ईएमआयचा ताण कसा कमी करायचा? जाणून घ्या या तीन ट्रिक्स

Finance : काही वेळेला एखाद्या महिन्यात आपल्याकडे खर्च, सेव्हिंग्ज असं सगळं करुन हातात अधिकचे पैसे शिल्लक राहतात. अशावेळी हे पैसे कर्ज खात्यावर टाकून द्यावेत. आगाऊ हफ्ते भरले, किंवा जेव्हा शक्य आहे तेव्हा पैसे देत गेलो की कर्जाच्या मुद्दल व व्याजाची रक्कम  ठरलेल्या कालावधी आधी भरून होते. त्यामुळे जास्त काळ कर्जाखाली राहावं लागत नाही.
[gspeech type=button]

अलीकडे सगळ्याच वस्तू कर्जावर घेतल्या जातात. दर महिन्याला त्यांचे ईएमआय द्यायची वेळ आली की डोईजड होतं हे नक्की. त्यातही एखाद्या महिन्यात इतर खर्च वाढला की ईएमआय भरणं खूप कठीण होतं. सगळ्यात मोठा ईएमआय हा घराचा असतो. आरबीआयने गृहकर्जावरील व्याजदर जरी 5.5 टक्के स्थिर ठेवले असले तरीही या ईएमआयचा ताण दर महिन्याकाठी येतोच. त्यामुळे दर महिन्याला तुमचं आर्थिक व्यवस्थापन केलं तर कदाचित तुमचा ईएमआयचा ताण नक्कीच कमी होऊ शकतो. जाणून घेऊयात या तीन ट्रिक्स काय आहेत?

कर्जपुनर्रचना 

बँकेतून गृहकर्ज घेतल्यानंतर आरबीआयने जर गृहकर्जावरील व्याजदर हे तुम्ही घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजदरापेक्षा कमी केले तर बँकेकडून कर्ज पुनर्वित्त करुन घ्या. बँकेतून एकदा का कर्ज घेतलल्यावर ते फेडत असताना आपण त्या कर्जाची पुनर्रचना आणि पुनर्वित्त करु शकतो. याला इंग्रजीमध्ये लोन रिस्ट्रक्चर आणि रिफायनान्सिंग असं म्हणतात. यामुळे होतं काय, जर व्याजदर कमी झाले असतील तर आपल्या ईएमआयमध्ये त्यानुसार फरक पडतो. एकदा का ईएमआयचं ओझं डोक्यावर आलं की शे – पाचशे रुपये जरी कमी होत असले तरी आपल्याला दिलासा मिळतो. त्यामुळे या बाबतीन सतर्क राहून वेळोवेळी आपण आपल्या कर्जाची रिस्ट्रक्चर करू शकतो. 

कर्जफेड करताना अतिरिक्त हफ्ते भरा

काही वेळेला एखाद्या महिन्यात आपल्याकडे खर्च, सेव्हिंग्ज असं सगळं करुन हातात अधिकचे पैसे शिल्लक राहतात. अशावेळी हे पैसे कर्ज खात्यावर टाकून द्यावेत. आगाऊ हफ्ते भरले, किंवा जेव्हा शक्य आहे तेव्हा पैसे देत गेलो की कर्जाच्या मुद्दल व व्याजाची रक्कम  ठरलेल्या कालावधी आधी भरून होते. त्यामुळे जास्त काळ कर्जाखाली राहावं लागत नाही. परिणामी व्याजाची रक्कम ही कमी होते. याला प्रीपेमेंट असं म्हणतात. तसंच पगारवाढ झाल्यावर शक्य असेल तर ईएमआयचा हफ्ता वाढवा. म्हणजे 20 वर्षांऐवजी 15-17 वर्षात कर्ज फेडलं तर व्याजदराच्या खर्चात तुमच्या पैशांची बचत होईल. 

कर्जदार बदलणे

जर तुमची बँक तुमच्या कर्जावरील व्याजदर कमी करत नसेल किंवा रिस्ट्रक्चर,  रिफायनान्सिंग करण्यासाठी आढेवेढे घेत असेल तर तुम्ही कर्ज पुरवठा करणारी बँक किंवा वित्तसंस्था बदलूही शकता. जेव्हा कर्ज पुरवठादार बदलतो तेव्हा हफ्ते आणि एकूण व्याज कमी होण्याची शक्यता असते. हे करताना मात्र, या संपूर्ण प्रक्रियेसाठी किती खर्च होतो याची माहिती तुमच्या बँकेकडून घेणं गरजेचं आहे.  

बोनस धोरणांची अंमलबजावणी करा

जर स्थिर व्याजदरामुळे तुमचा खर्च जास्त होत असेल तर फ्लोटिंग व्याजदराचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. 

जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि त्यात तुमचं उत्पन्न वाढत असेल तर त्यानुसार तुम्ही वर्षागणिक स्टेप अप ईएमआयचा पर्याय घेऊ शकता. या पर्यायाच्या माध्यमातून  तुम्ही हप्त्याची रक्कम वाढवू शकता. 

वेळेपूर्वी कर्ज फेडण्यासाठी वर्षातून जेव्हा शक्य असेल तेव्हा मासिक हप्त्याचे प्रीपेमेंट करा. 

कर्ज घेताना बँकेने ठरवलेल्या व्याजदरामध्ये तुम्ही वाटाघाटी करू शकता. तुम्ही नियमीत हप्ते भरत असताना बँकेला रिस्ट्रक्चर करण्याची किंवा व्याजदर कमी करण्याचीही मागणी करु शकता. यामुळे तुम्हाला तुमचं गृहकर्ज लवकर भरता येईल आणि व्याजदराच्या खर्चातही काही प्रमाणात कपात करता येईल.  

हेही वाचा : आर्थिक साक्षरता – आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

submarine deals : हिंदी महासागरात चीनची जहाजे आणि पाणबुड्या खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. याचा आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका
1 September Rules Changes : 1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी
Women in Supreme court : सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीश आहेत. या संपूर्ण न्यायाधीश बेंचमध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ