भारताच्या निर्यात टक्क्यात वाढ

India: गेल्या पाच वर्षात भारताच्या निर्यात टक्क्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. साखर, कृषी खतं-औषधं, हिरे आणि पेट्रोलियम या उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळते
[gspeech type=button]

गेल्या पाच वर्षात भारताच्या निर्यात टक्क्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. साखर, कृषी खतं-औषधं, हिरे आणि पेट्रोलियम या उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळते. यासोबतच इलेक्ट्रोनिक वस्तू, न्यूमेटिक टायर, नळ-वॉल्व आणि सेमीकंडक्टरसारख्या वस्तूंच्या निर्यातीतसुद्धा अपेक्षित वाढ होत आहे.

पेट्रोलियम पदार्थांची निर्यात वाढली

कच्चे तेल, केरोसिन, इंधन या पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीत तब्बल 84.96 अब्ज अमेरिका डॉलर इतकी वाढ झाली आहे. जागतिक व्यापारामध्ये पेट्रोलियम क्षेत्रात 2018 साली भारताचा हिस्सा हा 6.45 टक्के होता. यामध्ये आता दुपटीने वाढ होऊन आता भारताचा हिस्सा 12.59 टक्के आहे. यामुळे पेट्रोलियम निर्यातीच्या क्षेत्रात भारत आता पाचव्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानवर आला आहे.

हिरे व्यापारातही तेजी

मौल्यवान हिरे वा स्टोनच्या निर्यातीतही भारत आघाडीवर आहे. सन 2018 साली या क्षेत्रात भारताच्या निर्यातीचं प्रमाण ही 16.27 होतं. मात्र, 2023 साली भारत याही क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश ठरला असून 36.53 टक्के मौल्यवान रत्नांसह वेगवेगळ्या स्टोनची निर्यात करतो.

साखर निर्यात

सन 2018 साली साखर निर्यातीच्या क्षेत्रात भारताची हिस्सेदारी ही 4.17 टक्के होती. 2023 साली त्यामध्ये वाढ होत आता, जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा 12.21 टक्के झाला आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात भारत सध्या 3.72 अब्ज अमेरिका डॉलरची उलाढाल करत आहे.

याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित किटकनाशके, औषधांच्या निर्यातीतसुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. सेमिकंडक्टर चीपच्या निर्यातीमध्ये सुद्धा भारताची वाढ ही समाधानकारक असल्याचं पाहायला मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ