‘सिद्दीकी ते शर्मा’ धर्मप्रसारासाठी भारतात घुसखोरी

Pakistani Family lives in india with Fake ID's : बंगळुरूमधुन ‘शर्मा’ आडनावाच्या आडून धर्मप्रचार करणाऱ्या सिद्दीकी कुटूंबियांचं गौडबंगाल समोर आलंय. या कुटूंबाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
[gspeech type=button]

अवैध स्थलांतरण आणि घुसखोरी ही आता संपूर्ण जगाचीच डोकेदुखी बनत आहे. कितीही कडक कायदे नियम केले तरी, घुसखोरी करणारी जमात काही ना काही पळवाटा काढत कोणत्याही देशात घुसखोरी करतात आणि आपलं बस्तान बसवतात. अलीकडे मुंबई जवळच्याच उल्हासनगरमधून मराठी नावाने पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या बांग्लादेशी तरूणीला आणि तिच्या कुटुंबियांना अटक झाली. त्यानंतर आता बंगळुरूमधुन ‘शर्मा’ आडनावाच्या आडून धर्मप्रचार करणाऱ्या सिद्दीकी कुटूंबियांचं गौडबंगाल समोर आलंय. या कुटूंबाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

नेमकी घटना काय घडली?

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढाकावरून आलेल्या विमानाने दोन पाकिस्तानी नागरिक आले. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना ते संशयित वाटल्याने त्यांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी या दोन्ही व्यक्तिंकडे असलेले पासपोर्ट बोगस असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर ते भारतात का व कोणाकडे आले आहेत याची कसून चौकशी केली. त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी बंगळुरूमधील सिद्दीकी कुटुंबियांपर्यंत पोहोचले.

पाकिस्तान, बांगलादेशमधून तडीपार केलेलं सिद्दीकी कुटूंब

रशिद अली सिद्दीकी हा व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून ‘शंकर शर्मा’ या नावाने भारतात राहत आहे. ‘शंकर शर्मा’ या हिंदू नावानं ओळख निर्माण करून हा व्यक्ती मेहदी फाऊंडेशनच्या अंतर्गत धर्मप्रसाराचं काम करत होता. त्याच्यासोबत त्याची ऑनलाइन पद्धतीने लग्न केलेली बांगलादेशी निवासी असलेली पत्नी आयेशा आणि तिचे आई-वडील हनीफ आणि रूबिना मोहम्मद हे सुद्धा राहत होते. ते ही गेल्या दहा वर्षापासून आशा रानी, राम बाबू शर्मा आणि रानी शर्मा या नावाने वावरत होते. या संपूर्ण कुटुंबाकडे हिंदू नावं असलेले पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खातं अशी कागदपत्रे ही होती.

पोटापाण्यासाठी रशिद अली सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा हा गॅरेजेसना इंधन पुरवायचा आणि काही पाकिटबंद खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करत होता.

सिद्दीकी उर्फ शर्मा कुटुंबाला अटक

रविवारी पोलिस सिद्दीकी यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले, तेव्हा हे संपूर्ण सिद्दीकी कुटुंबीय पळून जाण्याच्या तयारीत होतं. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी करत सगळ्या घराची तपासणी केली. तेव्हा सिद्दीकी कुटुंबाचं बिंग फुटलं. शर्मा आडनाव असूनही घरातल्या भिंतीवर मात्र ‘मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-युनूस’ या वाक्यासह काही मौलवीचे फोटो लावलेले होते. तपासणी दरम्यान बोगस कागदपत्रंही हाती लागले. यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि सगळ्या कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

कबुली जबाबातील माहिती

रशीद अली सिद्दीकी हा मूळचा कराचीतल्या लियाकत इथला असल्याची माहिती त्यांने पोलिसांना दिली. पाकिस्तानमध्ये तो मेहदी फाऊंडेशनचं काम करत होता. मात्र, तिथे त्याला विरोध करत देशातून बाहेर काढलं. त्यामुळे तो बांगलादेशमध्ये गेला आणि मेहदी फाऊंडेशन अंतर्गत धर्मप्रसाराचं काम करायला लागला. सन 2014 साली त्याला बांगलादेशमधून सुद्धा हाकलण्यात आलं. त्यानंतर त्याची ओळख भारतात मेहदी फाऊंडेशनचं काम करणाऱ्या परवेज नावाच्या व्यक्तिशी झाली. त्यांच्या मदतीने तो भारतात आला. पुढे पश्चिम बंगालमधल्या मालदा इथल्या एका एजंटच्या मदतीने पत्नी आणि सासू-सासरे आणि दोन नातेवाईकांना खोटे कागदपत्रे बनवून त्यांना अवैधरित्या भारतातं आणलं गेलं. काही दिवस ते दिल्लीत राहिले. त्यानंतर नेपाळमध्ये रशिदची ओळख बंगळुरूमधल्या वसीम आणि अल्ताफशी झाली. त्यांच्या मदतीने 2018 सालापासून हा रशिद आणि त्याचं कुटुंबीय बंगळुरूमध्ये राहत आहे.

पोलिसांनी या संपूर्ण कुटूंबाला अटक केली असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

National Sports Policy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, 1 जुलै 2025 रोजी, राष्ट्रीय क्रीडा धोरण
Social Media Trends : गेल्या वर्षभरात अनेक असे ‘धोकादायक ट्रेंड’ सोशल मीडियावर आलेले. अनेकांनी हे ‘ट्रेंड’ फॉलो सुद्धा केले. आणि
Success Story : जानेवारी 2022 मध्ये, प्रांजलीने मियामीमध्ये Delv.AI नावाची स्वतःची AI स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यावेळी ती फक्त 16

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ