गुजरात विमान अपघात : अमेरिकेतल्या प्रयोगशाळेत अपघाताचं रहस्य उलगडणार

Gujrat Palne Crash : ब्लॅक बॉक्समध्ये दोन युनीट असतात, एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर). कोणत्याही अपघातामध्ये या बॉक्सचं नुकसान होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतली जाते. मात्र, आग लागण्यासारख्या घटनेत बॉक्सला नुकसान पोहोचू शकतं.
[gspeech type=button]

दिनांक 12 जून 2025 रोजी अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी प्रक्रिया सुरु आहे. या अपघातामागचं नेमकं कारण हे विमानाच्या ब्लॅक ब्लॉक्सवरुन समजू शकतं. मात्र, या अपघाती विमानामधला ब्लॅक ब्लॉक्स हा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. त्यामुळे यातली माहिती मिळवण्यासाठी हा संपूर्ण बॉक्स अमेरिकेला पाठवणार आहेत.

वॉशिग्टंनच्या प्रयोगशाळेत माहिती मिळवणार

विमानाच्या संपूर्ण प्रवासाची डिजीटल माहिती ही त्या विमानातच असलेल्या ब्लॅक बॉक्समध्ये साठवली जात असते. या माहितीवरुन जर एखाद्या वेळी विमानाचा अपघात घडला तर त्यामागचं नेमकं कारण शोधता येते. मात्र, यासाठी तो ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असणं गरजेचं असतं. गुजरातमधल्या विमान अपघातामध्ये संबंधित विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे हा बॉक्स अमेरिकेत न्यावा लागणार आहे. अमेरिकेतल्या
वॉशिग्टंन इथे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सची तपासणी करुन त्यातून मिळणारी माहिती भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोला (AAIB) दिली जाणार आहे.

भारतातली प्रयोगशाळा कार्यान्वित नाही

आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, अपघाताची तपासणी करण्याची जबाबदारी ज्या देशात विमान अपघात झालेला असतो, तिथल्या विमान अपघात तपास ब्युरोची असते. दिल्ली इथे भारतीय विमान अपघात तपास ब्यूरोची प्रयोगशाळा गेल्या वर्षी उभारण्यात आली आहे. मात्र, त्या प्रयोगशाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळवण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री नाही. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करुन नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डची टीम हा बॉक्स अमेरिकेतील प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाणार आहेत.

यूकेची समिती तपास कार्यात सहभागी होणार

या विमान अपघातामध्ये 53 ब्रिटिश नागरिक होते. त्यामुळे या अपघाताच्या तपास कार्यामध्ये युकेची समितीसुद्धा सहभागी होणार आहे.

हेही वाचा : गुजरात विमान अपघात : पायलट, केबिन क्रू सह 241 प्रवाशांचा मृत्यू, 1 प्रवासी बचावला

ब्लॅक बॉक्सचं महत्त्व

ब्लॅक बॉक्समध्ये दोन युनीट असतात, एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर). कोणत्याही अपघातामध्ये या बॉक्सचं नुकसान होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतली जाते. मात्र, आग लागण्यासारख्या घटनेत बॉक्सला नुकसान पोहोचू शकतं. या बॉक्समधून फ्लाइट डेटा रेकॉर्डर वेळ, उंची आणि हवेचा वेग यासारख्या अनेक तांत्रिक गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे अपघाताचं कारण समजू शकतं. या बॉक्समधून माहिती मिळविण्यासाठी दोन दिवस ते महिन्याभराचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे रेकॉर्डर खराब झाला आहे. या कारणामुळे डेटाचं नुकसान होऊ नये, म्हणून मेमरी बोर्ड काढून त्यातून चिप काढावी लागणार आहे. तसंच इलेक्ट्रोनिक सर्किटचंही काही नुकसान झालं आहे का, हेही तपासावं लागणार असल्याचं तज्ज्ञानी म्हटलं आहे.

हेही वाचा : विमान संकटात असताना मदतीसाठी वापरले जाणारे ‘मे डे’ सारखे शब्द आणि त्यांची तीव्रता !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

FASTag Annual Pass: येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल
Iran - Israel War : इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना
G - 7 Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 - 17 जून 2025 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ