जेन झी पिढी : आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सतर्क असलेली पिढी

Finance : नव्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सतर्क करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासूनच आर्थिक साक्षरता, क्रेडिट आणि वैयक्तिक आर्थिक बाबींना शिक्षणाच्या अभ्यासक्रमात स्थान देणं गरजेचं आहे.
[gspeech type=button]

जेन झी पिढी ही कामाच्या ठिकाणी काहिशी बेजबाबदारपणाने वागणारी पिढी म्हणून आतापर्यंत अनेकांची मते आहेत. डिजिटल युगात जन्माला आलेली पिढी, पैसे खिशात ठेवण्याऐवजी युपीआयवरुन थेट व्यवहार करणारी, बँकेत ये-जा करण्याऐवजी नेट बँकिगवरुनच बँकेतील व्यवहार करणारी ही जेन – झी पिढी आहे. मात्र, हिच पिढी गुंतवणुकीसाठी विविध पर्याय अवलंबत आहे. ही जेन-झी पिढी महिन्याचं आर्थिक नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या बजेटिंग अॅप्सचा वापर करतात तर आर्थिक मार्गदर्शनासाठी विविध तज्ज्ञांचा सल्ला प्रमाण मानत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

कर्जाची सहज उपलब्धतता

या सगळ्यामध्ये आर्थिक सक्षमता असणं जितकं या पिढीला महत्त्वपूर्ण वाटतं तितकचं आपल्या नावावर कर्ज असणं म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपली एक विशेष ओळख आहे असा या पिढीचा समज आहे. 

क्रेडिट स्कोअर या गोष्टीला अनेकदा नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. मात्र, याच्या माध्यमातून आर्थिक शिस्तही अंगिकारता येऊ शकते. आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहजगत्या कर्जाऊ रक्कम मिळते. यापैकी अनेक प्लॅटफॉर्मवरुन कर्ज घेणं हे धोकादायक असते. पण अधिकृत आर्थिक संस्थाकडून कर्ज घेणं, कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, कर्जावरील व्याज, कर्ज फेडण्याची मुदत, त्यासाठी एखादी वास्तू वा वाहन गहाण ठेवणं, नोकरी करत असतील तर कर्ज फेडण्यासाठी त्यात सातत्य राखणं अशा अनेक गोष्टी कर्ज घेतल्यावर शिकता येतात.  

या सगळ्या माध्यमातून अलीकडे आर्थिक जगतात आवश्यक असलेल्या सीबील स्कोरही कसा चांगला ठेवावा, पैसे कसे वापरावेत याविषयीच्या अनेक गोष्टी ही पिढी शिकत असते. 

लहान वयात कर्ज घेण्याचे धोके

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी या पिढीतील मुलं लहान वयात सहजगत्या उपलब्ध होणारं कर्ज घेतात. यासाठी त्यांच्याकडे पुरेसं मार्गदर्शन नसतं. आर्थिक स्थिरतेशिवाय बँकाकडून किंवा अन्य वित्तसंस्थाकडून कर्जाऊ रक्कम दिली जात नाही. अशावेळी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन हे कर्ज घेतलं जात आहे. यामध्ये अनेक धोके असतात. यासंदर्भात अनेक माहिती आतापर्यंत अनेक बातम्यांमधून बाहेर आली आहे. अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची वसूली केली जाते. कर्ज फेडण्यासाठी कमी अवधी दिला जातो. जर हे कर्ज वेळेत फेडलं गेलं नाही तर, शारिरीक आणि मानसिक छळ केला जातो. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्म्सवरुन कर्ज घेणं अतिशय धोक्याचं असते. मात्र, पुरेशी माहिती नसल्यामुळे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक तरुण मुलं अशा ऑनलाईन कर्ज पुरवणाऱ्या कंपनीच्या फासात अडकतात. 

आर्थिक शिक्षण

जनरेशन झेडला खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी, व्यावहारिक शिक्षणाचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. 

क्रेडिट स्कोअरची माहिती देणे –  क्रेडिट स्कोअर ही मूळ संकल्पना काय असते, त्यातील बारकावे, क्रेडिट स्कोअर कशा पद्धतीने मोजले जातात, त्याची वाढ कशी करावी अशा सगळ्या गोष्टींची माहिती शिक्षणामध्ये देणं गरजेचं आहे.  

काळजीपूर्वक कर्ज घेण्यास प्रोत्साहन देणे – वापरकर्त्यांना त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन कसे करावे आणि कर्जाची खरी किंमत कशी ओळखावी हे शिकवणे.

वेळेवर परतफेड करण्यावर भर देणे – क्रेडिट प्रोफाइल राखण्यासाठी सातत्यपूर्ण, वेळेवर व्याज भरण्यावर भर देण्याविषयी माहिती देणे.

अनधिकृत कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थापासून सावध राहणे – नोंदणीकृत नसलेले कर्ज देणारे, कर्जाचे सापळे रचणाऱ्या संस्थापासून सतर्क, सावध राहण्याविषयी मार्गदर्शन करणे. तसेच वेळोवेळी क्रेडिट रिपोर्टचे पुनरावलोकन करण्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता करणे गरजेचं आहे. 

थोडक्यात शालेय अभ्यासक्रम किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासूनच आर्थिक साक्षरता, क्रेडिट आणि वैयक्तिक आर्थिक बाबींना शिक्षणाच्या अभ्यासक्रमात स्थान दिलं पाहिजे. 

त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम पिढी घडवताना या पिढीला कर्जासंबंधित साक्षर करणं ही एक सामूहिक जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्थांपासून ते डिजिटल कर्ज देणाऱ्या आणि धोरणकर्त्यांपर्यंत, आर्थिक परिसंस्थेतील भागधारकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे.  या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र उपाययोजना केल्या पाहिजेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Forest area Decreasing in India : 2015 ते 2019 या चार वर्षाच्या कालावधीत भारताच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
Finance : क्रेडिट स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो. एखाद्या कर्जावरील व्याजाची रक्कम वेळेत भरता तसंच कर्ज वेळेत फेडता हे दर्शविणारा
Leather from coconut Water : नारळ पाण्यापासून चामडं तयार करण्याचं तंत्रज्ञानही विकसित झालंय. कल्पवृक्षाच्या आधुनिक वापराचं दारंही खुलं झालंय. हे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ