हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

Winter : आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होणं सामान्य आहे. त्यामुळे शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी आपण काही सोपे उपाय करुन आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
[gspeech type=button]

डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. या काळात अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. कारण थंड हवामानात बॅक्टेरिया आणि व्हायरस अधिक प्रमाणात वाढतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होणं सामान्य आहे. त्यामुळे शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी आपण काही सोपे उपाय करुन आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

1. नियमित व्यायाम 

हिवाळ्यात व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. थंडीमुळे अनेकजण व्यायाम करणे टाळतात. पण त्याऐवजी नियमित शारीरिक हालचाली केल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते. यामुळे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

2. पोषणयुक्त आहार 

हिवाळ्यात मांसाहार, धान्य, शेंगा, ताज्या फळांसोबतच पालेभाज्या, सुकामेवा, बीन्स आणि विविध प्रकारचे मसालेदार पदार्थ घेणे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

3. पुरेसे पाणी पिणे

हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन लिटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

4. त्वचेला मॉइश्चरायझर लावणे 

हिवाळ्यामधील थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा ड्राय होते यासाठी मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक आहे. यामुळे ओठ फाटणे आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या आपल्याला टाळता येतात.

5. तेल मालिश

थंडीत हात-पाय गरम ठेवण्यासाठी नियमित तेल मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला उब मिळते. यासाठी तुम्ही वॉर्मिंग लोशन किंवा निलगिरी , दालचिनीसारखे घटक असलेले तेल वापरू शकता.

6. शरीर ॲक्टिव्ह ठेवणे

चालणे, धावणे आणि इतर हलक्या व्यायामांमुळे तुमच्या हात आणि पायांमध्ये रक्त प्रवाह वाढवू शकतात शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच शरीराला उब मिळते.

7. गरम पेये प्या

आले,दालचिनी, हळद यांसारख्या मसाल्यांनी तयार केलेली गरम पेये शरीराला उब देतात. मसालेदार दूध किंवा हर्बल चहा झोपेच्या आधी घेतल्यास आपल्याला शरीराचे तापमान राखता येते.

या काही सोप्या टिप्सचा वापरामुळे आपले आरोग्य चांगले राखता येईल आणि थंडीमुळे होणारे आजार टाळता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

lifestyle : प्रत्येक वेळी कपडे धुताना त्याचा थोडा थोडा रंग उतरतो आणि दोन-तीन धुलाईनंतर कपड्यांची ती 'नव्यासारखी' चमक पूर्णपणे निघून
Lifestyle: आयुर्वेदामध्ये काही साध्या आणि सोप्या पद्धती आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमध्येही सहज फॉलो करू शकता. या पद्धती फक्त
Women Health : एका सर्व्हेनुसार, दर दोनपैकी एका महिलेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण असतो. हा ताण अनेक वेगवेगळ्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ