हे रेल्वेस्टेशन आहे अर्ध महाराष्ट्रात आणि अर्ध गुजरातमध्ये !

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील ‘नवापूर’ हे रेल्वेस्थानक दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे. हे रेल्वे स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेले आहे. या रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग हा आपल्या महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. तर अर्धा भाग हा गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे.
आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या होळी उत्सव

Holi Festival : होळी सणाच्या अगोदरच्या महिन्यात आकाशात चंद्र दिसला की, स्फुर्तीने ‘कुर्रर्र’ अशी आरोळी देवून ढोल आणि मांदल वाद्यावर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी बांधव ‘दांडाचा महिना’ म्हणतात. या दांडा महिन्यापुर्वी आदिवासी बांधव शेतातील सर्व कामे संपवून घेतात. दांडा महिन्याच्या एक महिन्यानंतर होळीचा सण असतो.