मराठा आरक्षणाच्या वैधतेच्या याचिकावर सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठाची स्थापना

Maratha Reservation: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून (SEBC) 10 टक्के आरक्षण दिलं होतं. या आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या. या याचिकावर सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टातले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निर्देशानंतर तीन सदस्यीय विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत आहे – भारतीय लष्कराचा आरोप

Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान सीमाभागात सातत्याने बॉम्बहल्ले, गोळीबार सुरू आहे. या सर्व घटनांची तपशीलवार माहिती देण्यासाठी भारतील गृहमंत्रालय व सैन्याच्या तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

13 मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर होणार दाखल!

पुढच्या तीन दिवसांकरता मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मिर इथल्या पहलगाम बैसरन इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षणमंत्र्यांसह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक पार पडली. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी करत आढावा घेतला.

थोरल्या आणि धाकल्या पवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय?

Satara : सातारा जिल्हा हा पवार कुटुंबीयांवर प्रेम करणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि अशातच शरद पवारांना या जिल्ह्याने एक वेगळीच ताकद दिली. अनेक वर्ष सातारा जिल्ह्याने शरद पवारांची पाठराखण केली. त्याला मूळ कारणही तसेच आहे. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.

सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून 60 हून अधिक भारतीयांची सुटका!

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे, ज्यात एका वेब सिरीजमधील कलाकाराचाही समावेश आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेग देणार एमएमआरडीएचं आर्थिक भरपाई धोरण

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून एमएमआरडीएच्या महत्त्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडणे, हा या धोरणाचा उद्देश आहे.

‘भावनिक दुर्लक्ष’ घटस्फोटाचं कारण होऊ शकतं – केरळ उच्च न्यायालय

Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची भर पडली आहे. ‘भावनिक दुर्लक्ष’ हे घटस्फोटाचं कारण असू शकतं, हे या निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम लवकरच होणार पूर्ण 

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम 85 टक्के पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकर पूर्ण केलं जात आहे. या पहिल्या टप्प्याच्या सुरक्षेचे हस्तांतरण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) करण्याची अधिकृत कामकाज सुरू आहे. 

कॉमेडियन ते युध्दकाळातला राष्ट्राध्यक्ष… एका कणखर नेतृत्वाचा प्रवास

Volodymyr Zelensky : वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा शैक्षणिक जीवनापासूनच कॉमेडी करण्याकडे कल होता. याच दरम्यान त्यांनी 1997 मध्ये काही कलाकारांना एकत्र घेत एक कॉमेडीचा ग्रुप तयार केला. त्याचं नाव क्वार्टल 95 असं ठेवण्यात आलं.

98 व्या साहित्य संमेलनाच्या स्थळाला ऐतिहासिक महत्त्व

मराठी साहित्य संमेलन : 98 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राची संस्कृती प्रतिबिंबित करणारी दर्शनस्थळं उभी केली आहेत. त्याला 100 हलगी वाद्यांची साथ दिली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत मराठी भूमी अवतरल्याचा भास होत आहे. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ