विविध धातू आणि वस्तूपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचे महत्त्व

गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ असतो. कोणत्या धातूच्या मूर्तीपासून कोणती शक्ती घरात निर्माण होते हे आपण जाणून घेऊयात.

चांदीची गणेश मूर्ती ही कीर्ती मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. तुमच्या घरात चांदीची गणेश मूर्ती असेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अलौकिक कीर्ती मिळते.

पितळेची गणेश मूर्ती ही घरात समृद्धी आणि आनंद निर्माण होण्यासाठी ठेवली जाते.

लाकडापासून तयार केलेली गणेश मूर्ती ही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी ठेवली जाते.

आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी घरात स्फटिकाची गणेश मूर्ती स्थापन केली जाते.

तांब्याची गणेश मूर्ती ही जे नवदाम्पत्य आपलं कुटुंब सुरू करण्याची योजना आखत आहेत, बाळासाठी आसुसले आहेत अशांसाठी शुभ असते.

हळदीपासून तयार केलेली गणेश मूर्ती कुटुंबातील सदस्यांचं नशीब बदलते. आणि ती शुभ असल्याचं मानलं जातं.

आंबा, पिंपळ आणि कडुलिंबाच्या पानापासून तयार केलेली गणेशमूर्ती ही ऊर्जा आणि सुरक्षा देते.

शेणापासून तयार केलेली गणेशमूर्ती ही आपल्या आयुष्यात चांगलं नशीब आणते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तसेच आपल्या जीवनातील दु:ख नाहिसे करते.

नैसर्गिक दगडात कोरलेली मूर्ती ही आपल्याला सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत करते. तसेच संपत्ती आणि यश मिळवून देते.

इतर बातम्या

Indigenous Day : भारतामध्ये आदिवासी समाजात अनेक यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या. शिक्षण, क्रीडा, कला, साहित्य, राजकारण आणि सामाजिक कार्य यासारख्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ