डी. गुकेश बुद्धीबळाचा जगजेत्ता

D. Gukesh World Chess Champion : भारताच्या डोम्माराजू गुकेश या 18 वर्षाच्या युवकाने बुद्धीबळाच्या पटलावर विजयी स्वारी करुन वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवला आहे. जगातला सर्वात तरुण विश्वविजेता म्हणून त्याला मान मिळाला आहे. तर वर्ल्ड चॅम्पियन आनंद विश्वनाथन यांच्यानंतरचा दुसरा भारतील जगजेत्ता ठरला आहेत. 
[gspeech type=button]

भारताच्या डोम्माराजू गुकेश या 18 वर्षाच्या युवकाने बुद्धीबळाच्या पटलावर विजयी स्वारी करुन वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवला आहे. जगातला सर्वात तरुण विश्वविजेता म्हणून त्याला मान मिळाला आहे. तर वर्ल्ड चॅम्पियन आनंद विश्वनाथन यांच्या नंतरचा दुसरा भारतील जगजेत्ता ठरला आहे.

वयाच्या 11व्या वर्षी पाहिलेल्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती

सात वर्षापूर्वी ‘मला बुद्धीबळ खेळात सर्वात लहान वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे’ असं स्वप्न एका अकरा वर्षाच्या मुलाने एका माध्यमाला मुलाखत देताना बोलून दाखवलं होतं. तेव्हा हे स्वप्न चांगलं आहे, मुलगा खूप अॅम्बिशियस आहे अशी शाबासकी देऊन, आपल्याला काही काळ बरं वाटलं असतं. पण तो लहान मुलगा हे स्वप्न खरचं पूर्ण करेल असा विश्वास कोणालाही नसता. त्याच अकरा वर्षाच्या मुलाने आपलं मोठं स्वप्न लहान वयात पूर्ण करून दाखवलं आहे.

बुद्धीबळाच्या 64 घरांवर वर्चस्व राखत डी. गुकेश हा जगातला सर्वात लहान वयाचा तरुण जगजेत्ता बनला आहे.

चैन्नईतल्या एका तेलगू कुटुंबामध्ये गुकेशचा जन्म झाला आहे. त्याचे वडिल हे इएनटी सर्जन आहेत तर आई मायक्रो बायोलॉजिस्ट आहे. चैन्नईतल्या प्रत्येक शाळेमध्ये बुद्धीबळ हा खेळ विषय म्हणून शिकवला जातो. त्यानुसार गुकेश सुद्धा वेलामल विद्यालयातून वयाच्या सातव्या वर्षापासून म्हणजे 2013 पासून बुद्धीबळ शिकू लागला.
चैन्नईतल्या या शाळेत दर आठवड्याला तीन दिवस एक – एक तास हा खेळ शिकवला जातो. पण या खेळातील गुकेशची प्रगती पाहून नंतर त्याला विशेष प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर बुध्दीबळ स्पर्धांमध्ये तो भाग घेऊ लागला.

बुद्धीबळातला गोल्डनबॉय

गुकेशने वयाच्या नवव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरूवात केली. 2015 साली त्यांने एशियन स्कूल चेस चॅम्पियन्सचा विजेता ठरला. त्यानंतर 2018 साली अंडर 12 कॅटेगरीमध्ये तो वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियन्सशीपचा विजेता झाला. 2018 च्या या एशियन यूथ चेस चॅम्पियन स्पर्धेच्या वेगवेगळ्या गटामधून गुकेशने भाग घेत तब्बल 5 गोल्ड मेडल मिळवले आहेत.

सन 2018 आणि 2020च्या वर्ल्ड यूथ चॅम्पियन्स स्पर्धेतही त्याने गोल्ड मेडल्स मिळवले आहेत.

तर ऑलिम्पियाड 2022 आणि 2024 मध्येही त्याने गोल्ड मेडल्स मिळवत आपल्या यशाचं सातत्य राखलं आहे.

विश्वनाथन आनंद यांचे शिष्य

डी. गुकेश याने सलग पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या विश्वनाथन आनंद यांच्या हाताखाली विशेष प्रशिक्षण घेतलं आहे.

बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंद हे पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिले आहेत. त्यांनी शेवटचे जागतिक अजिंक्यपद 2012 साली पटकावले. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताला हा विजय मिळवून देण्यात गुकेशला यश आलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ