्वचा लागते. मेकअप करण्यापूर्वी तुमचा चेहरा चांगला धुवा. यासाठी असा फेसवॉश वापरा, जो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकेल. स्वच्छ त्वचेवर मेकअप खूप चांगला सेट होतो आणि तो टिकून राहतो.

पावसाळ्यात तेलकट मॉइश्चरायझर वापरू नका. त्याऐवजी जेल-बेस्ड किंवा वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील आणि चिकचिक होणार नाही. हे मॉइश्चरायझर त्वचेमध्ये पटकन शोषले जातात. तसचं मेकअप लावण्यापूर्वी प्रायमर लावणे खूप महत्त्वाचे आहे, तो त्वचेला गुळगुळीत करतो आणि मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत करतो. पावसाळ्यासाठी सिलिकॉन-बेस्ड प्रायमर उत्तम पर्याय आहे.

परफेक्ट मेकअपसाठी काही खास टिप्स

हलका फाउंडेशन वापरा

पावसाळ्यात आणि दमट हवेत जड फाउंडेशन वापरणे टाळा. त्याऐवजी, टिन्टेड मॉइश्चरायझर किंवा बीबी/सीसी क्रीम वापरा, यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक आणि हलका लूक येतो.

पावडर आणि क्रीम प्रोडक्ट्स

मेकअप जास्त काळ टिकवण्यासाठी क्रीम-बेस्ड ब्लश आणि हायलाइटर वापरा. पण ते सेट करण्यासाठी त्यावर थोडी हलकी पावडर लावा. यामुळे मेकअप जागेवर राहतो, पसरत नाही.

वॉटरप्रूफ प्रोडक्ट्स निवडा

पावसाळ्यात वॉटरप्रूफ काजळ, मस्करा आणि लिक्विड आयलायनरच वापरावे. यामुळे पावसात किंवा दमट हवेतही तुमचा डोळ्यांचा मेकअप नीट राहील.

न्यूड आणि हलक्या शेड्स 

डोळ्यांच्या आणि ओठांच्या मेकअपसाठी पीच, पिंक किंवा बेज सारखे हलके रंग निवडा. हे रंग पावसाळ्यासाठी फ्रेश आणि योग्य दिसतात. भडक रंग वापरणे सहसा टाळा.

मेकअप सेट करायला विसरू नका

तुमचा मेकअप व्यवस्थित सेट करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तो जास्त काळ टिकेल.

सेटिंग पावडर  

चेहऱ्यावर जिथे चिकचिक जास्त होते, जसे की कपाळ, नाक आणि हनुवटी या भागांवर हलकी सेटिंग पावडर लावा. यामुळे चेहरा मॅट दिसतो आणि तेलकटपणा कमी होतो.

सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप पूर्ण झाल्यावर शेवटी सेटिंग स्प्रे फवारा. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो आणि चेहऱ्याला ताजेपणा येतो.

हेही वाचा: पावसाळ्यातही रहा स्टायलिश!

आणखी काही महत्त्वाच्या मेकअप टिप्स

-चेहऱ्यावर जास्त तेल आल्यास, ते काढण्यासाठी नियमितपणे ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. यामुळे मेकअप खराब न होता अतिरिक्त तेल शोषले जाते.

-आठवड्यातून एकदा तुमचे मेकअप ब्रश आणि ब्लेंडर स्वच्छ करा. घाणेरड्या ब्रशनी त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते आणि यामुळे मेकअपही व्यवस्थित लागत नाही.

-लिपस्टिकसाठी मॅट आणि ट्रान्स्फर-प्रूफ फॉर्म्युला निवडा.

या सर्व टिप्स वापरून, तुम्ही पावसाळ्यात योग्य स्किनकेअर आणि मेकअप रूटीन फॉलो करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Lifestyle : वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना वेगवेगळ्या कंगव्यांची गरज असते. योग्य कंगवा वापरल्याने केस तुटत नाहीत, गळत नाहीत आणि डोकेदुखीचा त्रासही
Our traditional sarees : आपल्या देशातील अशा काही साड्या आहेत ज्यांना युनेस्कोचं (UNESCO) संरक्षण मिळालं आहे, म्हणजेच युनेस्को कडून या
Lifestyle: आपण तरुण दिसावं यासाठी फक्त बाजारात मिळणारी महागडी क्रीम लावणं पुरेसं नाही. तर आपली जीवनशैली, आहार या सगळ्या गोष्टी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ