म्हैसूर दसरा महोत्सव

म्हैसूर दसरा महोत्सव हा कर्नाटकचा राज्य सण आहे, ज्याला कन्नडमध्ये 'नादहब्बा' म्हणतात आणि हा महोत्सव भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आलेला आहे.

नवरात्रीचे नऊ दिवस संपूर्ण म्हैसूरमध्ये विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.

म्हैसूर राजवाडा आणि सरकारी इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात येते.

म्हैसूर दसरा दरम्यान, सामान्यतः चकाकणारा म्हैसूर पॅलेस आणखीनच आकर्षक दिसतो कारण तो जवळजवळ 100,000 लाइट बल्बने प्रकाशित होतो.

महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणाऱ्या जंबो सवारीची तयारी सहा महिने आधीच सुरू होते. दसरा मिरवणुकीतल्या या जंबो सवारीत दहा हत्ती सहभागी होतात.

यातील एका हत्तीवर सोन्याच्या अंबारीत म्हैसूरचे महाराजे ओडेयरू कुटुंबांची कुलदेवता चांमुडेश्वरी विराजमान असते.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.

हा कार्यक्रम दहा दिवस चालतो आणि शाही हत्तींच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, जत्रा आणि इतर भव्य उत्सवांसह साजरा केला जातो.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ