जेन झी पिढी बचतीपेक्षा अनुभव गाठिशी बांधण्याला महत्त्व देते !

Gen Z Finance : जेन झी ही पिढी वेगळ्या पद्धतीने खर्च करते. त्यामुळे आजच्या व्यवसायिकांना उत्पादनांच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये वस्तू ऐवजी भावनिक आव्हान करत अनुभव विकण्याची गरज आहे. कारण जेन झी पिढीचा पैशात नाहीतर अनुभवात गुंतवणूक करण्याकडे कल आहे.
[gspeech type=button]

आपण मोठं होत असताना आपण अनेक आठवणी जपत असतो. कधी त्या वस्तू रुपात असतात तर कधी त्या घडलेल्या क्षणाच्या रुपात. काही वेळेला पुरेसे पैसे नव्हते म्हणून एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो नाही, किंवा काही खाल्लं नाही, काही शिकू शकलो नाहीत वा पैशांचा विचार करुन आवडलेली वस्तू खरेदी न केल्याच्याही आठवणी असतील. पण आत्ताच्या जेन झी पिढीचं तसं नाही. ही पिढी पैशांपेक्षा आठवणी जपण्याला, त्या निर्माण करण्याला जास्त महत्त्व देतात. थोडक्यात पैसे जपून, साठवूण ठेवण्यापेक्षा ते खर्च करुन त्यातून आठवणी निर्माण करण्यावर भर देतात. 

पैसे कमवता येतील, पण आठवणी निसटल्यात तर…

काही महिन्यापूर्वी नवी मुंबईमध्ये कॉल्ड प्ले बँडचा कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टच्या तिकीटाचा दर हा आपल्या विचार करण्यापलीकडे होता. मात्र, अनेक तरुणांनी मात्र पैसे खर्च करत या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. ज्या तरुणांना नवी मुंबईच्या कार्यक्रमाची तिकीटं मिळाली नाहीत त्यांनी थेट अहमदाबाद गाठलं होतं. त्याचा वेगळा खर्च केला होता.  

याविषयी तुम्ही या तरुणांना विचारलं की तुम्ही इतके पैसे अशा कार्यक्रमांवर कसे खर्च करु शकता तर त्यावर त्याचं उत्तर असतं, ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’  ‘तुम्ही आयुष्य एकदाच जगता’ हे त्याचं तत्व आहे. आणि त्यामुळे पैसे साठवून ठेवण्याऐवजी तुम्हाला जे आवडतं त्यासाठी पैसे खर्च करा असे त्यांचे विचार आहेत. 

बँक बॅलन्सचा अनुभव

जनरेशन झेडची आणखीन एक सवय आहे ती म्हणजे पैसे साठवून न ठेवता पुरेसे पैसे कमवल्यावर त्याचा उपभोग घेणं. त्यामुळे ही पिढी फिरण्यावर नव्या ठिकाणी एकट्याने भेट देणं पसंद करतात.  सोलो ट्रॅव्हलर्स म्हणून ही प्रचलित आहेत. एकट्याने फिरायला जाणं, विचार करणं, नोकरी, करिअरविषयी विचार करत राहणं हे क्षण एकट्याने अनुभवायला या पिढीला आवडतं. यात जरी त्यांचे पैसे खर्च होत असले तरी यातून मिळणारा अनुभव आत्मविश्वास हा या पिढीसाठी जास्त महत्त्वाचा असतो. खर्च केलेले पैसे लवकर संपतात, पण स्वतःचा शोध आयुष्यभर टिकतो.

थोडक्यात आयुष्य मनापासून जगणं, कमवलेले पैसे साठवण्याऐवजी आनंदासाठी खर्च करतात. यामध्ये आवडत्या ठिकाणी फिरायला जाणं, जे आवडतो तो अन्नपदार्थ किंवा आवडत्या हॉटेलमध्ये पैशाची पर्वा न करता त्या – त्या ठिकाणी खाण्यासाठी जाणं, ज्या ब्रँडेड वस्तू आवडतात त्यांच्या किंमतीचा विचार न करता त्या विकत घेणं अशा गोष्टी ही पिढी सहज करते. त्यांच्यासाठी या गोष्टी वा अनुभव फक्त वस्तू वा ठिकाणं किंवा अन्नपदार्थ नसतात. तर त्यांच्यासाठी त्या संस्मरणीय अशा आठ वणी असतात. 

रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट

जेन झी ही पिढी वेगळ्या पद्धतीने खर्च करते. आणि हे ते जाणूनबुजून करत असतात. त्यांना त्यांच्या पैशांचं व्यवस्थापन करता येते. ते पारंपरिक ऐवजी नवीन पद्धतीने गुंतवणूक करतात. त्याचवेळी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याऐवजी त्याचा योग्य वेळी, आवडत्या गोष्टीसाठी खर्च करण्यावरही भर देतात. कारण पैशांचं मूल्य हे कमी होत जातं, पण त्या – त्या वेळी घेतलेले अनुभवांची शिदोरी ही आयुष्यभर टिकतील असे त्यांचे विचार आहेत. 

त्यामुळे आजच्या व्यवसायिकांना उत्पादनांच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये वस्तू ऐवजी भावनिक आव्हान करत अनुभव विकण्याची गरज आहे. कारण जेन झी पिढीचा पैशात नाहीतर अनुभवात गुंतवणूक करण्याकडे कल आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India : भारतात युवा वर्गाची संख्या प्रचंड मोठी आहे. पण हीच तरुणाई नोकरीच्या शोधात हवालदिल होत आहे. शिक्षण असलं तरीही
Data Privacy Act : भारतातील नवीन डेटा सिक्युरिटी अॅक्टनुसार कंपन्यांना ग्राहकांचे फोन नंबरसारखे वैयक्तिक तपशील गोळा करण्यापूर्वी त्यांची संमती घेणे
India Healthcare sector : भारतातील लोकसंख्येचा आढावा घेऊन, आरोग्य सेवेतील वेगवेगळे घटक जोडून, सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या व्यवहारिक आणि जागतिक स्तरावरही प्रेरणादायी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ