दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
तिरूओणम
केरळमध्ये, ओणम हा 10 दिवसांचा सण आहे जो "राजा महाबली" च्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दिवस मल्याळी भाषिक ‘तिरुओणम’ नावानं साजरा करतात, हा ओणमचा मुख्य दिवस. मल्याळी पंचांगानुसार चिंगम महिन्यात (सौरमान कालगणनेनुसार सिंह मास), श्रवण नक्षत्राच्या दिवशी महाबली राजा प्रजेला भेटायला येतो.
ओणमचा पहिला दिवस आहे, ‘आतम्’. या दिवसापासून घरोघरी ‘पुकळाम’ काढायला सुरूवात करतात. तलावातली ओली माती आणून मुख्य दरवाजासमोर, अंगणात ‘कळाम’ बनवायला सुरूवात करतात. मातीच्या थरावर शेण सारवतात, मग लाल चिऱ्याची भुकटी पाण्यात मिसळून पातळ थर लावला जातो. माती, शेण, चिऱ्याची भुकटी यांचे साधारण तीन थर लागले की, फुलांच्या रांगोळीसाठी म्हणजेच ‘पुकळाम’ ची जमीन तयार होते.
ओणम महोत्सवाला सुरूवात झाल्याची आणखी एक वर्दी म्हणजे ‘आतम्’ची कोचीतली राजेशाही मिरवणूक. पूर्वी कोचीचे महाराजे या मिरवणुकीचं आयोजन करायचे. पण आता राज्य सरकारतर्फे या मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं. ‘आतचामयम्’ या नावाने ही मिरवणूक ओळखली जाते. सजवलेले हत्ती, लोकनृत्य, एकात्मतेचं-बंधुभावाचं प्रतिक असे चित्ररथ. हिंदूंसोबतच ख्रिस्ती बांधवांचे चित्ररथ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे. अतिशय उत्साहात निघालेली ही मिरवणूक ‘त्रिकाकारा’ म्हणजेच ‘वामन’ देवस्थानात विसर्जित होते.
दुसरा दिवस ‘चिथिरा’ तर तिसरा दिवस ‘चोडी’ म्हणून ओळखले जातात. या दिवशी विशेष काही नसतं. चौथ्या दिवशी म्हणजेच ‘विशाखम्’च्या दिवशी महिला वर्गाची लगबग सुरू होते. ‘तिरुओणम’च्या विशेष जेवणाकरता म्हणजेच ‘सद्द्या’करता पानात लागणारे कोरडे पदार्थ बनवायला सुरूवात होते. यात विविध लोणची, पापड, केळ्याचे चीप्स, कोरड्या चटण्या, तीळाचे लाडू, केळ्याचे सुंठ-गुळ लावून तळलेले काप यांचा समावेश असतो.
महिला वर्ग स्वयंपाकघरात गुंग असताना त्रिशूर भागातील पुरूष मंडळी ‘पुलीकली’ म्हणजेच व्याघ्रनृत्यात मग्न असतात. आपलं पूर्ण शरीर, वाघाच्या शरीरासारखं रंगवून, वाघाच्या शिकारीचा डाव रचला जातो. त्रिशूरच्या मुख्य रस्त्यावर जिल्ह्याच्या इतर भागातील अनेक गट व्याघ्रनृत्य सादर करायला येतात.
पाचवा दिवस आहे, ‘आनियम’. केरळची प्रसिद्ध नौकाशर्यत म्हणजेच ‘वल्लमकळी’ आनियमच्या दिवशी असते. महापूराचा सर्वात जास्त तडाखा बसलेल्या पथनमतिट्टा जिल्ह्यातील ‘आरनमुला’ इथं ‘पंपा’ नदीत ही स्पर्धा असते. नीरफणसाच्या लाकडापासून बनवलेल्या साधारण 100 ते 138 फूट लांबीच्या नावेचा वापर या स्पर्धेत होतो. गेल्या 2-3 वर्षांपासून महिलांचे संघही सहभागी होत आहेत.
सहावा दिवस ‘त्रिकेट्टा’ आणि सातवा दिवस असतो ‘मूलम’. या दोन्ही दिवशी मुख्यओणमसाठी जोरदार तयारी सुरू असते. ओणमच्या दिवसांत कथकलीपासूनच प्रेरणा घेत ‘कईकोट्टीकली’ नृत्यप्रकार महिला सादर करतात. यासाठी महिला खास केरळची 2 भाग असलेली, सोनेरी किनार असणारी पांढऱ्या रंगाची पारंपरिक साडी ‘मुंड आणि नैरीयातू’ नेसतात. ‘तुंबीतुळ्लल’ हा कलाप्रकारही आवडीने सादर करतात. यात महिला गोलाकार बसतात, मध्यभागी मुख्य सादरकर्ती असते. मुख्य महिला आपल्या गोड आवाजात गाणी गाते आणि तिच्या भोवतालच्या महिला तिला कोरसमध्ये साथ देतात.
पूराडम या आठव्या दिवशी मातीचे साधारण 1 फूट उंचीचे 3 उभे पिरॅमिडस् बनवण्यात येतात. यांना ‘त्रिकाकारा आप्पन’ म्हणजेच भगवान विष्णू मानतात. काही भागांमध्ये माती ऐवजी लाकडाचे पिरॅमिडस् बनवतात.
नववा दिवस हा उतराडम नावाने ओळखला जातो. या दिवशी पहिल्या दिवशी रेखाटलेल्या ‘पुकळाम’च्या एका बाजूला ‘कोलम’ म्हणजे तांदूळाच्या पीठाचा वापर करून रांगोळी काढली जाते. या रांगोळीवर त्रिकाकारा आप्पनला विराजमान करण्यात येतं. गंध लावून, फुलं वाहून, समई लावली जाते. महाबली राजा कधीही भेट द्यायला येऊ शकतो, या भावनेनं पुकळाम, त्रिकाकारा आप्पन आणि समई दुसऱ्या दिवशी पर्यंत कायम तेवतच ठेवतात.
दहावा दिवस म्हणजे ‘तिरूओणम’, हा ओणमचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. देवळात जाऊन आल्यावर ‘ओणमसद्द्याची’तयारी सुरू होते. मल्याळम भाषेत केळीच्या पानावर वाढल्या जाणाऱ्या विशेष जेवणाला सद्द्या म्हणतात. या मुख्य जेवणात कोरड्या पदार्थांसोबत परिप्पूकरि (वरण), इंजितैर (आलं घातलेलं ताक), सांबार, अवियल (दही किंवा कैरी, हिरवी मिरची आणि खोबरं घातलेली पांढरी मिश्र भाजी), कालन (ताकातलं सांबार), टोमॅटो रस्सम, ओलन, तोरन (भरपूर खोबरं घातलेली कोरडी भाजी), पुलिंजी, अननस पचडी, एरिस्सेरी, मेदू वडा, नारळाची चटणी, 3 प्रकारचे पायसम, केळ्याचा हलवा असे अनेक पदार्थ असतात.