‘गेम चेंजर’ वाढवण बंदराला मच्छीमारांचा विरोध कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आज दुपारी एक वाजता मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला मच्छिमार बांधवांकडून विरोध दर्शवला जात आहे. विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल, तर ते कदापी सहन केलं जाणार नाही. अशा विध्वंसक प्रकल्पांना शेवटपर्यंत कडाडून विरोध करणार असल्याचं मत मच्छीमार संघटनांकडून नोंदवलं जात आहे.

GFF | मुंबईत भरलंय सर्वात मोठं ग्लोबल फिनटेक फेस्ट

फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांशी संबंधित सर्वच मुद्द्यांवर एकाच व्यासपीठावर  सांगोपांग चर्चा आणि विचारविनिमय करण्याकरता जगभरातील धोरणकर्ते, राष्ट्रप्रमुख, अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे प्रमुख प्रतिनिधी, औद्योगिक साम्राज्यांचे प्रमुख, अर्थतज्ज्ञ, विचारवंत गेली चार वर्षे एकत्र येत आहेत. यंदाच्या फेस्टमध्ये पुढच्या आर्थिक दशकाकरता ‘जबाबदार आर्टिफिशियल इन्टिलिजन्स, सर्वसमावेशकता आणि पुनर्वसन’ यावर भर देण्यात येत आहे.

GSB Ganpati 2024 : मुंबईतील GSB सेवा मंडळाने गणपती महोत्सवासाठी उतरवला 400 कोटी रूपयाचा विमा

मुंबईतल्या सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी 400 कोटी रूपयाचा विमा उतरवला आहे. बाप्पांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आणि आभूषणांचा वापर केला जातो. अशावेळी कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी या मंडळाकडून दरवर्षी विमा उतरवला जातो.

Unified Pension Scheme | राज्यातही यूपीएस योजना मंजूर, लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

राज्यातही युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जवळपास 8 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Badlapur Protest | बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात मूक आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात पुण्यामध्ये आंदोलन पार पडलं. यावेळी खा. सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले. तर मुंबईमध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनाजवळ काळ्या फिती बांधुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तर काँग्रेस पक्षाकडून ही खा. वर्षा गायकवाड यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. याला राजकारण म्हणतात का? शरद पवारांचा सरकारला सवाल ‘राज्यभरात दर दिवशी कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, महायुती सरकारकडून या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ