आर्थिक साक्षरता – आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग

Independence Day : जेव्हा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो, तेव्हाच खरी आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात होते. 15 ऑगस्टला तिरंग्यासमोर उभं राहून “मी आर्थिकदृष्ट्या साक्षर होईन आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करीन.” असं स्वत:ला वचन द्या.
[gspeech type=button]

भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी राजकीय स्वातंत्र्य मिळवलं. आज, जवळजवळ 78 वर्षांनी, आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा — आपण खरोखर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत का? आजही लाखो भारतीय कर्ज, अपुरे उत्पन्न, चुकीची गुंतवणूक आणि अनियोजित खर्चाच्या जाळ्यात अडकून आर्थिक गुलामीत जगत आहेत. या साखळदंडातून मुक्त होण्याची गुरुकिल्ली म्हणजे आर्थिक साक्षरता.

राजकीय स्वातंत्र्याने आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला; आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला स्वप्नं, गरजा आणि संधींवर बंधनांशिवाय निर्णय घेण्याची ताकद देते.

आर्थिक साक्षरता म्हणजे काय?

जागतिक बँक आणि OECD च्या अहवालानुसार, भारतात फक्त 27 टक्के प्रौढ आर्थिक साक्षर आहेत.
म्हणजेच 10 पैकी 7 जणांना व्याजदर, महागाई, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणुकीचे प्रकार याची प्राथमिक समजही नाही.

याचे परिणाम :

  • चुकीच्या योजना व फसवणुकीत पैसे अडकणे
  • विम्याचा अभाव व आकस्मिक खर्च
  • निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाचा अभाव
  • महागाईमुळे खरेदीशक्ती घटणे

आर्थिक साक्षरतेत समाविष्ट बाबी:

  • बजेट तयार करून त्याचे पालन
  • बचत व गुंतवणुकीची योग्य साधनं निवड
  • कर्ज व क्रेडिटचा विवेकी वापर
  • करसवलती आणि आर्थिक हक्कांची माहिती
  • महागाईचा (Inflation) परिणाम समजून घेणे

महागाईचा खरा फटका

महागाई दर 6 टक्के असेल, तर 12 वर्षांत पैशाची किंमत निम्मी होते.  आजचे 10 लाख रुपयाचं मूल्य हे 12 वर्षांनी फक्त 5 लाख रुपये असेल. जोपर्यंत तुमची गुंतवणूक महागाईला हरवत नाही, तोवर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत. 

आर्थिक गुलामीची कारणं

  • क्रेडिट कार्ड व कर्जाचा अतिरेक
  • महागाईकडे दुर्लक्ष (FD व्याज महागाईपेक्षा कमी)
  • विमा नसणे – आकस्मिक खर्चाने बचत संपणे
  • फक्त पारंपरिक साधने – वाढ थांबणे
  • कुटुंबातील आर्थिक चर्चा टाळणे – पुढील पिढी अनभिज्ञ राहत

आर्थिक साक्षरतेचे महत्त्व

आजच्या वेगवान जगात केवळ उत्पन्न कमावणं पुरेसं नाही. योग्य नियोजनाशिवाय:

  • पैसा हातातून निसटतो
  • आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावं लागतं
  • निवृत्ती नंतर उत्पन्नाची अडचण भासते
  • मुलांच्या शिक्षण/लग्नासारख्या जबाबदाऱ्या अपूर्ण राहतात

प्रेरणादायी उदाहरण

पुण्यातील अनिलराव यांनी 20 वर्षांपूर्वी सरकारी नोकरीसोबत PPF आणि म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक सुरू ठेवली. त्यावेळी SIP हा शब्द लोकप्रिय नव्हता. आज, निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन पुरेशी आहे आणि त्याशिवाय 2 कोटी रुपयांचा स्वतंत्र फंड आहे.
त्यांचं म्हणणं —

“गुंतवणूक हा खर्च नसून भविष्यातील स्वातंत्र्य खरेदी करण्याचा मार्ग आहे.”

आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारी पावलं

  1. उद्दिष्ट निश्चित करा – अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येयं ठरवा
  2. आपत्कालीन निधी – किमान 6 महिन्यांचा खर्च कव्हर करणारा लिक्विड फंड
  3. योग्य गुंतवणूक मिश्रण – इक्विटी, डेट, गोल्ड, इतर साधनांमध्ये संतुलन
  4. महागाईपेक्षा जास्त परतावा – उदा. 6 टक्के महागाई असेल तर 8 – 10 टक्के परतावा
  5. कर्जाचे व्यवस्थापन – अनावश्यक EMI टाळा
  6. नियमित आढावा – वर्षातून एकदा योजना तपासा

आर्थिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी

1991 च्या आर्थिक उदारीकरणानंतर GDP 270 अब्ज डॉलरवरून 4 ट्रिलियन डॉलरपर्यंत गेला.
पण घराघरात संपत्ती निर्माण झाली नाही — कारण आर्थिक साक्षरतेचा अभाव, नियोजनाचा अभाव आणि “नंतर पाहू” वृत्ती.

कृती करा:

  • खर्चावर नियंत्रण, बचत वाढवा
  • माहितीवर आधारित गुंतवणूक निर्णय घ्या
  • विविध साधनांचा वापर करा, केवळ विमा किंवा एफडी (फिक्स्ड डिपॉझीट) मध्ये अडकू नका
  • एकच विश्वासार्ह सल्लागार ठेवा

कृती आराखडा – आजपासून सुरू करा

  • सर्व उत्पन्न-खर्च नोंदवा
  • सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी तयार करा
  • विमा पूर्ण करा
  • उद्दिष्ट-आधारित गुंतवणूक सुरू करा
  • दरवर्षी आढावा घ्या
  • कुटुंबासोबत आर्थिक चर्चा करा

शेवटचा विचार

“स्वातंत्र्य मिळतं, पण टिकवण्यासाठी लढावं लागतं.
आर्थिक स्वातंत्र्य हीसुद्धा तशीच लढाई आहे — पण ज्ञान, शिस्त आणि योग्य गुंतवणूक या शस्त्रांच्या मदतीने आपण ही लढाई जिंकू शकतो. तेव्हा 15 ऑगस्टला तिरंग्यासमोर उभं राहताना स्वतःशी वचन द्या —
“मी आर्थिकदृष्ट्या साक्षर होईन आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करीन.”

 

6 Comments

  • Jyoti Bhalerao

    Very well said. Very true

  • Prashanth Joshi

    Concise and simple way of educating common man. Great!

  • Balaso Desai

    Avdhoot Good Info..

  • Ajay Shirke

    “लेख खूप अभ्यासपूर्ण आणि सुव्यवस्थित आहे.
    चांगला विचार आणि चांगली माहिती दिली आहे. खूप छान!”👏✨👍

  • शंतनु कुलकर्णी

    अवधूत… खूप छान..
    सोप्या मराठी भाषेत, सर्वासामान्यांना उमगेल अशा शब्दात खूप छान लिहिलंय…
    Keep it up!!
    तूझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा!!!
    श्री गुरुदेव दत्त!!!

  • Nitin Shitole

    Very nice and informative.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

6 Responses

  1. अवधूत… खूप छान..
    सोप्या मराठी भाषेत, सर्वासामान्यांना उमगेल अशा शब्दात खूप छान लिहिलंय…
    Keep it up!!
    तूझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा!!!
    श्री गुरुदेव दत्त!!!

  2. “लेख खूप अभ्यासपूर्ण आणि सुव्यवस्थित आहे.
    चांगला विचार आणि चांगली माहिती दिली आहे. खूप छान!”👏✨👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Henley passport index : 'हेनले पासपोर्ट इंडेक्स' या संस्थेने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारताने चांगलीच प्रगती
NALSA scheme : माणूस आणि प्राणी यांच्यातल्या रोज वाढत्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने एक खास योजना सुरू केली
QR code paperless ticket : रेल्वेकडून 2016 मध्ये यूटीएस ॲप सुरू करण्यात आले. याचबरोबर, प्रवाशांची सोय व्हावी आणि तिकीट काढण्यासाठी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ