स्पॅम कॉलच्या तक्रारीसाठी सरकारचं ‘चक्षू’ पोर्टल

Chakshu Portal : सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि स्पॅम कॉल्स व मेसेजेसद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. सायबर क्रिमिनल्स नवनव्या तंत्रांचा वापर करत लोकांना फसवत आहेत. यासर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या फ्रॉड कॉल्स संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी 'चक्षू' पोर्टल लॉन्च केले आहे.
[gspeech type=button]

सरकारने मोबाईल युजर्ससाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे, यात आंतरराष्ट्रीय फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सरकारने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि स्पॅम कॉल्स व मेसेजेसद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. सायबर क्रिमिनल्स नवनव्या तंत्रांचा वापर करत लोकांना फसवत आहेत. दररोज सायबर घोटाळ्यांमुळे लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरले जात आहेत, तसेच डिजिटल अरेस्टची घटनाही वाढली आहेत.

सावधगिरी बाळगा

सरकारने युजर्सना कळवले आहे की, आंतरराष्ट्रीय फसव्या कॉल्सपासून दूर राहण्यासाठी काही विशेष देशकोड्सवरून येणाऱ्या कॉल्सबाबत सावध राहा.आणि  युजर्सने या कोड्स वरून आलेले कॉल्स न उचलता ते  नंबर  लवकरात लवकर रिपोर्ट करावे अशी सूचना सरकारने  दिली आहे.

या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका

दूरसंचार विभागाने  सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे कळवले आहे की, +77, +89, +85, +86, +84 यांसारख्या कंट्री कोड्सवरून आलेले कॉल्स धोका निर्माण करू शकतात. केवळ +91 वरून आलेले कॉल्सच रिसिव्ह करा. सरकारने स्पष्ट केले आहे की, दूरसंचार विभाग कधीही या कोडसह कॉल करणार नाही.

काय करावं?

युजर्सनी या प्रकारच्या कॉल्सची तात्काळ तक्रार ‘चक्षू’ पोर्टलवर करावी. चक्षू पोर्टल सरकारने काही महिन्यांपूर्वी लाँच केले होते, ज्याद्वारे यूजर्स अशा बनावट कॉल्सबाबत तक्रार करू शकतात. या पोर्टलवर तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जातो.

नवीन नियम आणि अपडेट्स

दूरसंचार विभागाने भारतीय युजर्ससाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. 1 ऑक्टोबरपासून टेलिकॉम कंपन्यांना नवीन डीएलटी प्रणाली लागू करण्यात आली आहे, त्यामुळे फसव्या किंवा स्पॅम कॉल्स आळा बसणार आहे. याशिवाय, 11 डिसेंबरपासून मेसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू होणार आहेत आणि त्यामुळे  सायबर क्रिमिनल्सने पाठवलेले मेसेज ट्रॅक करणे सोपे होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

submarine deals : हिंदी महासागरात चीनची जहाजे आणि पाणबुड्या खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. याचा आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका
1 September Rules Changes : 1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी
Women in Supreme court : सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीश आहेत. या संपूर्ण न्यायाधीश बेंचमध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ