कोयनानगरमध्ये पाणी वाटपावरून भाजपच्याच नेत्यांमध्ये तू तू मै मै!

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या उपस्थितीत कोयनानगरमध्ये रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या नियोजना संदर्भात बैठकीचे सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी माण- खटाव तालुक्यातील राजेवाडी तलाव आणि जिहे – कटापुरच्या पाण्यावरून भाजपच्याच आमदार आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
अमेरिकेतून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नाही

Indian deported : 2009 मध्ये अमेरिकेने 734 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवले होते. त्यानंतर हळूहळू हा आकडा वाढला, 2024 मध्ये 1,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना परत पाठवण्यात आले.
बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या 100 भारतीयांना आणलं परत!

Indians deported by US : बुधवार , दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी, अमेरिकेचं एक मोठं लष्करी विमान पंजाबमधील अमृतसरमध्ये उतरलं. या विमानात अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे भारतीय होते. हे लोक हरियाणा, चंदिगड, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राहणारे आहेत.
राज्यात गिलान बार सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू

GBS : गिलान बार सिंड्रोममुळे पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्या दिनांक 26 जानेवारीपर्यंत 101 रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्रांकडून सात सदस्यीय तज्ज्ञांची टीम पुण्यामध्ये पाठवण्यात आली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दावोस बैठक

World Economic Forum Annual Meeting 2025: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात आयोजित केली जाते. या बैठकीत जगभरातील राजकीय, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे नेते, तज्ज्ञ आणि उद्योगपती एकत्र येऊन जागतिक समस्यांवर चर्चा करतात. यावर्षी दावोसच्या या बैठकीचं आयोजन 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन

Bharat Mobility Global Expo 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 17 जानेवारी 2025 रोजी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. या एक्स्पोमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील आणि तंत्रज्ञानाशी संबंधित 100 पेक्षा अधिक नवीन प्रोजेक्ट लाँच होतील.
सर्व खासगी वाहतूक सेवांसाठी सामायिक निर्णय – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Mumbai : महाराष्ट्रातील खासगी प्रवासी वाहतूक सेवा उबर आणि रॅपिडो ह्या एकाच नियमांनुसार काम करणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होईल. वाहतूक व परवाना संबंधित समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.
2025 हे वर्ष सिनेरसिकांसाठी खास!

In year 2025 Upcoming movies : 2025 या वर्षात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता चांगले पर्याय असणार आहेत.
इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण केंद्र सरकारकडून रद्द

central government : केंद्रीय शिक्षण मंडळाने इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थांना नापास झाल्यावरही पुढील वर्गात ढकलण्याचं धोरण रद्द केलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. जर ते दुसऱ्यांदा देखील नापास झाले, तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही.विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत पास होणं बंधनकारक असेल
अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला! मुख्यमंत्र्यांकडे गृह तर शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि अजित पवाराकडे अर्थ खाते

Mahayuti Portfolio Announce : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीसरकारने मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि अजित पवारावर अर्थ खात्याची जबाबदारी.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: भाजपला 19, सहयोगी पक्षांना 20 जागा

Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायी दाखल

Mahaparinirvan Din : भारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी 6 डिसेंबरला लाखोच्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होतात. या निमित्ताने राज्य सरकारकडून मुंबईतल्या केंद्र व राज्य सरकारी आस्थापना, बँका आणि शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.