साखरेऐवजी गूळ का खावा?  

jaggery : गूळ हा ऊसाच्या रसापासून बनवला जातो. साखरेप्रमाणेच गूळही गोड असतो. पण त्यात साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असतात. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ नेहमी सांगतात की गूळ हा साखरेपेक्षा चांगला पर्याय आहे. पण गूळ वापरण्याआधी त्याचे फायदे आणि काही धोके सुद्धा माहित असायला हवेत.
[gspeech type=button]

आपल्यापैकी बऱ्याच जणांना गोड खायला खूप आवडतं. सकाळचा चहा, दुपारच्या जेवणातली मिठाई, संध्याकाळी काहीतरी खायचं म्हणून घेतलेलं लाडू किंवा बर्फी या सगळ्यांमध्ये साखर असतेच. पण कधी विचार केलाय का की या साखरेऐवजी आपण गूळ खाल्ला, तर काय होईल?

गूळ हा ऊसाच्या रसापासून बनवला जातो. साखरेप्रमाणेच गूळही गोड असतो. पण त्यात साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असतात. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ नेहमी सांगतात की गूळ हा साखरेपेक्षा चांगला पर्याय आहे. पण गूळ वापरण्याआधी त्याचे फायदे आणि काही धोके सुद्धा माहित असायला हवेत. तर मग, चला पाहूया साखरेऐवजी गूळ खाल्ल्यास काय होतं ते!

गुळाचे फायदे

गुळात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही महत्त्वाची खनिजं असतात. हे सगळे घटक आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. लोहामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, हाडं मजबूत होतात आणि थकवा कमी होतो.

गूळ खाल्ल्यामुळे पचन सुधारतं. पोषणतज्ञ रक्षिता मेहरा यांच्या मते, गूळ पचवणारे एंझाइम्स चांगलं काम करतात. त्यामुळे जेवल्यानंतर थोडासा गूळ खाल्ला, तर पोटाला आराम मिळतो.

गुळात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणजे सारखा सर्दी-खोकला किंवा ताप येणं कमी होतं. गूळ रक्तदाब नियंत्रणात ठेवतो यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. गूळ शरीराला ऊर्जा हळूहळू देतो. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक वाढत नाही आणि वजन कमी करायलाही मदत होते.

पण सगळ्यांसाठी गूळ चांगलाच असतो का?

गुळात साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असले , तरी काही लोकांसाठी तो योग्य नाही. कारण गुळामध्येही कॅलरीज असतात आणि तोही साखरेपासूनच तयार होतो. म्हणूनच मधुमेह असणाऱ्या लोकांनी गूळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो. म्हणजे तो रक्तातील साखरेचं प्रमाण लगेच वाढवत नाही. पण तरीही मधुमेह असणाऱ्यांसाठी गूळ खाणं काहीवेळेस धोक्याचं ठरू शकतं.

गूळ खरेदी करताना काय लक्षात घ्यावं?

बाजारात मिळणारा गूळ अनेकदा केमिकल वापरून तयार केलेला असतो. तो पिवळसर आणि खूप गुळगुळीत दिसतो. पण नैसर्गिक गूळ गडद रंगाचा आणि थोडासा खरखरीत असतो. त्यामुळे शक्य असेल तर गावाकडून, ओळखीच्या शेतकऱ्याकडून किंवा ऑरगॅनिक दुकानातूनच गूळ घ्यावा.

आहारात गुळाचा वापर कोणी टाळायला पाहिजे?

जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि साखर नियंत्रणात नसेल त्यांनी गुळ खाणं टाळावे.

जर तुम्हाला पोटाचे त्रास सतत होत असतील.

तुम्ही जर वजन कमी करत असाल आणि कमी कॅलरी आहार घेत असाल.

तुम्हाला जर ऊसाची अ‍ॅलर्जी असेल. गूळ खाल्ल्याने त्वचेला पुरळ येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा त्रासांचं कारण होऊ शकतं.

जर तुम्हाला गोड खायची आवड आहे आणि आरोग्याचीही काळजी आहे. तर साखरेपेक्षा गूळ हा नक्कीच चांगला पर्याय आहे. पण लक्षात ठेवा गूळही थोड्या प्रमाणातच खावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Lifestyle: पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्ग आजार होऊ शकतात.गरोदर महिलांसाठी हा काळ थोडा काळजीचा असतो. कारण या दिवसांमध्ये आपल्या पोटातल्या बाळाला
Cockroach:किचनमध्ये ही घाणेरडी झुरळं इकडे-तिकडे फिरताना पाहिली की अक्षरश: संताप येतो. आणि हे किळसवाणे जीव आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू
Need More Sleep :खरं तर, आजकाल पुरुष आणि स्त्रिया दोघंही झोपेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. बऱ्याचदा त्यांना पुरेशी झोप मिळत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ