बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा

महाराष्ट्रात श्रावण अमावस्येला पोळा किंवा बेंदूर साजरा केला जातो. शेतकऱ्याचा मित्र बैलाशिवाय शेतीतील कोणतीच कामं पूर्वी शक्य नव्हती. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

घरातील बैलांचे खांदे आदल्या दिवशी तेल लावून चोळले जातात. खांद्यांना गरम पाण्यानं शेक दिला जातो. आणि मग गरम पाण्यानं आंघोळ घालतात. आंघोळ झाली की बैलांची शिंग रंगवतात.

पोळ्याच्या दिवशी सकाळीच गाई-बैलांना आंघोळ घालतात. बैलांच्या अंगावर झूल लावली जाते. डोक्याला बाशिंग बांधून त्यांच्या अंगावर हळदीची बोटं उमटवली जातात. नवीन वेसण आणि गळ्यात माळ घालून त्यांना छान सजवण्यात येतं.

घरात दोन मातीचे लहान बैल तयार करतात. या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. घरच्या बैलांची साग्रसंगीत आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालतात.

पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपत नाहीत. गावात त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात. काही गावांमध्ये कर ओलांडतात तर काही ठिकाणी बैलांच्या शर्यती आयोजित करतात.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ