रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स आणि ट्रिक्स

Tatkal railway ticket booking: IRCTC ने तत्काळ तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध केली आहे, हे आपल्याला माहीत आहेच. यामुळे प्रवाशांना एक दिवस आधीच कन्फर्म तिकीट मिळवण्याची संधी मिळते.
[gspeech type=button]

अनेकजण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा ऑप्शन निवडतात. पण, अनेकदा रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणं शक्य नसते. सुट्टीच्या किंवा सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळवणे मोठे आव्हानच असते. अश्यावेळी IRCTC ने तत्काळ तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध केली आहे, हे आपल्याला माहीत आहेच. यामुळे प्रवाशांना एक दिवस आधीच कन्फर्म तिकीट मिळवण्याची संधी मिळते. पण, तत्काळ तिकीट बुक करणे सोपी प्रक्रिया नाही आहे, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना येतो. यासाठीच काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा लवकर तिकीट बुक करता येईल आणि कन्फर्म तिकीटही मिळू शकते.

तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स

वीकेंडच्या तुलनेत आठवड्याच्या मधल्या दिवशी तिकीट बुक करण्यास पहिलं प्राधान्य द्या. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

एकाच वेळी विविध ब्राउझर किंवा डिव्हाइसवर लॉग इन करून बुकिंग करा. यामुळे किमान एका अकाऊंटवरून तरी कन्फर्म तिकीट मिळू शकते.

तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांची माहिती तुमच्या प्रोफाईलमध्ये आधीच सेव्ह करून ठेवा. यासाठी तुम्हाला नाव व वय इत्यादी माहिती भरावी लागेल.

IRCTC अकाऊंटच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये ही लिस्ट बनवता येईल. लिस्ट तयार असल्यामुळे बुकिंगच्या वेळी माहिती भरण्याचा वेळ वाचतो.

तत्काळ तिकीट बुक करताना पेमेंट प्रक्रिया वेगवान होण्यासाठी मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग किंवा UPI वापरा. यामुळे बुकिंग लवकर करता येते.

एसी कोचसाठी तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते, तर स्लीपर क्लाससाठी 11 वाजता सुरू होते. बुकिंग सुरू होण्याच्या 2-3 मिनिटे आधी लॉगिन करणे आवश्यक आहे.

तत्काळ बुकिंगसाठी हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन गरजेचं आहे.

तत्काळ तिकीट बुकिंगसाठी अजून सोयीस्कर पर्याय म्हणजे करंट तिकीट बुकिंग. या प्रक्रियेत, तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 4 तासांपूर्वी तिकीट बुक करू शकता. यामध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही आणि कन्फर्म तिकीट मिळवण्याची शक्यता असते.

या टिप्सचा वापर करून तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळवणे नक्कीच सोपे होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ
नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं की, “एअरलाईनच्या सर्व फ्लाईट कर्मचाऱ्यांमध्ये आजारपणाच्या वैद्यकीय रजेचं प्रमाण वाढलं आहे.” अहमदाबाद

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ