कुटुंब विस्तार 

Family Expansion after marriage : लग्न झालं म्हणजे त्या मुलीवर – त्या मुलावर माझा पूर्ण हक्क आहे, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे लग्न झाल्यावर लगेच शारिरीक संबंध ठेवलेच पाहिजेत, असा आग्रह असतो. साथीदाराकडून नकार आला तर अहंकार दुखावला जातो. नवीन नात्याची सुरुवातच त्यामुळे नकारात्मकतेतून होते. लग्नानंतर बाळांना जन्म देणं आणि नवीन कुटुंबांची निर्मिती करणं हे आपलं नैसर्गिक कर्तव्य आहे. तरी अलीकडच्या काळामध्ये बाळांना जन्म देण्यासाठी नकार दिला जातो. तरी यावर सुद्धा आपल्या साथीदारासोबत या विषयावर चर्चा करुनच निर्णय घेणं उत्तम.

नात्यातील अर्थकारण

Financial Management : भावनिक आणि प्रॅक्टिकल असणं या लग्नाच्या नात्याच्या दोन बाजू आहेत. जसं केवळ पैशाने आनंद, सुख मिळत नाही तसं केवळ प्रेमाने आयुष्य जगता येत नाही. लग्नाच्या या नात्यात भावनिकदृष्ट्या आणि तितकचं आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे. 

नात्यांतील भावनांची परिसिमा

Emotions in Marriage : आपली सगळी नाती ही रक्ताने जोडलेली आहेत. लग्नाचचं नातं हे असं आहे जे प्रेम आणि विश्वासाच्या भावनेने जोडलं जातं. लग्नामध्ये केवळ तडजोड आणि त्यागचं नसतं तर त्यामध्ये आनंद, वैयक्तिक प्रगती आणि साथीदारांच्या मदतीने एकमेंकांना पूर्ण करण्याचा मार्ग असतो.

कौटुंबिक सरमिसळ 

Family Relations : ‘लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं नाही तर दोन कुटुंबाचं होतं’, असं म्हटलं जातं. पण हे नातं टिकवण्याची,या नात्याच्या यश- अपयशाची जबाबदारी ही फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तिंची असते. म्हणून लग्नानंतर पती-पत्नीची त्यांच्या आयुष्यात प्रथम स्थान हे त्यांच्या जीवनसाथीदाराचचं असलं पाहिजे.

शुभमंगलम सावधान!

Marriage Preparation : लग्न हे दोन व्यक्तींमधील प्रेमाचं आपुलकीचं बंधन आहे. तर काही ठिकाणी एका मुलाला आणि मुलीला  कायदेशीररित्या एकत्र राहण्यासाठी समाजाकडून मिळालेली मंजूरी म्हणजे लग्न,अशी ही व्याख्या केली जाते. तुमच्यासाठी ‘लग्न’ म्हणजे काय? आणि तुम्हाला लग्न का करायचं आहे? याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे.

आयुष्यभराच्या नात्याची तयारी 

Marriage : ‘लग्नाचा सोहळा’ हा काही तासांपुरता असला तरी ‘लग्न’ हे आयुष्यभरासाठी असतं. लग्न या संकल्पनेमागचा खरा अर्थच माहीत नसल्याने अनेकदा हे नातं तुटतं. आज घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कायदेशीर घटस्फोट न घेता विभक्त राहणारे पती-पत्नी किंवा नात्यामध्ये फूट असणारे अनेक संसार आपल्या आजूबाजुला असतात. या सगळ्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे विवाह संस्थेकडे आजची पिढी संशयाच्या नजरेतून पाहते. यासाठीच ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ आपल्यासाठी ‘शुभमंगल’  हे सदर घेऊन आलो आहोत. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ