लोकनेते गोपीनाथराव मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

कोणताही राजकीय वारसा नसतानाही जिल्हा परिषदेचे सदस्य ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांचा प्रवास झंझावती होता.

गोपीनाथराव मुंडे आणि दिवंगत प्रमोद महाजन यांनी उच्चवर्गीयांपुरता मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाला तळागळापर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्रातील सत्ताकारणात भाजपाला अधिष्ठान मिळवून दिले.

12 डिसेंबर 2010, रोजी पुण्यातील एका सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनेते म्हणून गौरव केला. तेव्हापासून त्यांना ‘लोकनायक’, ‘लोकनेते’ या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

‘संघर्षवादी नेते’ म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. साखर आणि सहकार क्षेत्रातील त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय आहे. खासगी साखर कारखान्याच्या स्पर्धेत त्यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याचं वर्चस्व राखलं.

सन 1992 ते 1995 मध्ये त्यांनी विरोधीपक्षनेते पद सांभाळले. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. तेव्हा राज्यातील राजकारणाच गुन्हेगारीकरण मुद्दा उचलून धरला. जे.जे. हत्याकांडातील आरोपीसोबतचा पवारांचा विमानप्रवास, गोवारी हत्याकांड, वडराई प्रकरणांवर त्यांनी आवाज उठवला. 1995 साली राज्यभरात संघर्षयात्रा काढत त्यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणलं.

1995 साली उपमुख्यमंत्रीपदी असताना कुशल प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. सर्व खात्यांना मार्गदर्शक सूचना देत प्रशासन सुलभीकरणावर काम केले. कोणत्याही योजनांच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभी करणे, लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधणे त्यातून अंमलबजावणीतील त्रूटी हेरून त्यावर काम करत त्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष दिले. तसेच या काळात त्यांनी गुन्हेगारीकरणावर अंकुश लावला.

सन 1995 सालच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिजामाता महिला आधार विमा, बळीराजा संरक्षण विमा योजना, मुंबईत झोपू योजना, वारकऱ्यांना बसप्रवासात 50 टक्के सूट अशा अनेक कल्याणकारी योजना त्यांनी सुरू केल्या.

उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. या काळात त्यांनी मुंबईतील टोळीयुद्ध संपुष्टात आणले. ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’ असा उघड आदेश पोलिसांना देत गुन्हेगारीवर त्यांनी वचक निर्माण केला. त्यामुळे त्यांना गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून संबोधलं जाऊ लागलं.

2014 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र 3 जून रोजी विजयी माळ घालून आपल्या मतदारसंघाच्या भेटीला निघाले असता, दिल्लीत रस्ता अपघातामध्ये त्यांचं निधन झालं.

इतर बातम्या

Navy day: 4 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करत विजय मिळवला. 'मिशन ट्रायडंट' असं
Disabled Indians : या लोकांनी आपल्या अपंगत्वाला कधीही आयुष्यातील अडथळा बनू दिला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून ते देशांतर्गत स्पर्धा, चित्रकला, संगीत
places where touristscannot visit : जगातील अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे पर्यटकांना जाण्याची परवानगी नाही. यातील काही ठिकाणे धार्मिक कारणांमुळे,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली