राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं केलं अनावरण

काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या कोल्हापुर दौऱ्यातील काही क्षणचित्रे.

या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यानंतर राहुल गांधी यांनी सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहिले.

“हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो.” – राहुल गांधी

“छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही.” – राहुल गांधी

“महाराजांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे.” – राहुल गांधी

“भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे.” – राहुल गांधी

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ