मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात हिऱ्यांचा शोध

Panna Diamond River Runjh : पन्ना जिल्ह्यातील अजयगढ तालुक्यातील आरामगंज गावातून वाहणारी रुंज नदी हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.
[gspeech type=button]

पन्ना जिल्ह्यातील अजयगढ तालुक्यातील आरामगंज गावातून वाहणारी रुंज नदी हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. या नदीत हिऱ्यांचा शोध घेणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकांना इथे हिरे सापडण्याची आशा असते, आणि म्हणूनच याठिकाणी सकाळपासूनच  नदीत हिऱ्यांचा शोध सुरू होतो.

रुंज नदी हि पन्ना जिल्ह्यातील डोंगराळ भागातून उगम पावते आणि त्या भागातून वाहत मातीच्या प्रदेशात पोहोचते. लोकांचा असा विश्वास आहे की या नदीत हिरे सापडतात, आणि म्हणूनच स्थानिक लोक प्रत्येक दिवशी नदीत हिऱ्यांचा शोध घेतात. परंतु  गेली अनेक वर्ष अनेकजनांचे मौल्यवान  धातू शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत , मात्र काहींच्या हाती काहीच न लागल्याने ते  निराश होऊन तिथून निघून गेले.

केवळ नशीबवानांनाच मिळतात हिरे?

अजयगढ तहसीलच्या आरामगंज गावातून रुंज नदी वाहते. इथे हिऱ्यांचा शोध घेणारी शेकडो माणसं दररोज सकाळी नदीच्या काठावर येतात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, जे भाग्यवान असतात, त्यांनाच हिरे मिळतात. पण त्यातच अनेकांना दिवसभर शोध घेतल्यानंतर रिकाम्या हातांनी घरी परतावे लागते. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हिऱ्यांचा शोध घेणं ही एक अफवा आहे.

हिऱ्यांचा शोध कसा घेतला जातो?

हे मौल्यवान धातू जितके आकर्षक आहे, तितकाच त्याचा शोध घेणं अवघड आहे. स्थानिक लोक फावडे आणि जाळी घेऊन नदीत येतात आणि नदीच्या काठावर तसेच नदीत वाहून आलेली माती टोपल्यात भरून हिऱ्यांचा शोध घेतात. काहीजण नदीच्या काठावरून दगड उचलूनही हिऱ्यांचा शोध घेतात. सर्व लोक या कामासाठी कष्ट घेतात, परंतु बहुतांश लोक रिकाम्या हातांनीच परततात.

हिऱ्यांचा शोध लवकर कधी संपणार?

दोन वर्षांपूर्वी, रुंज नदीत 72 कॅरेटचा हिरा सापडल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. त्या घटनेनंतर, इथे लोकांची गर्दी वाढली. जवळपास 15 ते 20 हजार लोक हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी आले होते. स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई करत गर्दीला थांबवलं. कारण हा भाग पन्ना वन परिक्षेत्रांतर्गत येतो, आणि वन्यप्राण्यांची संवेदनशीलता लक्षात घेऊन गर्दी रोखण्यात आली.

रुंज नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्याचं जवळपास 60% काम पूर्ण झालं आहे. धरण पूर्ण झाल्यावर नदीचा हा भाग पाण्याखाली जाईल, ज्यामुळे हिऱ्यांच्या शोधाची प्रक्रिया संपुष्टात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ