आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; लाडक्या बहिणींसाठी उभारला स्वतंत्र कक्ष

Mahayuti Oath Ceremony: आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींसाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या महायुतीच्या ‘महाविजया’ने शेअर बाजारात तेजी!

Share Market rise : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा शनिवारी निवडणुकीचे निकाल जाहीर केले. त्यादिवशी बाजार बंद होता. पण आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात ही तेजीने झाली.
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Jharkhand Assembly Election : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये एकुण 38 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाजपा झारखंड प्रदेशअध्यक्ष बाबूलाल मरांडी, लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष जयराम महतो आणि जेएमएमच्या स्टार प्रचारक कल्पना सोरेन याचं भवितव्य सुद्धा मतपेटीत बंद होणार आहे.
मुंबईत पीएम मोदींची रॅली; पोलिसांकडून वाहतूक निर्बंध जारी

PM Modi’s rally at Shivaji Park : भारतीय जनता पक्षाने 14 नोव्हेंबर रोजी दादर मधील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
स्कूल बसेसनां मतदानाची ड्यूटी लागल्यामुळे शाळांना सुट्टी?

Assembly Election Voting Day : येत्या 20 तारखेला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी सरकारने मतदान केंद्रावरील सामुग्रीच्या वाहतुकीसाठी स्कूल बस असोसिएशन आणि पर्यटकांसाठी असलेल्या बसेसची मागणी केली आहे. त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबरला तब्बल 890 बसेस या मतदानाच्या ड्यूटीला असण्याची शक्यता आहे.
Apple ने आणले iPhone मध्ये नवीन सुरक्षा फिचर

Apple new security features : Apple ने iOS 18.1 मध्ये एक छोटासा पण महत्वाचा बदल केला आहे. या नव्या फिचरला ‘Inactivity reboot’ असे नाव देण्यात आलं आहे, यामुळे iPhone ची सुरक्षा अजून वाढली आहे.
वांद्रे स्थानकावर चेंगराचेंगरी, 9 जण जखमी

Bandra Station Stampede : मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकावर आज पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरी एकून 9 प्रवास जखमी झाले आहेत. यापैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व गंभीर प्रवाशांवर वांद्रयातील के.बी.भाभा हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंजाबमधील शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Punjab Farmer : पंजाबमध्ये धान खरेदीवरून पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी धान खरेदी आणि बाकीच्या अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा नव्याने एक दिवसीय आंदोलनाची घोषणा केली
पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

Priyanka Gandhi : वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रियंका गांधी मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रियंका गांधीं यांचा
स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल.
नववी-दहावीच्या अभ्यासक्रमात बदल, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध कौशल्यांचा समावेश!

New education policy : नव्या अभ्यासक्रमात शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकाम यासारखे व्यावसायिक विषय अनिवार्य करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच विविध कौशल्ये शिकता येतील.
महायुतीने सादर केला अडीच वर्षाचा रिपोर्टकार्ड

Mahayuti Press Conference : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यानंतर आज महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत आपल्या अडीच वर्षातील कामकाजाचा रिपोर्टकार्ड राज्यासमोर ठेवला आहे.
महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

Maharashtra Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 व 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत.