गुजरातमध्ये नवरात्र उत्सवाची धूम

गुजरात राज्य रंगीबेरंगी संस्कृती आणि पारंपरिक उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये नवरात्री उत्सव अत्यंत लोकप्रिय आहे.

भारतातील विविध भागांतून तसेच विदेशी पर्यटकही नवरात्रीच्या काळात गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात येतात 

नवरात्रीमधील मुख्य आकर्षण म्हणजे गरबा नृत्य. हे नृत्य गुजरातच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

नृत्य सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी आरती केली जाते. ज्यात एका मातीच्या घागरीत दिवे ठेवले जातात. ज्याला गारबी म्हणतात आणि हे समृद्धीचे प्रतीक आहे.

आरती झाल्यावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच गरबा (गार्बा) नृत्यासाठी सज्ज होतात. मातीच्या घागरी भोवती फेर धरून विशिष्ट ठेक्यात पारंपरिक गाण्यांवर टाळ्या वाजवत हे नृत्य केलं जातं.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ