राष्ट्रीय हातमाग दिन

महाराष्ट्रात अनेक हातमाग कला प्रसिद्ध आहेत, ज्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. पैठण आणि येवल्यामध्ये तयार होणाऱ्या पैठणी साड्या त्यांच्या भरजरी काठांसाठी आणि पदरावर असलेल्या मोराच्या खास डिझाइन्ससाठी जगभर ओळखल्या जातात. याशिवाय, सोलापूरच्या सोलापुरी चादरी त्यांच्या टिकाऊपणामुळे आणि मजबूत विणकामामुळे घराघरात लोकप्रिय आहेत. तसेच, औरंगाबादमध्ये रेशीम आणि सुती धाग्यांपासून विणल्या जाणाऱ्या हिमरू शाली त्यांच्या आकर्षक पोत आणि कलाकुसरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत.

कर्नाटक राज्याला हातमाग कलेचा मोठा वारसा लाभला आहे. इथे दोन प्रकारच्या साड्या विशेष प्रसिद्ध आहेत. इरकल साड्या त्यांच्या रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणासाठी आणि 'तोपे तेणी' नावाच्या या विणकाम पद्धतीसाठी ओळखल्या जातात. या साड्यांचा पदर पारंपरिक नक्षीकाम आणि डिझाइनसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे, म्हैसूर सिल्क साड्या त्यांच्या मऊ आणि चमकदार पोतासाठी जगभरात ओळखल्या जातात. या साड्यांवर केलेले जरीचे उत्कृष्ट काम त्यांना एक खास सौंदर्य देते.

गुजरात हे बांधणी आणि पटोला या दोन प्रमुख कापड कलांसाठी ओळखले जाते. बांधणी ही एक खास 'टाय अँड डाय' कला आहे, ज्यात कापडाला विविध आकर्षक वर्तुळाकार आणि चौकोनी डिझाइन्समध्ये रंगवले जाते. ही कला तिच्या चमकदार रंगांसाठी प्रसिद्ध आहे. पटन येथील पटोला साड्या त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि दोन्ही बाजूंनी एकसारख्या दिसणाऱ्या रंगीबेरंगी डिझाइन्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

तमिळनाडूमध्ये दोन महत्त्वाच्या कापड कला प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे कांचीपुरम रेशीम साड्या, ज्या भरभक्कम रेशीम आणि जरीच्या कामासाठी ओळखल्या जातात. या साड्यांचे आकर्षक काठ आणि पदर त्यांना खास ओळख देतात. दुसरे म्हणजे, मदुराई सुती कापड त्याच्या हलकेपणा आणि आरामदायक वापरासाठी प्रसिद्ध आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कलमकारी आणि पोचमपल्ली इकत या दोन महत्त्वाच्या वस्त्रकला खूप प्रसिद्ध आहेत. कलमकारी ही हाताने रंगवलेली किंवा ब्लॉक प्रिंटिंगची खास कला आहे. ज्यात नैसर्गिक रंगांचा वापर करून पौराणिक कथांचे सुंदर चित्रण केले जाते. तसेच, पोचमपल्ली इकत साड्या त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि आकर्षक भूमितीय नमुन्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

मध्य प्रदेशात हातमागाची कला खूप प्रसिद्ध आहे. विशेषतः इथे तीन प्रकारची कापडं खूप लोकप्रिय आहेत. चंदेरी साड्या त्यांच्या नाजूक पोत, हलकेपणा आणि चमकदार स्वरूपामुळे ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे, माहेश्वरी साड्या रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून बनवल्या जातात आणि त्यांचे आकर्षक काठ ही त्यांची खास ओळख आहे. या साड्या टिकाऊ आणि आरामदायक असतात. याशिवाय, बाग प्रिंट ही एक पारंपरिक कला आहे, ज्यात लाकडी ठशांचा वापर करून नैसर्गिक रंगांनी कापडावर नक्षीकाम केलं जातं.

पश्चिम बंगालमध्ये दोन प्रकारच्या हातमाग कला खूप प्रसिद्ध आहेत. बालूचरी साड्या आणि ढाका मलमल. बालूचरी साड्यांच्या पदरावर रामायण आणि महाभारतासारख्या पौराणिक कथांची आकर्षक चित्रे विणलेली असतात. आणि ढाका मलमल हे अत्यंत बारीक, हलके आणि मऊ कापड म्हणून ओळखले जाते. त्याची उच्च गुणवत्ता आणि नाजूक पोत यासाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पश्मिना शाल, ही जगातील सर्वात मऊ आणि उबदार शाल म्हणून प्रसिद्ध आहे. ही शाल काश्मिरी शेळीच्या लोकरीपासून तयार केली जाते. दुसरी म्हणजे कानी शाल, जी तिच्या गुंतागुंतीच्या आणि बारीक विणकामासाठी ओळखली जाते. एका विशिष्ट प्रकारच्या लाकडी सुईचा वापर करून ही शाल विणली जाते आणि ती तयार करायला अनेक महिने लागतात.

आसाम हे त्याच्या खास रेशीम उत्पादनांसाठी ओळखले जाते, ज्यात दोन प्रकार खूप प्रसिद्ध आहेत. मुगा रेशीम हे त्याच्या नैसर्गिक सोनेरी रंगासाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखले जाते. दुसरे म्हणजे, एरी रेशीम  ज्याला 'अहिंसा रेशीम' असेही म्हणतात. कारण हे रेशीम किड्यांना कोणत्याही प्रकारे इजा न पोहोचवता काढले जाते.

ओडिशातील इकत विणकामाची एक खास शैली आहे. कापड विणण्याआधीच त्याच्या धाग्यांना विशिष्ट पद्धतीने रंग दिले जातात. ज्यामुळे विणल्यानंतर कापडावर सुंदर नमुने तयार होतात.

इतर बातम्या

Indigenous Day : भारतामध्ये आदिवासी समाजात अनेक यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या. शिक्षण, क्रीडा, कला, साहित्य, राजकारण आणि सामाजिक कार्य यासारख्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ