रत्नमयी तारा

रतन टाटा.. नावातच सामर्थ्य सामावलेलं व्यक्तिमत्व. अनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या या अनमोल रत्नाला जागतिक पातळीवर एक विशेष स्थान होतं आणि असणार आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जगभरातून गौरविलं गेलं आहे. आपल्या सर्वोच्च पुरस्कारासह तंत्रज्ञान, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील विविध देशातील नामवंत पुरस्ताकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

सन 2000 साली रतन टाटा यांना राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या हस्ते पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं.

सन 2006 साली महाराष्ट्र सरकारकडून रतन टाटा यांना महाराष्ट्र भूषण आणि 2023 साली उद्योग भूषण या पुरस्काराने गौरविले.

सन 2008 साली राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्म विभुषण या पुरस्काराने सन्मानित केलं.

सन 2008 मध्ये त्यांना सिंगापूर सरकारकडून ऑनररी सिटीझन पुरस्कार देण्यात आला.

ब्रिटिश सरकारकडून राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते रतन टाटा यांना दोन सर्वोच्च पुरस्कार देण्यात आले आहेत. सन 2009 साली ऑनररी नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि 2014 साली ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने गौरविले आहे.

सन 2009 साली इटली सरकारतर्फे ग्रँड ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक या पुरस्काराने सन्मानित केलं.

सन 2012 मध्ये जपान सरकारने रतन टाटा यांना कॉर्डोन ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन या पुरस्काराने गौरविले.

सन 2016 साली कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च फ्रान्स पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

तर 2023 साली ऑस्ट्रेलियन सरकारकडून ऑनररी ऑफिसर्स ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने गौरविलं आहे.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ