भारतातले ‘Young Achievers’

चेन्नईचा पियानोवादक लिडियन नादस्वरम हा अमेरिकेन रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट'चा विजेता ठरला आहे. त्याने दक्षिण कोरियाच्या कुक्कीवोनला हरवून हा किताब मिळवला.

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिलक मेहताने 'पेपर एन पार्सल' ही कुरियर कंपनी सुरू केली आणि आज ही कंपनी 200 जणांना रोजगार देते आहे.

तृप्तराज पंड्याने वयाच्या दीड वर्षापासून तबला वाजवायला सुरुवात केली आणि 6 व्या वर्षी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले.

अरविंद चिदंबरम हा  बुद्धिबळपटू 21 ग्रँडमास्टर्स आणि 30 आंतरराष्ट्रीय मास्टर्स असलेल्या स्पर्धेत चार ग्रँडमास्टर्सला पराभूत करून विजेता ठरला आहे.

प्रियांशी सोमानीने वयाच्या 6 व्या वर्षांपासून मेंटल मैथ्स शिकायला सुरुवात केली आणि 11 व्या वर्षी मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप जिंकला.

'गुगल बॉय' म्हणून ओळखला जाणारा कौटिल्यने केबीसीमध्ये आपली बुद्धिमत्ता दाखवली आणि ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजीचा पुरस्कार जिंकला.

अद्वैत कोलारकर हा जगातील सर्वात तरुण चित्रकारांपैकी एक आहे आणि त्याला ग्लोबल प्रॉडिजी पुरस्कारही मिळाला आहे.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ