बायोल्युमिनेसन्सच्या चमत्काराने भारतातील रात्री चमकणारे समुद्रकिनारे

समुद्रकिनारे रात्रीच्या वेळी चमकतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, हे खरं आहे! "बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन" नावाच्या एका नैसर्गिक घटनेमुळे हे शक्य होते.

समुद्रातील काही सूक्ष्मजीवांमुळे समुद्राचे पाणी चमकते. रात्रीच्या अंधारात हे किनारे निळ्या, हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळलेले दिसतात. वर्षाच्या विशिष्ट काळात ही घटना दिसून येते.

गोव्यातील पालोलेम बीच: गोवा नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिला आहे. रात्रीच्या अंधारात बायोल्युमिनेसन्सच्या चमत्काराने लखलख चमकणारा हा समुद्रकिनारा एक नयनरम्य दृश्यासह वेगळाच आनंद देतो

अंदमान आणि निकोबारमधील राधानगरी बीच: निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रोषणाईने उजळलेला हा बीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

केरळमधील वर्कला बीच: पापनाशम बीच म्हणूनही ओळखला जाणारा हा बीच रात्रीच्या अंधारात चमचम करतो. हा अद्भुत नजारा पहायला अनेक लोक रात्रीच्या वेळी या ठिकाणी जातात.

मुंबईचा जुहू बीच: निळ्या लाटा कोसळत असताना चमकणाऱ्या या बीचचे विलक्षण असे दृश्य पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील तारकर्ली बीच: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा बीच बायोल्युमिनेसन्स अनुभवण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ