दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
आदिवासी समाजातले प्रेरणादायी व्यक्तिमत्व !
भारतामध्ये आदिवासी समाजात अनेक यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या. शिक्षण, क्रीडा, कला, साहित्य, राजकारण आणि सामाजिक कार्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
बिरसा मुंडा हे एक महान समाजसुधारक आणि आदिवासी नेते होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला. आदिवासींच्या हक्कांसाठीही लढा दिला. त्यांना 'धरती आबा' म्हणून ओळखले जाते.
जयपाल सिंह मुंडा यांची भारतीय नागरी सेवेत अव्वल स्थान मिळवणारे व्यक्ती, हॉकी खेळाडू, क्रीडा लेखक अशी विविधांगी ओळख आहे. इंग्लंडमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. इंग्लंडहून परतल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत हिरीरीने भाग घेतला. 1946 मध्ये ते बिहारमधून संविधान सभेवर निवडून आले. त्यांनी संविधान कार्यात सक्रिय सहभाग घेत आदिवासी समाजाचं नेतृत्व केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारतासारख्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्या संथाळ समुदायातील आहेत. हा समुदायात शिक्षणाचे प्रमाण उत्तम आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी नगरसेवक, आमदार, मंत्री, राज्यपाल या पदांवरही काम केलं आहे.
डॉ. तुलसी मुंडा हे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आदिवासी मुलांसाठी अनेक शाळा सुरू करत शिक्षणप्रसाराचं कार्य केलं. 2001 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविलं होतं.
एच.के.सेमा हे भारतीय कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
सुनीता लाक्रा या एक प्रसिद्ध हॉकी खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला हॉकी टीमचे नेतृत्व केले आहे. लाक्रा सारख्या अनेक खेळाडूंनी हॉकी, क्रिकेट, धावणे यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे.
याव्यतिरिक्त, अजूनही अनेक आदिवासी व्यक्ती, क्रीडापटूंनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे. त्यांचे कार्य आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे.