आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली मोफत वेबसाईट – संस्कृत शिकणं झालं सोपं!

learning Sanskrit : या वेबसाईटवर संस्कृत साहित्य विविध भागांमध्ये विभागलेले आहे. उदाहरणार्थ, धडे, कविता, श्लोक असे वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक भागात त्या त्या मजकुरासोबत त्याचा अर्थ, भाषांतर, आणि त्या शब्दांची रचना कशी झाली आहे हे सर्व काही समजावून सांगितलं आहे.
[gspeech type=button]

आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतलेल्या अनंतरिक्ष बोथले या विद्यार्थ्याने संस्कृत भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखी वेबसाईट तयार केली आहे. SanskritSahitya.org  हे या वेबसाईटचे नाव असून, ती संपूर्णपणे मोफत आहे. या वेबसाईटच्या मदतीने संस्कृतची जुनी पुस्तके वाचता आणि समजून घेता येणार आहेत. त्यामुळे आता संस्कृतची जुनी पुस्तके नवीन पिढीला आधुनिक पद्धतीने शिकायला मिळतील.

अनंतरिक्ष बोथले हे मूळचे राजस्थानचे असून सध्या अमेरिकेतील गुगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत. त्यांना संगणकाच्या माध्यमातून संस्कृत साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही वेबसाईट सुरू केली.

संस्कृत भाषा शिकणे आता सोपे

अनंतरिक्ष यांना नेहमी वाटायचं की संस्कृत भाषा शिकायला खूप अवघड वाटते. पण जर योग्य साधने मिळाली तर ही भाषा शिकण्यास अगदी सोपी आहे. म्हणून त्यांनी अशी वेबसाईट तयार केली ज्यात संस्कृत वाचण्यासाठी लागणारी सर्व साधनं एकत्रित करण्यात आली आहेत.

अनंतरिक्ष यांनी आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून भाषाशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली. भाषेवर असलेल्या प्रेमामुळे ते 2011 पासून ‘लिंग्विस्ट्रिक्स’ नावाचा ब्लॉगही लिहीत आहेत.

वेबसाईटमध्ये काय आहे खास?

या वेबसाईटवर संस्कृत साहित्य विविध भागांमध्ये विभागलेले आहे. उदाहरणार्थ, धडे, कविता, श्लोक असे वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक भागात त्या त्या मजकुरासोबत त्याचा अर्थ, भाषांतर, आणि त्या शब्दांची रचना कशी झाली आहे हे सर्व काही समजावून सांगितलं आहे.

श्लोक किंवा कवितांमध्ये वापरलेले छंद त्यांची माहिती, यादी आणि त्या छंदांचे उच्चार देखील ऐकता येतील या सर्व गोष्टी वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांपर्यंत सगळ्यांना याचा उपयोग होईल

संगणकाला शिकवलं संस्कृत

अनंतरिक्ष बोथले यांना कॉम्पुटरला मानवी भाषा समजावण्याच्या प्रक्रिये बद्दल चांगले ज्ञान आहे. याचा उपयोग त्यांना वेबसाईट तयार करण्यासाठी झाला. त्यामुळे कॉम्पुटरच संस्कृत मधील मजकूर समजून घेऊन, त्याचा अर्थ आणि भाषांतर आपल्याला करून देईल.

या वेबसाईटवर तुम्ही देवनागरी आणि इंग्रजी या दोन्ही लिप्यांमध्ये तुम्हाला पाहिजे असलेली माहिती सर्च करू शकता. म्हणजेच, तुम्हाला एखादा श्लोक अर्धवट आठवत असेल, तर तुम्ही आठवत असेलेला श्लोक या वेबसाईटवर सर्च करून पूर्ण श्लोक मिळवू शकता. ही वेबसाईट  शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक सगळ्यांसाठी उपयुक्त आहे.

अनंतरिक्ष सांगतात की लवकरच या वेबसाईटवर काही नवीन सुविधा येणार आहेत. त्यामध्ये प्रमुख श्लोकांचे इंग्रजी सारांश, शब्दांचा मूळ अर्थ शोधण्याची सोय. आणि इतर भारतीय लिप्यांमध्ये जसे मराठी, हिंदी वाचण्याची सुविधा दिली जाईल. याशिवाय, ज्यांना विशिष्ट श्लोक खूप आवडतो ते तो ‘फेव्हरेट’ म्हणून सेव्ह करू शकतात.

वेबसाईट ऑफलाइन वापरायची सोयही लवकरच येणार आहे. म्हणजे एकदा डेटा डाउनलोड केल्यानंतर, इंटरनेट नसतानाही मोबाईल किंवा संगणकावर ही माहिती वाचता येईल.

महत्त्वाची पुस्तके एकाच ठिकाणी

सध्या या वेबसाईटवर रामायण, महाभारत, भागवत गीता, कालिदास यांचे काव्यसंग्रह आणि इतर प्रसिद्ध संस्कृत साहित्य उपलब्ध आहे. अनंतरिक्ष म्हणतात, “संस्कृत साहित्य केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तर त्यात मानवी भावना, अनुभव, प्रेम, हास्य, दुःख अशा सगळ्यांचा समावेश आहे.”

ते पुढे सांगतात, “आपण संस्कृतमध्ये केवळ श्लोक म्हणून जे काही ऐकतो, त्यामागे एक सुंदर भावना आणि आशय असतो. आणि हेच या वेबसाईटच्या मदतीने सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत”

अभ्यासकांसाठी खास सुविधा

संस्कृतवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीही ही वेबसाईट खूप उपयोगी ठरणार आहे. उदाहरणार्थ, जर कोणी एखाद्या संस्कृत पुस्तकात पाणिनी सूत्र किंवा एखाद्या डिक्शनरीचा उल्लेख केला. तर त्या शब्दावर क्लिक करताच त्यांना त्याची लिंक मिळते. त्यामुळे अभ्यास सुलभ होतो. आणि ज्यांना संस्कृतविषयी अभ्यास करायचा आहे, खूप माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी ‘GitHub’ या प्लॅटफॉर्मवर सगळा मजकूर उपलब्ध करून दिला आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

FASTag Annual Pass: येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल
Iran - Israel War : इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना
G - 7 Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 - 17 जून 2025 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ