मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, कोकणात पावसाचा हाहाकार; पावसाच्या थैमानात चार जणांचा मृत्यू

Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई, कोकण आणि राज्यातल्या काही भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट दिल्यामुळे सावधानता बाळगत आज (गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर) शाळा – महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

जम्मू काश्मिरमध्ये दुसऱ्या टप्यासाठी मतदान सुरू

Jammu – Kashmir Assembly elections : देशातील सर्वांचं लक्ष लागलेल्या जम्मू काश्मिरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरूवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 24.10 टक्के मतदान झालं. या टप्प्यात जम्मू-काश्मिरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात दहशत

Junnar Leopard Attack : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुपेश तानाजी जाधव असं या मुलाचं नाव आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

UPI व्यवहारांवर शुल्क आकारल्यास, 75% युजर UPI चा वापर थांबवतील

UPI व्यवहारांवरील शुल्काच्या चर्चेमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरलीय. तसेच मोबाईल रिचार्जसह इतर व्यवहारांवर शुल्क लागू करण्यास सुरुवात झाल्यामुळे, अनेक वापरकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

भारतामध्ये मंकी पॉक्स क्लेड 1 बी व्हेरिएंटचा शिरकाव, केरळमध्ये सापडला पहिला रूग्ण

Mpox in India : भारतातमध्ये क्लेड 1 बी (Clade 1b strain) व्हेरिएंट असलेला मंकी पॉक्सचा पहिला रूग्ण सापडला आहे. दुबई येथून भारतात परतलेल्या 38 वर्षाच्या व्यक्तिला मंकी पॉक्सची लागण झाली आहे. या रूग्णावर केरळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एमपॉक्स क्लेड 1 बी चा रूग्ण आढळल्यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून (WHO) पुन्हा एकदा आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेक एक्सपर्टशी बैठक

PM Modi in America : आयटी क्षेत्रातील एआय (AI), क्वाटंम कम्पुटिंग, सेमीकंडक्टर आणि बायोटेक्नॉलॉजी या नवीन सेक्टरमधल्या भारतातल्या संधी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील टॉप आयटी तज्ज्ञांशी चर्चा केली.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा, निवडणूक आयोग करणार राज्याचा दौरा

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या ( State Assembly Elections) तयारीचा पाठपुरावा करण्यासाठी निवडणूक आयोगाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यानंतर काही दिवसांतच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘अनैतिक’ गर्भपातावरील प्रतिबंधांवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल

गर्भपाताच्या ( Abortion ) अधिकारांच्या संरक्षणासाठी आवाज उठवत कमला हॅरिस ( Kamala Harris )यांनी ट्रम्पच्या गर्भपात धोरणांना ‘अनैतिक’ ठरवले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गर्भपातावर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर त्यांनी तीव्र टीका केली आहे.

श्रीलंका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आज मतदान, 220 लाख श्रीलंकन करणार मतदान

विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe), विरोधी नेते साजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) आणि मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके (Anura Kumara Dissanayake) यांच्यामध्ये प्रमुख लढत असून येणाऱ्या राष्ट्राध्यक्षासमोर श्रीलंकेला (Srilanka) आर्थिक संकटातून पूर्णपणे बाहरे काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीचा अजेंडा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 21 सप्टेंबरपासून अमेरिका दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात जगातील सामर्थ्यशाली नेत्यांच्या भेटी, वार्षिक क्वाड समीट Quad Summit मध्ये सहभाग आणि युनायटेड नेशन्ससोबत चर्चा असा भरगच्च कार्यक्रम पंतप्रधानांचा असणार आहे.

लेबनॉनमध्ये पेजर, वॉकीटॉकी आणि बॅटरी स्फोटांची मालिका- शेकडो मृत्यू, हजारो जखमी

लेबनॉनमध्ये (lebanon) 17 सप्टेंबर रोजी पेजरमध्ये स्फोट होण्याच्या घटना घडल्या. 18 सप्टेंबरला वॉकी-टॉकीमध्येही स्फोट होऊ लागल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ