मनकवडे जादूगार डॉ. आनंद नाडकर्णी

Thane : डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ असण्यासोबतच एक लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. ठाण्यातील सामाजिक जडणघडणीसाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे
[gspeech type=button]

स्पर्धेच्या जगात वैयक्तिक आयुष्य असो की व्यावसायिक आयुष्य… मानवी मनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आवश्यक आणि अनावश्यक ताण तणाव यामध्ये गल्लत करून जीवनमान अधिक संकट करण्याचाच अधिक पवित्रा निर्माण झाला आहे. परंतु शास्त्रशुध्द पध्दतीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात केवळ ठाणेच नव्हे तर महाराष्ट्र किंबहुना जगभरातील अनेकांची मनं ओळखून तणावग्रस्तांच्या मनाची वाट मोकळी करून देणारे मनकवडे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी होय.

शाळेत शिक्षिकेकडून अपमान आणि मित्रवर्गानं दिलेली आश्वासक ऊर्जा

डॉ. आनंद नाडकर्णी यांचा जन्म 1958 साली झाला. खान्देश, मराठवाडा अशा ग्रामीण भागात काही दिवस बालपण गेल्यानंतर आनंद नाडकर्णी यांच्या पायाच्या दुखण्यावरील उपचाराकरिता कुटुंबियांनी मुंबईची वाट धरली. विलेपार्ले इथल्या, पार्ले टिळक विद्यालयामध्ये शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 1968 साली आठवीच्या वर्गात असताना ‘समाजशास्त्राच्या’ बाईंनी त्यांना फळ्यावर लिहिण्यासाठी बोलावलं. शिक्षकांसाठीचे लाकडी प्लॅटफॉर्म, त्यातील फटी यामधून स्वत:चे पाय सावरत लिहिताना बाई बोलून गेल्या, ‘‘लंगड्या नीट लिही की.’’ या वाक्याने विद्यार्थी दशेतील आनंद नाडकर्णी यांना थिजवून टाकले. विजेच्या लोळासारखे ते शब्द त्यांना लागले. त्यावेळेचा किस्सा आठवताना नाडकर्णी सांगतात की,  “मी जाऊन जागेवर बसलो, पण मान वर करायचे धैर्य नव्हतं. तास संपला. मला जाणवलं की, माझ्याभोवती मित्रमैत्रिणींनी आश्वासक कडं तयार केलं. या तासानंतर छोटी सुट्टी होती.

आमचा वर्ग पुढच्या तासाला वर्गाबाहेर धरणे धरून बसला. पुढच्या तासाच्या शिक्षिका, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक सारे आले. ‘‘आमच्या मित्राचा अपमान झाला आहे. त्याच्या व्यंगावर बोट ठेवलं गेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही वर्गात बसणार नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका होती. त्यानंतर हिणवणाऱ्या त्या बाईंनी दिलगिरी व्यक्त केली. या एका प्रसंगानं दिलेली ऊर्जा, आजवर सोबत करत आली आहे. मला स्वत:बद्दल वाटणारं न्यूनत्व त्या दिवशी गळून पडल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी सांगतात.

मानसशास्त्रात करिअर

डॉ. आनंद मधुसूदन नाडकर्णी यांनी मुंबईतून 1980 साली एमबीबीएसची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचारात पदव्युत्तर एमडी पदवी मिळवली.  पहिल्यापासून डॉ. आनंद नाडकर्णी यांना मानवी मनाचा शोध घेण्याची नितांत आवड. मानवाने त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी या अतिशय क्लीष्ट करून टाकल्यामुळेच त्याच्या मनावरही परिणाम होतो. त्यामुळे या क्लीष्टतेतून मानवाला मुक्त करण्यासाठी सहज सोप्या पध्दतीने मनोविकार क्षेत्रात कार्यरत राहण्याचा निर्णय डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतला. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी त्यांनी 23 मार्च 1990 रोजी ठाणे येथे ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (आय.पी.एच.) या संस्थेची त्यांनी स्थापना केली.  आय.पी.एच. ही संस्था आज ठाणे, पुणे, नाशिक या तीन शहरांत कार्यरत आहे.

मानसिक स्वास्थ्याकरता सर्वांसाठी विशेष कार्यक्रम

ठाणेकर डॉ. नाडकर्णी हे दररोज सरासरी चाळीस क्लायंटना भेटण्यासाठी वैयक्तिक सल्लामसलत करण्यात व्यस्त असतात. ते देशभरातील उच्च कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. ते तरुण कलाकार, खेळाडू, खेळाडू, गायकांना त्यांचे प्रदर्शन सुधारण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.  डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आयपीएच (Psychological Health Institute) अंतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात वेध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, समाजसेवकांसाठी तसेच विद्यार्थी आणि पालकांसाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. गेले अनेक वर्ष पालक आणि बालक यांच्या नातेसबंधांवरही मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास करून मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. आनंद नाडकर्णी अत्यंत उत्साहाने करत आहेत. विविध विषयांवर पालक आणि शिक्षकांच्या गटांना ते संबोधित करत आहेत.   मानसोपचार आणि मानसशास्त्रात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ते शिकवतात. त्यांनी राष्ट्रीय नियोजन आयोगात सल्लागार म्हणून योगदान दिले आहे आणि स्वतंत्र संचालक म्हणून सूचीबद्ध कंपन्यांच्या मंडळावर देखील ते कार्यरत आहेत.

साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदान…

डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ असण्यासोबतच एक लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. ठाण्यातील सामाजिक जडणघडणीसाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून त्यांनी तत्त्वज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ‘मनमैत्रीच्या देशात’ आणि ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत. डॉ. नाडकर्णी हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक आणि विश्वस्त देखील आहेत. डॉ. नाडकर्णी यांनी मराठीत सतरा पुरस्कार विजेती पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक पुस्तके दोन अंकी आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यांची काही पुस्तके इंग्रजीत अनुवादित आहेत आणि ब्रेल भाषेतही स्वीकारली आहेत.

सामाजिक संस्था आणि कार्पोरेट स्टाफकरता ‘सपोर्ट सिस्टिम’

आरआयएल, सीमेन्स, सिप्ला, इंडोको सारख्या आघाडीच्या औद्योगिक घराण्यांसोबत काम करताना, डॉ. नाडकर्णी आणि त्यांची टीम विविध क्षेत्रातील उदयोन्मुख मध्यमस्तरीय उद्योजकांसाठी कॉर्पोरेट मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. त्याचप्रमाणे, आयपीएच SEARCH (गडचिरोली), PRATHAM (मुंबई) आणि SANGATH (गोवा) सारख्या नामांकित स्वयंसेवी संस्थांशी देखील संबंधित आहे. पुस्तकांच्या स्वरूपात त्यांच्या साहित्यिक योगदानाव्यतिरिक्त, त्यांनी लिहिलेली नाटके व्यावसायिक मराठी रंगभूमीवर नियमितपणे सादर केली जातात आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

टेंभी नाका परिसरातच कलेक्टर ऑफिस,जिल्हा न्यायालय, जिल्हा इस्पितळ, ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी शाळा अशा गोष्टी एकवटलेल्या होत्या. त्यामुळेच 175 वर्षांपूर्वी
Thane : प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी हे प्रा. संतोष राणे
Thane : आंबेडकरी समाजासाठी 14 एप्रिल ही नुसती दररोजच्या धबडग्यातली एक तारीख नसून हा एक लाखमोलाचा दिवस असतो. रोजघडीच्या कामातून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ